⁠
Uncategorized

चालू घडामोडी : २३ मार्च २०२१

67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा 

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत चित्रपट ‘छिछोरे’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला आहे.आत्महत्येविरोधात युद्ध” अशी या सिनेमाची थीम लाईन होती.
‘छिछोरे’ हा चित्रपट सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलाच्या वडिलांची भूमिका साकारली होती.सिनेमात अन्नी त्याच्या मुलाला आत्महत्येपासून वाचवण्यात यशस्वी झाला. मात्र, खऱ्या आयुष्यात तो स्वत:ला नैराश्यातून बाहेर काढू शकला नाही.
चित्रपट कधी प्रदर्शित झाला?
सप्टेंबर 2019मध्ये ‘छिछोरे’ हा चित्रपट झाला होता.दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा चित्रपट प्रेक्षकांनाही प्रचंड आवडला.
67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी
बेस्ट फीचर फिल्म – Marakkar Arabikkadalinte Simham (मल्याळम)

बेस्टर मेल प्लेबैक सिंगर – केसरी – तेरी मिट्टी – B Praak

बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस – पल्लवी जोशी

बेस्ट स्क्रीन प्ले (डॉयलॉग राइटर) – विवेक रंजन अग्निहोत्री, ताशकंद फाइल सिनेमा

सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शन: अवणे श्रीमनारायण (कन्नड)

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी: महर्षि (तेलुगु)

बेस्ट स्पेशल इफेक्ट : Marakkar Arabikkadalinte Simham (मल्याळम)

स्पेशल ज्युरी अवॉर्ड: Oththa Seruppu Size 7 (तमिळ)

सर्वोत्कृष्ट गीतः कोलांबी- प्रभा वर्मा (मल्याळम)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: डी. इम्मान, विश्वसम सिनेमा (तामिळ)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: प्रबुद्ध बॅनर्जी, ज्येष्ठोपुत्रो सिनेमा (बंगाली)

सर्वोत्कृष्ट मुलांचा चित्रपट: कस्तूरी (हिंदी)

पर्यावरणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट: वॉटर बुरिअल (मोनपा)

सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटः आनंदी गोपाळ (मराठी)

राष्ट्रीय एकात्मतावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटः ताजमहाल (मराठी)

लोकप्रिय मसालापट: महर्षि (तेलुगु)

दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट: मथुकुट्टी झेविअर, हेलन चित्रपटासाठी (मल्याळम)

२०३३ नंतर महाष्ट्रातील तापमानात लक्षणीय वाढWeather In Bhopal - मौसम: 5 डिग्री बढ़ा दिन का तापमान, अभी बारिश के नहीं है  आसार | Patrika News

महाराष्ट्रात २०५० पर्यंत वार्षिक सरासरी तापमानात ०.५ ते २.५ अंश सेल्सिअस अशी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून विशेषत: २०३३ नंतर तापमानातील वाढ प्रकर्षांने जाणवणार आहे.
याचा परिणाम ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, तांदूळ अशा राज्यांतील प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होणार असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
जानेवारी २०१९ मध्ये ‘प्युअर अ‍ॅण्ड अप्लाइड जिओफिजिक्स’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार २०३३ नंतर महाराष्ट्रात लक्षणीय तापमानवाढ अपेक्षित आहे.
पुढील पाच दशकांमध्ये जवळपास ८०% जिल्ह्य़ांमध्ये वार्षिक सरासरी तापमान, वार्षिक किमान तापमान आणि वार्षिक कमाल तापमान यांमध्ये लक्षणीय बदल होणार आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेचा होईल पाच टक्क्यांनी विकासImpact of startups in the Indian economy | Direct benefits | Indirect  benefits

२०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊन वृद्धीदर ५ टक्के होईल, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
कोविड-१९ साथीचा फटका बसल्याने २०२० मध्ये भारतीयअर्थव्यवस्था ६.९ टक्क्यांनी घसरणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेने (यूएनटीएडी) जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, यंदा जगाची अर्थव्यवस्था ४.७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये हा अंदाज ४.३ टक्के होता.
अमेरिकेतील सुधारणेचा मजबूत वेग आणि १.९ लाख कोटी रुपयांचे नवे वित्तीय प्रोत्साहन याचा हा परिणाम आहे.
२०२० मध्ये भारताची घसरण आधी ५.९ टक्के अनुमानित करण्यात आली होती. तथापि, ताज्या अनुमानानुसार घसरण ६.९ टक्के राहील. सन २०२१ मध्ये मात्र भारतीय अर्थव्यवस्था ५ टक्के वृद्धीसह जोरदार पुनरागमन करेल.
मुडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने २०२१ या कॅलेंडर वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर १२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

Related Articles

Back to top button