चांद्रयान 2 चं प्रक्षेपण
- अंतराळात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने केलेल्या नियोजनानुसार चांद्रयान 2 चं प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवण अंतराळ केंद्रातून दि.२२ जुलै २०१९ रोजी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीपणे झेपावलं.
- 1) चांद्रयान-2चे वजन 3 हजार 850 किलो इतके आहे. हे वजन आठ हत्तींच्या वजनाइतके आहे.
- 2) यात 13 भारतीय पेलोड आहेत. त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लॅंडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय नासाचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील आहे.
- 3) चांद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहिम झालेली नाही.
- 4) भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान-2 एक उदाहरण ठरणार आहे.
- 5) या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही.
- 6) चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.
“नासा’पाठवणार चंद्रावर पहिली महिला
- चंद्रावर मानवाचे पाऊल पडल्याच्या ऐतिहासिक घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता अमेरिकेची अंतराळ संशोशन संस्था “नासा’ ने आणखी एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे.
- चंद्राच्या पृष्ठभागावर प्रथम महिला आणि भविष्यात माणूसाची चाल घडवून आणण्याचा कार्यक्रम “नासा’ राबवणार आहे. “आर्टेमिस’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. सूर्यदेवता अपोलोच्या जुळ्या भगिनीच्या नावावरून हे नाव या मोहिमेला देण्यात आले आहे. ही देवता ग्रीक चंद्रदेवत म्हणून ओळखली जाते.
- चंद्रावर पुन्हा एकदा मानव पाठवण्याची “नासा’ची ही पुढची मोहिम 2024 साली होणार आहे. “आर्टिमिस’ कार्यक्रमाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवून परत येणारी पहिली महिला आणि भविष्यातील मानव मंगळ मोहिमेला दिशादर्शक ठरतील, असे “नासा”ने म्हटले आहे.
ले.जन. मनोज नरवणे लष्कराचे उपप्रमुख
- लष्करातील वरिष्ठ पदांवर आज मोठे फेरबदल करण्यात आले. पूर्व विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
- ले.जन. नरवणे हे ले.जन. डी. अंबू यांच्या जागेवर लष्कराच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारतील. ले.जन. डी. अंबू हे 311 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत.
- ले.जन. नरवणे हे सर्वात वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे भविष्यात लष्कर प्रमुख पदासाठी त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत हे या वर्षी 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
- ले.जन. नरवणे यांनी आपल्या 37 वर्षांच्या लष्करी सेवाकळामध्ये शांतता काळात, युद्धभुमीवर आणि घुसखोरी विरोधी वातावरणात अत्यंत सक्रिय अश अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय रायफल्स बटालियन आणि पूर्वसीमेवरील इन्फन्ट्री ब्रिगेडची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.