अल्फिया पठाणने मिळविले जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद
पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावल आहे.
अल्फियाने युवा वर्ल्ड चँपियन झाल्याबद्दल राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तिचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले आहे.
अल्फिया पठाणने पोलंडमधील किल्स येथे झालेल्या एआयबीए पुरुष आणि महिलांच्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत उदयोन्मुख चॅम्पियन बनली.
ज्युनिअर आशियाई विजेती अल्फिया ने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अनुभवी असलेल्या माल्डोवाच्या डारिया ला तीनही फेऱ्या मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करुन पाचही पंचांना आपल्या बाजूने 5-0 अशा फरकाने निर्णय द्यायला भाग पाडून विजय प्राप्त केला.
४७ वे सरन्यायाधीशएस. ए. बोबडे निवृत्त
देशाचे ४७ वे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे शुक्रवारी सेवानिवृत्त झाले.
न्या. शरद बोबडे यांच्याकडून देशाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रं न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांच्याकडे सोपवण्यात येणार आहेत.
आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीशांनी स्वत:हून लक्ष घातलेल्या कोव्हिड १९ संदर्भात सुनावणी केली.
करोना संक्रमण काळ सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरला. तसाच तो सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयासाठीही आव्हानात्मक होता.
परंतु, या काळातही न्या. बोबडे यांनी ५७ प्रकरणांची (२२ मार्च २०२० ते २० एप्रिल २०२१) सुनावणी केली. त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात ९० प्रकरणांची सुनावणी हाताळली.
उल्लेखनीय म्हणजे, २०२० साली सर्वोच्च न्यायालयानं १३७० प्रकरणांत निर्णय सुनावला होता परंतु, करोना संक्रमण फैलावत असताना २०२० साली ही संख्या ६९७ वर सीमित राहिली.
अमेरिकन एक्स्प्रेस बँकेवर निर्बंध
आघाडीची आंतरराष्ट्रीय अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशनवर रिझव्र्ह बँकेने शुक्रवारी नवीन निर्बंध लादले.
यानुसार या बँकेसह डायनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
विदा साठवणूक नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मध्यवर्ती बँकेने ही कारवाई केली आहे.
गेल्याच आठवड्यात अमेरिकास्थित सिटी बँकेने भारतातील व्यवसायातून निर्गमन करत असल्याचे जाहीर केले होते.
माधू क्रांती पोर्टल आणि हनी कॉर्निअर्स
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री यांनी “मधु क्रांती पोर्टल आणि हनी कॉर्नर” सुरू केले.
मधु क्रांती पोर्टल :
– हा राष्ट्रीय मधमाशी पालन मंडळाचा (एनबीबी), राष्ट्रीय मधमाशी पालन व मध मिशन (एनबीएचएम) अंतर्गत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा एक संयुक्त उपक्रम आहे.
– हे पोर्टल ऑनलाईन नोंदणीसाठी विकसित केले गेले आहे जेणेकरुन डिजिटल प्लॅटफॉर्मवर मध आणि इतर मधमाश्या उत्पादनांचा स्रोत मिळविला जाऊ शकेल.
– हे वेब-प्लॅटफॉर्म मधाची भेसळ रोखण्याचे प्रमाण कमी करणे आणि भेसळ स्त्रोत तपासण्यात मदत करेल.
हनी कॉर्नर
– मध खरेदी आणि मध विक्रीसाठी ‘हनी कॉर्नर’ ही विशेष जागा आहेत.
– हे नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड) चालविते.
जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा : सचिनमुळे भारताचे सुवर्णाष्टक साकार
सचिनने जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत शुक्रवारीभारताचे सुवर्णाष्टक साकारले.
पोलंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला बॉक्सिंगपटूंनी सात आणि पुरुषांमध्ये सचिनने सुवर्णपदकांची कमाई केल्यामुळे स्पर्धेखेरीस भारताच्या नावावर एकूण आठ सुवर्ण जमा झाले.
सचिनने पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येर्बोलट सॅबीला ४-१ असे नमवले. सचिनने अंतिम लढतीतील पहिल्या फेरीत येर्बोलटने ३-२ अशी आघाडी मिळवली.
२०१६नंतर प्रथमच एखाद्या भारतीय पुरुष बॉक्सिंगपटूने या स्पर्धेत जेतेपद मिळवले.
गुरुवारी गितिका, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, विन्का, अरुंधती चौधरी, सानामचा चानू आणि अल्फिया पठाण यांनी महिलांच्या विविध गटांत सात सुवर्णपदकांवर नाव कोरले.
त्यापूर्वी, पुरुषांच्या अन्य गटांतील उपांत्य फेरीत अंकित नरवाल (६४ किलो), विश्वमिता चोंगथोम (४९ किलो) आणि विशाल गुप्ता (९१ किलो) यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
प्रत्येकी १० पुरुष आणि महिला बॉक्सर्ससह या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताने पदकतालिकेत अग्रस्थान मिळवण्याची किमया साधली.
तब्बल ५२ देशांतील ४१४ बॉक्सर्समध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्वाधिक आठ सुवर्णांसह तीन कांस्यपदक जिंकून एकूण ११ पदके पटकावली. दुसऱ्या क्रमांकावरील रशियाला एकच सुवर्णपदक मिळवता आले.