देशातील ४० टक्के खनिज झारखंडमध्ये; ५० वर्षे पुरेल कोळशाचा साठा
कोळसा साठ्यात झारखंडला देशात पहिला क्रमांक, लोखंडामध्ये दुसरा, तांब्यात तिसरा क्रमांक आहे.
देश खनिजासाठी बहुतांशी झारखंडवर अवलंबून आहे. कारण, येथे ४०% खनिज साठा आहे. झारखंडमधील कोळसा साठा ५० वर्षे पुरेल, तर युरेनियम २० वर्षांपर्यंत आणि तांब्याचे खनिज २५ वर्षांपर्यंत झारखंडमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या नव्या खाणीही सापडत आहेत. आयआयटी आयएसएम धनबादच्या संशोधनात आढळून आले की, झारखंडला ५० वर्षांपर्यंत खनिजांची कमतरता भासणार नाही.
तरीही झारखंडची जीडीपी देशात १९ व्या क्रमांकावर आहे. तर उत्खननात झारखंडच्या मागे मध्य प्रदेश नवव्या, राजस्थान १० व्या आणि छत्तीसगड १८ व्या क्रमांकावर आहे.
मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती.
सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने यापूर्वीच दिली.
आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या विमानतळाच्या देखबालीचे आणि हाताळणीचे कंत्राट गौतम अदानी यांच्या समुहाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अदानी समुहाचा जीव्हीके समुहासोबत असलेला वाद शमल्यानंतर मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या मुंबई विमानतळाच्या देखभालीचं आणि हाताळणीचं कंत्राट जीव्हीके समुहाकडे आहे.
इशांत शर्मा आणि दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड
भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
31 वर्षीय इशांत शर्मा सध्या आयपीएलच्या निमीत्ताने युएईत आहे.
गेल्या 13 वर्षांच्या अथक मेहनतीचं फळ मला अर्जुन पुरस्काराच्या माध्यमातून मिळालं असल्याचं इशांत म्हणाला.
इशांतसोबत भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू दिप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.