चालू घडामोडी : २५ नोव्हेंबर २०२०
Current Affairs : 25 November 2020
एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर
टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी बिल गेट्सना मागे टाकत जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे.
४९ वर्षीय एलन मस्क यांची नेटवर्थ १२७.९ अरब डॉलर्स इतकी झाली आहे. टेस्लाचे शेअर्स उंचावल्याने त्यांचं नेटवर्थ वाढलं आहे.
टेस्लाची मार्केट व्हॅल्यू आता ४९१ अरब डॉलरपर्यंत पोहचली आहे.
जानेवारी महिन्यात एलन मस्क हे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर होते.
चीनने चंद्रावर पाठवले यान
चीनने आपला चांग ई-५ यान प्रक्षेपित केले आहे. जवळपास चार दशकानंतर चिनी अंतराळ यान पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.
या मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरून तिथले खडक आणि अन्य अवशेष पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न चीन करणार आहे.
भारतीय वेळेनुसार पहाटेच्या सुमारास चीनचा शक्तिशाली यान लाँग मार्च-५ या रॉकेटने हेनान प्रांतातून उड्डाण घेतले. ही चीनची सर्वांत महत्त्वाकांक्षी
चांद्रमोहीम आहे.
चार दशकांत प्रथमच एखाद्या देशाने चंद्रावरून पृथ्वीवर खडक व अन्य अवशेष आणण्याचा प्रयत्न केला आहे. या मोहिमेमुळे चंद्राचे वय, तिथली संसाधने आणि सौरयंत्रणेबद्दल माहिती मिळू शकणार आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावरून खाली दोन मीटरपर्यंत (सुमारे ७ फूट) खणून दोन किलो खडक आणि माती असे अवशेष पृथ्वीवर आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. विशेष म्हणजे, १९६० आणि ७०च्या दशकानंतर अमेरिका आणि रशियाच्या मोहिमांनंतर पहिल्यांदाच शास्त्रज्ञांना चंद्रावरील अवशेषांचा अभ्यास करता येणार आहे.
‘आयसीसी’ पुरस्कारांत विराटला पाच नामांकने
भारताचा कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) दशकातील सर्वोत्तम कामगिरी आधारे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी पाच विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे.
प्रतिष्ठेच्या दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूसाठी विराटसह फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही नामांकन प्राप्त झाले आहे.
या दोन भारतीयांशिवाय जो रूट, के न विल्यम्सन, स्टीव्ह स्मिथ, एबी डीव्हिलियर्स आणि कु मार संगकारा हेसुद्धा शर्यतीत आहेत.
दशकातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी विराट आणि रोहित यांच्याशिवाय रशीद खान, इम्रान ताहीर, आरोन फिंच, मलिंगा आणि ख्रिस गेल यांना नामांकन मिळाले आहे.
‘आयसीसी’च्या सद्भावना पुरस्कारासाठी विराट आणि धोनी यांचे नाव नामांकन यादीत आहे. तिन्ही प्रकारच्या क्रि के टमध्ये एकू ण ७० शतके विराटच्या नावावर असून, सर्वाधिक शतके नोंदवणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन तेंडुलकर (१००) पहिल्या आणि रिकी पाँटिंग (७१) दुसऱ्या स्थानावर आहे.
सर्वाधिक एकूण धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराट (२१,४४४ धावा) सचिन आणि पाँटिंगनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. खेळाडूंना मिळणाऱ्या मतांद्वारे पुरस्कारांची निवड होणार आहे.