Current Affairs : 24 October 2020
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सहा भारतीय भाषा
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अनेक भारतीय भाषांना बॅलेट मतदान पद्धतीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये हिंदीबरोबरच तेलगु, गुजराती, पंजाबी, तमीळ भाषांनाही स्थान देण्यात आलं आहे.
मिलन वैष्णव यांनी बॅलेट बॉक्सचा फोटो शेअर केला असून यामध्ये इंग्रजीबरोबरच हिंदी, तेलगु, गुजरातीसहीत एकूण पाच वेगवेगळ्या भाषा दिसत आहेत. दुसऱ्या एक ट्विटमध्ये हा फोटो कॅलिफोर्नियामध्ये काढण्यात आल्याचं मिलन यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्या एका युझरने सॅण्टा क्लॅरा कंट्रीमध्ये मतदारांना ईमेलच्या माध्यमातून मत देताना सहा भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये तामिळ, तेलगु, पंजाबी, हिंदी, गुजराती आणि नेपाळी भाषांचा समावेश आहे.
वेबिनारमध्ये ८७ हजार लोक, गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद
मार्ग ईआरपीने जगातील सर्वात मोठा वेबिनार घेऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. एका बिझनेस वेबिनारमध्ये ८४,०२३ लोकांनी भाग घेतला. हा वेबिनार अडीच तास चालला. मार्ग ईआरपीचे अध्यक्ष अनुपसिंह म्हणाले की, यापुढेही मध्यम,लघुउद्योगांच्या मदतीसाठी वेबिनार आम्ही घेऊ.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. सुजित पाटील यांची ज्युरी म्हणून निवड
बालरोग तज्ञ तथा सिने दिग्दर्शक डॉ.सुजित पाटील यांची तेहरान या देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी म्हणून निवड करण्यात आली आहे.
संपूर्ण भारतातून ज्युरी म्हणून केवळ त्यांचीच निवड करण्यात आली आहे.
डॉ. सुजित पाटील यांच्या दोन्ही लघुपटांना आंतरराष्ट्रीयस्तरावर अॅवार्ड मिळाले आहेत.
त्यांच्या काश या लघुपटाला जागतिकस्तरावर मान्यता मिळाल्याने आता गुजरातमध्ये होणाऱ्या फिल्म फेस्टिवलसह तेहरान या देशात होणाऱ्या चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे.