Current Affairs 24 April 2020
भारतातील प्रदूषण हे २० वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर
करोनापासून बचाव करण्यासाठी भारतासह इतर अनेक देश लॉकडाउन आहेत. अशा स्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणारी दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रूग्णालये, किराणा मालाची दुकाने अशी काही मोजकी आस्थापनेच सुरू आहेत. त्यामुळे कार आणि इतर वाहनांमुळे होणारे प्रदुषणदेखील खूप कमी झाले आहे.
भारतातील प्रदूषण हे २० वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर असल्याचे अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने त्यांच्या उपग्रहाची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात, उत्तर भारतातील वायू प्रदूषण हे विविध वर्षांतील या कालावधीत प्रदुषणापेक्षा यंदाचे प्रदुषण हे २० वर्षातील नीचांकी पातळीवर असल्याचे नमूद केले आहे. करोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी अमेरिकेच्या अंतराळ संस्थेच्या उपग्रहाने सेन्सर्सच्या सहाय्याने सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात भारतात २० वर्षातील सर्वात कमी एरोसोलची पातळी लॉकडाउननंतर आढळली.
“नासाकडून २०१६ पासून दरवर्षी या कालावधीत म्हणजेच वसंत ऋतूमध्ये असे फोटो येतात. यंदाच्या फोटोंमध्ये भारतात हवायुक्त कण (एअरबोन) पातळीत २० वर्षांतील नीचांकी पातळी दिसली आहे. जर भारत आणि जग पुन्हा नव्या उमेदीने काम आणि प्रवास करण्यास तयार आहेत, तर हे खूपच सकारात्मक आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे साऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने हवा स्वच्छ होऊ शकते, हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवावे,” असा संदेश नासाच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाचे कार्यकारी सहाय्यक सचिव एलिस जी वेल्स यांनी ट्वीटद्वारे दिला.
मुकेश अंबानी पुन्हा झाले आशियातील सर्वात श्रीमंत
रिलायन्स जिओ व फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांच्यात झालेल्या भागीदारीनंतर रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
त्यांनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकले आहे. फेसबुकबराेबरच्या भागीदारीनंतर अंबानींची संपत्ती ३५ हजार काेटी रुपयांनी वाढली.
नरेंद्र माेदी फेसबुकवर सर्वात लाेकप्रिय नेते
पंतप्रधान माेदी ४.४७ काेटी लाइक्ससह फेसबुकवर जगातील सर्वात लाेकप्रिय नेते ठरले आहेत. डाेनाल्ड ट्रम्प २.६ काेटींसह दुसऱ्या, तर जाॅर्डनची राणी रानिया १.६८ काेटी लाइक्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. बर्सन काेहन अँड वाेल्फच्या अहवालातील वर्ल्ड लीडर्स अाॅन फेसबुकनुसार माेदींना ४.४७ काेटी लाइक्स मिळाल्या आहेत.
मराठी प्रकाशक संघाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिलीप माजगावकर यांना जाहीर :
जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी देण्यात येणा-या जीवनगौरव पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ प्रकाशक आणि राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर यांची, तर साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, जीवनगौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली.
तर दरवर्षी जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून प्रकाशक संघातर्फे जाहीर समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. मात्र यावर्षी उद्धवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादूभार्वामुळे सध्या केवळ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, भविष्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव संपल्यानंतर या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर आणि प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीने कळविले आहे.
तसेच आत्तापर्यंत जीवनगौरव पुरस्कराने पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, बेळगाव येथील नवसाहित्य प्रकाशनाचे जवळकर बंधू, अमरावती येथील नंदकिशोर बजाज, बॉम्बे बुक डेपोचे पां. ना. कुमठा, परचुरे प्रकाशन मंदिराचे आप्पा परचुरे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. तर, साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने आजपर्यंत द.मा.मिरासदार, निरंजन घाटे आदी साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे.