⁠
Uncategorized

चालू घडामोडी : २४ ऑगस्ट २०२०

Current Affairs : 24 August 2020

‘सौदी अरामको’चा चीनसोबतचा १० अब्ज डॉलर्सचा करार रद्द

saudi aramco
  • जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाची तेल कंपनी ‘अरामको’नं चीनसोबतचा १० अब्ज डॉलर्सचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या कराराअंतर्गत अरामको चीनसोबत एक रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणार होती.
  • करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचं गणित बिघडलं असल्याचं म्हटलं जात आहे.
  • कच्च्या तेलाची किंमत आणि वाढत्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर ७५ अब्ज डॉलर्सचे डिविडंट कायम ठेवण्यासाठी अरामको आपल्या खर्चात कपात करण्याची योजनाही तयार करत आहे.
  • सौदी अरामकोनं या वर्षांच्या सुरूवातीला रिफायनरीच्या विस्ताराच्या योजनेसाठी इंडोनेशियाच्या एका कंपनीशी चर्चा केली होती. परंतु त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली होती.

महात्मा गांधीजींच्या चष्म्यांचा युकेमध्ये लिलाव

spectacles of gandhiji
  • इंग्लंडमध्ये असताना महात्मा गांधींनी वापरलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या दोन चष्म्यांचा युकेमध्ये लिलाव झाला.
  • या लिलावात या चष्म्यांना तब्बल अडीच कोटी रुपये (२,६०.००० पौंड) इतकी किंमत मिळली.
  • युकेतील ब्रिस्टॉल येथे पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेत केवळ सहा मिनिटांमध्ये हे चष्मे तब्बल अडीच कोटी रुपयांना विकले गेले.
  • एका अमेरिकन व्यक्तीने ज्याला जुन्या वस्तू जमवण्याचा छंद आहे, त्याने हे चष्मे विकत घेतले आहेत.
  • स्वतः गांधीजींनी त्यांच्या काकांना सन १९२० मध्ये दक्षिण अफ्रिकेत असताना हे चष्मे भेट दिले होते. गरजवंतांना स्वतःजवळील वस्तू भेट देण्याची गांधीजींची ही वृत्ती सर्वांनाच माहिती आहे.
  • गांधींजी जेव्हा सन १८००च्या शेवटी इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेत होते. तेव्हा ते अशा प्रकारच्या गोल काचांचे चष्मे वापरत होते.

UEFA फुटबॉल स्पर्धा : बायर्न म्युनिचने पटकावले विजेतेपद

bayern munich
  • UEFA Champions League : प्रतिष्ठेच्या UEFA Champions League स्पर्धेत इस्टेडिया दा लुझ स्टेडियमवर झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात बायर्न म्युनिचने विजेतेपद पटकावले. हे त्यांचे सहावे विजेतेपद ठरले.
  • पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठलेल्या पॅरिस सेंट-जर्मन संघाला त्यांनी १-०ने पराभूत केले.
  • १९७४, १९७५, १९७६ असे सलग तीन वर्ष विजेतेपद मिळवणाऱ्या बायर्न म्युनिचला त्यानंतर विजेतेपदासाठी खूप वाट पाहायला लागली.
  • २००१ आणि २०१३ साली त्यांना विजेतेपद मिळाले होते. त्यानंतर यंदा विनाप्रेक्षक खेळण्यात आलेल्या या स्पर्धेत त्यांनी विजेतेपदाचा षटकार मारला.
  • या विजेतेपदासोबतच स्पर्धेत एकही सामना न हारणारा बायर्न म्युनिच हा युरोपियन देशांमधील पहिला संघ ठरला. स्पर्धा सुरू झाल्यापासून सलग ११ सामने जिंकत त्यांनी हे विजेतेपद मिळवले.
  • सहा वेळा विजेतेपद मिळवून बायर्न म्युनिचने लिव्हरपूलशी बरोबरी केली. सर्वाधिक वेळा स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या यादीत रियल माद्रिद (१३) अव्वल तर एसी मिलान (७) दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे.

जॅक कॅलिस, झहीर अब्बास यांचा ICC Hall of Fame मध्ये समावेश

Image
  • दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस, पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज झहीर अब्बास आणि जन्माने पुण्याची असलेली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांचा ICC च्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या Hall of Fame मध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • रविवारी ICC च्या व्हर्च्युअल कार्यक्रमात तिन्ही दिग्गज खेळाडूंना हा सन्मान देण्यात आला.
  • जॅक कॅलिसने दक्षिण आफ्रिकेकडून १६६ कसोटी, ३२८ वन-डे आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत.
  • १९९५ ते २०१४ या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कॅलिस हा आपल्या अष्टपैलू खेळीसाठी ओळखला जायचा.
  • कसोटीत १३ हजार २८९ तर वन-डे क्रिकेटमध्ये ११ हजार ५७९ धावा खात्यात जमा असलेल्या कॅलिसने अनुक्रमे २९२ आणि २७३ बळी घेतले आहेत. कसोटी आणि वन-डे मध्ये १० हजारपेक्षा जास्त धावा आणि किमान २५० बळी घेणारा कॅलिस हा एकमेव खेळाडू होता.
  • याव्यतिरीक्त ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल लिसा स्थळेकरचंही कौतुक करण्यात आलं

महाराष्ट्रात आशियातील सर्वात माेठे बांबू रिसर्च सेंटर

महाराष्ट्राचा नक्षलग्रस्त भाग चंद्रपुरात तयार केलेल्या आशियातील सर्वात माेठ्या बांबू प्रशिक्षण अाणि संशाेधन केंद्र आहे.
चिचपल्ली येथे चार एकरांवर १०० काेटींचा खर्च करून हे सेंटर तयार करण्यात आले. यासाठी दीड लाख टन बांबूंचा वापर केला.
या ठिकाणी आदिवासी महिला आणि युवांसाठी खास डिप्लाेमा सुरू करण्यात आला. यात प्रशिक्षण घेतलेल्या हजार महिलांनी ७६ प्रकारच्या वस्तू तयार केल्या. याच्या विक्रीसाठी शासनाने नुकताच अॅमेझाॅनसाेबत करार केला आहे.

Related Articles

Back to top button