Tuesday, May 24, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
  • Home
  • Article
  • Video
  • Download
  • Lokrajya
  • MPSC Advertisement
  • Book List
  • Syllabus
  • Become a Guest Writer
  • Contact Us
  • Copyright
ADVERTISEMENT

Current Affairs – 25-26 September 2018

Rajat Bhole by Rajat Bhole
September 27, 2018
in Daily Current Affairs
0
fifa 2018
WhatsappFacebookTelegram

सुप्रीम कोर्टाकडून आमदार, खासदारांची वकिली शाबूत

deepsthabha advt deepsthabha advt deepsthabha advt
ADVERTISEMENT
  • वकील असलेल्या आमदार व खासदारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमावलीत आमदार व खासदार असलेल्या वकिलांच्या प्रॅक्टीसवर निर्बंध आणण्याची तरतुद नसल्याने आमदार व खासदारांनाही वकिली करता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.
  • सुप्रीम कोर्टाने खासदार व आमदार म्हणून कार्यरत असताना वकिलांना कोर्टात प्रॅक्टीस करता येईल. यावर कोणत्याही स्वरुपाचे निर्बंध नाहीत, असे स्पष्ट केले.
  • दरम्यान, राजकारणातील गुन्हेगारीकरणावरही सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुप्रीम कोर्ट लक्ष्मणरेषा ओलांडून संसदेच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही. मात्र, उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती ठळक शब्दात द्यावी, असे कोर्टाने स्पष्ट केले.

भारताच्या मंगळयानास चार वर्षे पूर्ण

  • भारताच्या मंगळ मोहिमेला चार वर्षे पूर्ण झाली असून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(इस्रो) ही मोहीम कमी काळात यशस्वी केली होती. इस्रोने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी सोडलेले यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत स्थापित केले होते. मंगळयानाचा आयुष्यकाल सहा महिने होता पण गेली चार वर्षे हे यान मंगळावरून संदेश पाठवत आहे.
  • एकाच फ्रेममध्ये मंगळाचा पूर्ण वेध घेणारे हे पहिलेच यान ठरले. मंगळाच्या एकदम टोकाला असलेल्या डिमॉस या नैसर्गिक उपग्रहाची छायाचित्रेही यानाने टिपली आहेत.मंगळावर पाठवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने ९८० छायाचित्रे पाठवली होती. मंगळाचा संपूर्ण नकाशा तयार करण्यात ‘मॉम’ने यश मिळवले होते.

हिमालयाच्या कुशीतील पाकयाँग विमानतळ

  • हिमालयाच्या पर्वतरांगातील सिक्कीम राज्याला पाकयाँग विमानतळाच्या रुपात आज पहिलं विमानतळ मिळालं आहे. राज्यातील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. पाकयाँग विमानतळामुळे आता सिक्कीमही देशाच्या हवाई नकाशावर आले आहे. देशात सर्वाधिक उंचीवर असलेल्या पाच विमानतळांपैकी हे एक आहे.
  • स्पाइस जेट कंपनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून या विमानतळावरून सेवा देणार आहे. कोलकात्ता ते पाकयाँग अशी विमानसेवा सुरूवातीच्या काळात चावली जाणार आहे.
  • या विमानतळाकडे अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम म्हणून पाहिले जात आहे. हे विमानतळ समुद्रसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर असून ते २०१ एकर क्षेत्रावर विस्तारलं आहे.

फिफा सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 

  • फुटबॉलच्या वैयक्तिक पुरस्कारांमध्ये लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे दशकभरापासूनचे साम्राज्य प्रथमच खालसा झाले आहे. यंदा फिफाचा वर्षभरातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार क्रोएशियाचा मध्यरक्षक ल्युका मॉडरिचला झाल्याने त्या दोघांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.
  • सर्वोत्तम गोल सलाहचा, गोलरक्षक थिबॉ
    या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलचा पुरस्कार सलाहला देण्यात आला. एव्हर्टन क्लबविरुद्धच्या सामन्यात गत डिसेंबर महिन्यात केलेल्या गोलची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. तर बेल्जियमचा गोलरक्षक थिबॉ कोर्टाइस याला सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक देशॉ
    फ्रान्सचे प्रशिक्षक डिडीएर देशॉ यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. फ्रान्सला विजेतेपद मिळवून देण्यात त्यांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची होती.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे रविवारी दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना असून जिचा ५० कोटी पेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे. आयुष्मान भारत गेमचेंजर ठरेल. देशातील गरीब जनतेची सेवा करण्याच्या दिशेने उचलेले हे एक पाऊल आहे.
Tags: chalu ghadamodiCurrent Affairs in MarathiMPSC Current Affairs
SendShare128Share
Next Post
ayushman-bharat_official-logo

आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)

supreme court adhaar verdict

Current Affairs – 27 September 2018

supreme court

Current Affairs – 28-29 September 2018

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • MPSC Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
    • Lokrajya
  • MPSC
    • Announcement
    • MPSC Advertisement
    • MPSC Exams
      • Rajyaseva
      • PSI STI ASO Combine Exam
      • Other Exams
    • Syllabus
    • Book List
    • Question Papers
    • Answer Key
  • Study Material
    • History
    • Geography
    • Indian Polity
    • Economics
    • Science
    • Current Updates
    • Government Schemes
    • Environment and Ecology
    • Samaj Sudharak
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group