Current Affairs : 24 December 2020
पंतप्रधान मोदींना ट्रम्प सरकारतर्फे “लेजिऑन ऑफ मेरीट’ पुरस्कार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनातर्फे लेजिऑन ऑफ मेरीट हा पुरस्कार देण्यात आला आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी नवीन उंचीवर नेण्याच्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रियन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तो मोदींच्यावतीने भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीतसिंग संधु यांनी स्वीकारला.
अमेरिकेतील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आणि हा पुरस्कार प्राप्त झालेले मोदी हे भारताचे पहिले राष्ट्रप्रमुख ठरले आहेत.
मोदींबरोबरच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन आणि माजी जपानी पंतप्रधान शिंजो अबे यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.
त्या दोन्ही देशांच्या राजदूतांनी हे पुरस्कार स्वीकारले. ट्रम्प प्रशासनातर्फे यावेळी अन्यही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
फेडरर, नदाल, जोकोव्हिच एटीपी पुरस्काराचे मानकरी
ल नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडरर, राफेल नदाल तसेच फ्रान्सेस टियाफोए हे यंदाच्या मोसमातील एटीपीच्या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
जोकोव्हिटने सलग सहाव्यांदा वर्षअखेर अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. त्याने यंदा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आठव्या जेतेपदासह चार विजेतेपदे पटकावली.
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवणारे मेट पॅव्हिच आणि ब्रूनो सोरेस ही दुहेरीतील अव्वल जोडी ठरली.
फेडररने एकेरीतील चाहत्यांच्या पसंतीचा पुरस्कार सलग १८व्या वर्षी पटकावला.
नदालला स्टीफन एडबर्ग खिलाडीवृत्ती पुरस्काराने सलग तिसऱ्या वर्षी सन्मानित करण्यात आले. रशियाचा आंद्रेय रुबलेव्ह हा सर्वोत्तम प्रगतिकारक टेनिसपटू ठरला.
रतन टाटा यांना एफआयआयसीसीने केले सन्मानित
फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायल चेंबर ऑफ कॉमर्स (एफआय आयसीसी)ने ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना प्रतिष्ठेचा ग्लोबल व्हिजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस ॲण्ड पीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
तर एकता, शांती आणि स्थिरता यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एका व्हर्च्युअल कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एकता,शांतता आणि स्थैयर् यांचे प्रतीक असलेल्या टाटा यांचा भारत, इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमिराती येथील उद्योग जगतामध्ये आदर केला जातो. म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली गेली आहे.
भारताकडून आणखी एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने मध्यम पल्ल्याच्या आणखी एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
जमिनीवरून हवेत मारा करू शकणारे ते क्षेपणास्त्र (एमआरएसएएम) ओडिशाच्या किनारपट्टीलगत असणाऱ्या तळावरून डागण्यात आले.
जमिनीवरील मोबाईल लॉंचरवरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यभेद केला.
चाचणीवेळी बन्शी हे मानवरहित विमान (यूएव्ही) हवेत सोडण्यात आले. त्यावर काही क्षणांत क्षेपणास्त्राने नेमकेपणाने मारा केला.
भारत डायनॅमिक्स लि.कंपनीने त्या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. संबंधित क्षेपणास्त्र 70 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते.
आता युवा शेतकरी पुरस्कार; प्रयोगशील शेतकऱ्यांसाठीच्या पुरस्कारांमध्ये वाढ
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढविण्यात आली आहे.
आता 63 ऐवजी 99 पुरस्कार दरवर्षी दिले जातील.
या वर्षापासून “युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश करण्यात आला असून काही पुरस्कारांचे निकष बदलण्यात आल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
राज्य शासनामार्फत सन 1967 पासून कृषिक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार व शेतीनिष्ठ या पुरस्कारांचा समावेश आहे.