Current Affairs : 24 September 2020
DRDO कडून ‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी
स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी केली.
बुधवारी ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथून सोडण्यात आलं.
“३५० किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-३ मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं,”
पृथ्वी हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे १५० किलोमीटर ते ६०० किलोमीटरपर्यंतचाही पल्ला गाठू शकतं. पृथ्वी या सीरिजची तीन क्षेपणास्त्र आहेत. पृथ्वी-I, II, III ही क्षेपणास्त्र असून त्यांची मारक क्षमता अनुक्रमे १५० किलोमीटर, ३५० किलोमीटर आणि ६०० किलोमीटर इतकी आहे.
पंतप्रधान मोदींचा टाइम मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश
अमेरिकेतील सुप्रसिद्ध नियतकालिक टाइम मॅगझिनने जगातील सर्वाधिक प्रभावशाली १०० व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.
या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आला आहे.
परंतु आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आलं आहे.
याव्यतिरिक्त या यादीत गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामिल असलेल्या बिल्किस यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
रेल्वे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं निधन
रेल्वे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्ये निधन झालं. सुरेश अंगडी हे ६५ वर्षांचे होते.
करोनाने निधन झालेले ते कर्नाटकातील दुसरे खासदार आहेत. याआधी अशोक गस्ती यांचे काही दिवसांपूर्वी करोनाने निधन झाले.
गस्ती हे राज्यसभेचे खासदार होते.
चार वेळा ते बेळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.