अमरावतीत दुर्मीळ ऑस्ट्रेलियन ‘शेकाटय़ा’ पक्ष्याची नोंद
- शेकाटय़ा (ब्लँक विंग स्टील्ट) या पक्ष्याशी साधर्म्य साधणाऱ्या ऑस्ट्रेलियन शेकाटय़ा या दुर्मीळ पक्ष्याची नोंद अमरावती येथे घेण्यात आली.
- अमरावती येथील वन्यजीव व पर्यावरण संस्था ‘वेक्स’चे पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांना हा पक्षी अमरावती येथे आढळून आला.
- पक्ष्यांच्या उपप्रजाती, त्यांच्यातील रंगांचे बदल आणि वेगळेपणाचा गेल्या अनेक वर्षांपासून निनाद अभंग अभ्यास करत आहेत. ३० मार्च २०१४ ला शेकाटय़ा प्रजातीचे मानेवर काळ्या रंगाचा पट्टा असलेले पक्षी त्यांना दिसून आले.
- या पक्ष्याच्या मानेवर काळ्या रंगाचा पिसांचा पट्टा दिसल्यापासून या प्रजातीवर सातत्याने लक्ष ठेवून होतो. ही वेगळी प्रजाती असावी असे वाटत होते, पण आशियातील पक्षीविषयक पुस्तकात त्याबाबत फारशी माहिती नसल्याने अडचण होती. काही नवीन संदर्भामुळे या प्रजातीला वेगळे सिद्ध करणे सोपे झाले.
सॅफ चषक फुटबॉल स्पर्धा : ‘सॅफ’मध्ये विजयी ‘पंच’!
- ‘सॅफ’ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी सलग पाचव्यांदा कमाल विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात भारताने नेपाळला ३-१ असे पराभूत केले.
- ‘सॅफ’ स्पर्धेमध्ये सलग २३ सामने अपराजित राहण्याचा विक्रम केला. भारतीय महिलांपैकी दालिमा छिब्बर आणि ग्रेस डांगमेइ आणि अंजू तमांग यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन
- संत साहित्याचे अभ्यासक, साहित्यिक प्रा. डॉ. यशवंत पाठक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
- मनमाड येथील महात्मा फुले महाविद्यालयातून विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर सुमारे ९ वर्षे डॉ. पाठक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे काम पूर्ण केले. डॉ. पाठक यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
भारतीय लष्कर आता शिव’धनुष’ पेलण्यास सज्ज
- भारतीय लष्कराला लवकरच स्वदेशी बनावटीच्या धनुष तोफा मिळणार आहेत. या तोफांच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर २६ मार्च रोजी ६ धनुष तोफा शत्रूवर आग ओकण्यासाठी सज्ज होणार आहेत.
- जबलपूर येथील शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यातून धनुष तोफा भारतीय लष्करात प्रदान करण्यात येणार आहेत. सुरुवातीला ६ तोफा लष्कराला मिळणार असून, आगामी काळात या कारखान्यातून ११४ तोफांची निर्मिती करण्यात येणार आहे. या तोफांचे तंत्रज्ञान बोफोर्स तोफांवर आधारित आहे.
- या तोफांचे वजन १३ टन असून, एक तोफ तयार करण्यासाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्च आला आहे.