---Advertisement---

चालू घडामोडी – २6 एप्रिल २०१६

By Tushar Bhambare

Published On:

chalu-ghadamodi-current-affairs-in-marathi
---Advertisement---
देश-विदेश

ट्रम्प यांना रोखण्यासाठी क्रुझ-कसिच यांची युती
अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडण्याच्या शर्यतीला नवे वळण मिळाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्राथमिक फेऱ्यांत घेतलेली आघाडी पाहता त्यांना रोखण्यासाठी त्यांच्याच पक्षातील टेड क्रुझ आणि जॉन कसिच हे नेते एकत्र आले आहेत. ट्रम्प यांनी मात्र या दोघांनी निराशेतून हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. Current Affairs

मोबाईलमध्ये पॅनिक बटण बंधनकारक
मोबाईल संवादासोबतच स्वसंरक्षणाचे प्रमुख माध्यम व्हावे, या हेतूने केंद्र सरकारने हॅण्डसेटमध्ये # पॅनिक बटण पुढील वर्षापासून बंधनकारक केले आहे. पॅनिक बटण असल्याशिवाय कोणताही हॅण्डसेट देशात विकता येणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पॅनिक बटण दाबल्यानंतर संबंधित कॉल नजीकच्या सुरक्षा यंत्रणेशी किंवा पोलीस ठाण्याशी जोडला जाईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधेचा महिलांना विशेष उपयोग होणार आहे.chalughadamodi

महाराष्ट्र

डाळींचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी कायद्याच्या आराखड्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
राज्यात डाळींचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी दर नियंत्रक कायद्याच्या आराखड्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने डाळीची विक्री केल्यास या कायद्यानुसार दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ (क) अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. डाळींसाठी दर नियंत्रक कायदा हा या कायद्याला पूरक म्हणून तयार करण्यात येणार आहे.police bharati

विदर्भातील वाघ ‘सह्य़ाद्री’च्या कुशीत विसावणार!
विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात असलेले जादा वाघ हे सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असणाऱ्या कोयना, चांदोली व राधानगरी अभयारण्यात सोडता येऊ शकतात काय? यासाठीचा प्राथमिक अहवाल सादर करण्याची सूचना सह्णााद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. याबाबत पुढील महिन्यात नागपूर येथे वन विभागाच्या मुख्यालयात प्राथमिक बैठक होण्याची शक्यता असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक नाना खामकर यांनी दिली.mpsc chalu ghadamodi

क्रीडा

बीसीसीआयच्या एकछत्री अंमलावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
देशातील असंख्य युवा खेळाडू भविष्यातील विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी होण्याची स्वप्ने रंगवत आहेत. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या देशातील क्रिकेटवरील मक्तेदारीमुळे या प्रतिभावान खेळाडूंना समान संधी मिळत नाहीत, अशी चपराक सर्वोच्च न्यायालयाने लगावली.chalu ghadamodi Current Affairs

नदालला जेतेपद
दुखापती आणि सातत्याचा अभाव यामुळे पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या राफेल नदालने माँटे कालरेपाठोपाठ बार्सिलोना स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करीत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. या जेतेपदासह नदालने ग्लुइर्मो व्हिलासच्या लाल मातीच्या कोर्टवर झालेल्या स्पर्धामधील ४९ जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली. अंतिम लढतीत नदालने जपानच्या केई निशिकोरीवर ६-४, ७-५ अशी मात केली.marathi chalu ghadamodi

नेमबाजी स्पर्धेत मयराजला रौप्यपदक
भारताचा नेमबाज मयराज अहमद खानने जागतिक चषक नेमबाजी स्पर्धेतील स्कीट या प्रकारात रुपेरी कामगिरी केली. ही स्पर्धा रिओ दी जानिरो येथे सुरू आहे. मयराजने जागतिक चषक स्पर्धेत भारताला स्कीट प्रकारात पहिलेच पदक मिळवून दिले.chalu ghadamodi spardha pariksha

हृदय भुटाचा खळबळजनक विजय
आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ११ वर्षीय बुद्धिबळपटू हृदय भुटाने अखिल भारतीय खुल्या फिडे गुणांकित बुद्धिबळ स्पध्रेत द्वितीय मानांकित व गोव्याचा कँडिडेट मास्टर नितीश बेलूरकरला दुसऱ्या स्विस लीग सामन्यात ३८व्या चालीत शह देत खळबळजनक विजयाची नोंद केली.chalu ghadamodi for mpsc

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवर ८.७ टक्के व्याज
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवर २०१५-१६ या वर्षांत ८.७ टक्के व्याज देण्याचा निर्णय अर्थमंत्रालयाने घेतल्याची माहिती कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सोमवारी दिली. या निधीवर ८.८ टक्के व्याज देण्याची केंद्रीय विश्वस्त मंडळाची शिफारस फेटाळून ८.७ टक्के व्याज देण्याच्या अर्थमंत्रालयाच्या निर्णयाविरोधात कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now