देश-विदेश
‘आयएनएस विराट’ निघाली अखेरच्या प्रवासाला
# जगातील सर्वाधिक कार्यरत राहिलेली युद्धनौका हा बहुमान लाभलेली ‘आयएनएस विराट’ ही भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका आज तिच्या शेवटच्या प्रवासाला मुंबईच्या नौदल तळावरुन कोच्चीकडे निघाली. कोच्ची येथे आयएनएस विराटची आवश्यक देखभाल दुरुस्ती केली जाईल. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयात हेलिकॉप्टर आणि जलद गस्ती नौकांनी यावेळी विराटला सोबत केली. जवळपास ५७ वर्षे सेवा केल्यानंतर ही युद्धनौका सेवानिवृत्त होत आहे.
अर्थव्यवस्था
फॉर्च्युन 500 मध्ये यंदा सात भारतीय कंपन्या
# नवी दिल्ली: फॉर्च्युन मासिकाच्या जगभरातील आघाडीच्या 500 कंपन्यांच्या यादीत यंदा सात भारतीय कंपन्यांना स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये इंडियन ऑईल, भारतीय स्टेट बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या चार सरकारी कंपन्यांचा समावेश आहे. खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स व राजेश एक्सपोर्ट्सदेखील यादीमध्ये सामील आहेत. उत्पन्नाच्या आधारावर कंपन्यांची क्रमवारी निश्चित केली जाते. रिटेल क्षेत्रातील अमेरिकी कंपनी वॉलमार्ट तब्बल 482,130 दशलक्ष डॉलर उत्पन्नासह जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. भारतीय कंपन्यांमध्ये इंडियन ऑईलने 54.7 अब्ज डॉलर उत्पन्नासह 161 वे स्थान पटकावत आघाडी मिळवली आहे. यादीत पहिल्यांदाच स्थान प्राप्त झालेल्या राजेश एक्सपोर्ट्सचा क्रमांक 423वा आहे. याअगोदरच्या वर्षातील यादीत राजेश एक्सपोर्ट्सऐवजी सरकारी तेल उत्पादक कंपनी ओएनजीसीचा समावेश होता.