Current Affairs : 25 September 2020
अणू शास्त्रज्ञ पद्मश्री शेखर बसू यांचं निधन
अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मक्षी डॉ. शेखर बसू यांचं करोनामुळे निधन झालं.
अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राहिलेल्या डॉ. बसू यांना २०१४मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
डॉ. बसू हे मॅकेनिकल इंजिनिअर होते. देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. खास बाब म्हणजे डॉ. शेखर बसू यांनी अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी अत्यंत कठीण असणारी अणुभट्टी देखील तयार केली होती.
मल्याळम कवी नंबुद्रींना ५५ वा ज्ञानपीठ पुरस्कार
प्रख्यात मल्याळम कवी अक्कितम अच्युतन नंबुद्री यांना ५५ वा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जाईल.
नंबुद्रींना बालपणापासूनच साहित्य आणि कला क्षेत्रात रस होता. त्यांची ४५ पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कविता,कादंबरींचा समावेश आहे.
भारतात पुस्तके निर्जंतूक करणाऱ्या यंत्राचा शोध
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध गोष्टी निर्जंतूक करण्यासाठी अनेक उत्पादने बाजारात आली आहेत.
पुस्तकांद्वारे करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नॉर्थ-इस्टर्न हिल विद्यापीठाची (एनईएचयू) टीम सरसावली. नवनिर्मिती करणाऱ्या या टीमने पुस्तके निर्जंतूक करण्याच्या यंत्राचा शोध लावला आहे.
एनईएचयूच्या बायोमेडिकल इंजिनीअरिंग आणि बेसिक सायन्स व सोशल सायन्स विभागाच्या नवनिर्मिती करणाऱ्या टीमने हे यंत्र विकसित केले.
‘हे यंत्र स्वयंचलित असून याद्वारे कोणत्याही प्रकारचे वाचनाचे साहित्य निर्जंतूक करता येईल. यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही,’ असे या टीमचे सदस्य असलेले डॉ. असीम सिन्हा यांनी सांगितले.
हे यंत्र पुस्तकांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी अतिनील किरणे आणि उष्णता तंत्रज्ञानाचा वापर करते. ते एका चक्रात १५० पुस्तके २० पैसे प्रति पुस्तक या किंमतीत निर्जंतूक करू शकते. यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी लागतो, असेही सिन्हा यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा माजी खेळाडू डॅन जोन्सचं निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 59 होते.
डीन जोन्स यांनी अनेक देशांच्या क्रिकेट टीमसाठी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. डीन यांनी ऑस्ट्रेलियासाठी टेस्ट आणि वनडे क्रिकेट खेळलं आहे. त्यांच्या नावावर टेस्ट क्रिकेट प्रकारात अनेक रेकॉर्ड आहेत. जोन्स वनडेमध्ये आपल्या बॅटींग आणि फील्डिंग प्रसिद्ध होते.
80 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 90 च्या दशकाच्या प्रारंभी डीन जोन्सला जगातील सर्वोत्तम वन डे फलंदाजांपैकी एक मानले जात असे. फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज या दोघांविरूद्ध तो सर्वोत्कृष्ट फलंदाज होता.
विकेट्स दरम्यान धावण्याच्या बाबतीत तो आश्चर्यकारक मानला जात असे. 2019 मध्ये त्याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले होते.