Current Affairs 25 October 2019
ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचा गौरव
– पंचायत राज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाला केंद्रीय पंचायती राज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने’ गौरवण्यात आले.
– अहमदनगर जिल्ह्यातील लोणी (बु) ग्रामपंचायतीला ‘नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराने’ तर राज्यातील एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि १४ ग्रामपंचायतींना ‘दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
– केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने येथील पुसा परिसरातील सी सुब्रमण्यम सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार-२०१९’ चे वितरण केले.
– या कार्यक्रमात पंचायत राज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी एकूण ५ श्रेणींमध्ये देशातील विविध राज्ये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना एकूण २४६ पुरस्कार वितरित करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राला तीन श्रेणींमध्ये एकूण १९ पुरस्कार प्रदान केले.
– कोल्हापूर जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्ह्यातील राहता पंचायत समिती आणि बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पंचायत समितीला ‘दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
गोव्यात रोजगाराच्या निर्मितीसाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाचा पुढाकार
– गोव्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) आणि गोवा सरकार यांच्यात करार झाला आहे. या उपक्रमांनी KVICने यापूर्वीच १,००० लोकांना रोजगार मिळवून देण्यात मदत केली आहे.
– या कराराच्या अंतर्गत १६० कुटुंबांना इलेक्ट्रिक पॉटर व्हील, ५० प्रशिक्षित महिलांना नव्या पद्धतीचे चरखे (स्पिनिंग व्हील्स) वाटप केले गेले.
– त्यामुळे ७०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार. त्यासाठी मोरझिम, जुना गोवा, पंजिम, बिचोलीम, साखाली, मप्पासा, दाभाल आणि मडगाव अशा अनेक खेड्यांमधल्या लाभार्थींना ओळखले गेले आहे.
– याशिवाय, गोव्यात लिज्जत पापड उद्योगाचे एक केंद्र उभारले जाणार आहे, ज्यामुळे २०० स्थानिक महिलांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.
खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) काय आहे?
– खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) हे एक वैधानिक मंडळ आहे, ज्याअंतर्गत ग्रामीण विकासात गुंतलेल्या इतर संस्थासह समन्वयाचे ग्रामीण भागात खादी व इतर ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्यक्रमांचे नियोजन, जाहिरात, आयोजन व अंमलबजावणी करण्यास सदैव कार्यरत असते. KVIC ची स्थापना १९५६ साली झाली आणि त्याचे मुंबईमध्ये मुख्यालय आहे.
मोटो जीपी : वेलेंटिनो रोसी ठरला ४०० व्या ग्रांप्रीमध्ये सहभागी हाेणार पहिला रायडर
– फिलिप आयलंड (ऑस्ट्रेलिया)| सात वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन रायडर वेलेंटिनी रोसीने ऑस्ट्रेलियन ग्रांप्री स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ही त्याच्या करिअरमधील ४०० वी माेटाे ग्रांप्री आहे.
– सर्वाधिक ग्रांप्रीमध्ये सहभागी हाेणारा राेसी हा जगातील पहिला माेटार सायकल रायडर ठरला आहे.
– सर्वाधिक अनुभवी असलेल्या ४० वर्षीय राेसीने १९९६ मध्ये १२५ सीसी क्लास रेसमध्ये सहभाग घेतला हाेता. ही त्याच्या करिअरमधील पहिली रेस हाेती. त्याने फिलिप आयलंडच्या सर्किटवर सर्वात यशस्वी रायडर हाेण्याचा पराक्रम गाजवला. त्याने प्रीमियर क्लासमध्ये ६ आणि २५० सीसीमध्ये दाेन वेळा किताब जिंकला आहे.
चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.