⁠  ⁠

चालू घडामोडी : २५ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 25 February 2020

नेमबाजी, तिरंदाजीच्या राष्ट्रकुलचे भारताला यजमानपद!

भारताला जानेवारी २०२२मधील राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. तसेच त्या स्पर्धामधील पदकांचा समावेश हा २०२२मध्ये बर्मिगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत करण्यात येईल, असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या वतीने (सीजीएफ) स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थातच पदकांचा समावेश हा बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर आठ दिवसांनी करण्यात येणार आहे.
बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी आणि तिरंदाजी हे दोन खेळ पर्यायी खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आले. परिणामी भारताने बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवरभारताला राष्ट्रकुल नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद देणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. या दोन्ही स्पर्धा भारतात चंडीगड येथे जानेवारी २०२२मध्ये होतील. बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहेत.
‘‘चंडीगड २०२२ आणि बर्मिगहॅम २०२२ या दोन स्पर्धाचे स्वतंत्ररीत्या आयोजन होणार आहे. बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा संपायच्या एक आठवडा आधी पदक तालिका घोषित करण्यात येईल. त्यात चंडीगड २०२२मधील पदक विजेत्यांचा समावेश करण्यात येईल. अर्थातच त्यानंतर स्पर्धेतील सहभागी देशांची क्रमवारी ठरवण्यात येईल,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारत-अमेरिकेमध्ये आज ३ अब्ज डॉलरचे करार

pm

भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीसंबध अधिक दृढ व्हावेत यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज, मंगळवारी अत्यंत महत्त्वाची चर्चा होत असून, ३ अब्ज डॉलरच्या करारांवर या चर्चेत शिक्कामोर्तब होऊन त्यांची घोषणा केली जाणार आहे.
अमेरिका भारताला अत्याधुनिक लष्करी हेलिकॉप्टरांसह अन्य लष्करी साहित्यांची विक्री करणार असून, त्या सर्व व्यवहारांची एकूण रक्कम ३ अब्ज डॉलरच्या घरात जाणार आहे. या करारांविषयीची माहिती ट्रम्प यांनी सोमवारी ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमातील भाषणात दिली. याच करारांवर मंगळवारी ट्रम्प-मोदी यांच्या सह्या होणार आहेत.
‘अमेरिका भारताला जगातील सर्वोत्तम आणि सर्वात भेदक लष्करी सामग्री देणार आहे. अमेरिका जगातील सर्वोत्तम शत्रे बनवते. मग ती विमाने, जहाजे असोत की क्षेपणास्त्र आणि रॉकेट’, असे सांगत, आम्ही आता भारताशी करार करत आहोत आणि अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा आणि सशस्त्र तसेच निशस्त्र हवाई वाहनांचा या करारांमध्ये समावेश असेल’, असे ट्रम्प म्हणाले. भारत अमेरिकेकडून २४ ‘एमएच-६० रोमिओ हेलिकॉप्टर’ (२.६ अब्ज डॉलर) आणि ६ एएच- ६४ ई अपाचे हेलिकॉप्टर (८० कोटी डॉलर) विकत घेणार आहे.
व्यापार करारा’बाबत अनिश्चितताच
संरक्षणविषयक करारासह ट्रम्प आणि मोदी यांच्यात व्यापार, गुंतवणूक या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेत एच१बी व्हिसा, उर्जा, धार्मिक स्वातंत्र्य, अफगाणिस्तानातील तालिबानबरोबरचा प्रस्तावित शांतता करार, इंडो-पॅसिफिक भागातील परिस्थिती यांचाही समावेश असेल, असे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय, बौद्धिक संपदा हक्क, व्यापारसुलभता आणि देशाची अंतर्गत सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याविषयी पाच करारही मंग‌ळवारी होतील, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी जाहीर केले होते.
करार’नामा
-२४ ‘एमएच-६० रोमिओ हेलिकॉप्टर’ (२.६ अब्ज डॉलर)
-सहा एएच- ६४ ई अपाचे हेलिकॉप्टर (८० कोटी डॉलर)
-इतरही लष्करी सामग्री, यंत्रणा
-बौद्धिक संपदा हक्क, व्यापारसुलभता, अंतर्गत सुरक्षा क्षेत्रविषयी सहकार्य करार

मलेशियाचे पंतप्रधानमहाथीर यांचा राजीनामा

मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी राजीनामा दिला. त्यांच्या बेरास्तू या पक्षाने सरकारची साथ सोडल्याने त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. ते जगातील सर्वांधिक ज्येष्ठ (वय ९४) नेते आहेत. त्यांनी दहा मे २०१८ रोजी सूत्रे घेतली होती.
देशात गेल्या काही आठवड्यांपासून राजकीय अस्थिरता आहे. महाथीर यांचे वारसदार मानले जाणाऱ्या अन्वर इब्राहिम यांना सत्तेपासून रोखण्यासाठी राजकीय प्रयत्न केले जात आहेत.

Share This Article