⁠  ⁠

Current Affairs 26 April 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

दलबीर सिंह सुहाग यांची सेशेल्स येथील भारताचे उच्चायुक्तपदी नियुक्ती

  • भारतीय सेनादलाचे निवृत्त अधिकारी जनरल दलबीर सिंह सुहाग यांची प्रजासत्ताक सेशेल्स येथील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. जुलै २०१४ ते डिसेंबर २०१६ दरम्यान दलबीर सिंह सुहाग हे भारतीय थल सेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
  • २९ सप्टेंबर २०१६ च्या पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान दलबीर सिंह सुहाग हे थल सेना प्रमुख म्हणून कार्यरत होते.

जपानमध्ये निवडणूक जिंकत पुणेकराने इतिहास रचला

  • भारतीय वंशाचे 41 वर्षीय योगेंद्र उर्फ योगी जपानमधीलनिवडणूक जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. योगेंद्र यांनी जपानची राजधानी टोकियोमधील ‘इडोगावा म्युनिसिपल कॉर्पोरेशन’च्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला होता.
  • त्यासाठी 21 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये योगेंद्र यांना 6477 मते मिळाली. विशेष म्हणजे योगेंद्र हे मराठी माणूस असून ते मूळ पुण्याचे रहिवासी आहेत.
  • गेल्या 10 वर्षांपासून योगी ‘कॉन्सीट्यूएंट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ जपान’ (CDP) या पक्षामध्ये कार्यरत आहेत.

आशियाई कुस्ती स्पर्धा : दिव्या, मंजूला कांस्यपदक

  • भारताच्या दिव्या काकरान आणि मंजू कुमारी यांनी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती दिव्या हिने ६८ किलो वजनी गटाच्या ‘प्ले-ऑफ’ फेरीत मोंगोलियाच्या बॅटसेटसेग सोरोंझोनबोल्ड हिला हरवत कांस्यपदकावर नाव कोरले. त्यानंतर मंजू कुमारीने व्हिएतनामच्या थी हुआँग डाओ हिला ११-२ असे पराभूत करत गुरुवारी भारताच्या खात्यात दुसऱ्या कांस्यपदकाची भर घातली.

ISSF World Cup : मनू भाकेर-सौरभ चौधरीची धडाकेबाज कामगिरी, भारताला आणखी एक सुवर्णपदक

  • चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने गुरुवारी सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली आहे. मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीने १० मी. एअर पिस्तुल मिश्र प्रकारात सुवर्णपदक कमावलं. याआधी १० मी. एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदक मिळवलं होतं.
  • मनू-सौरभ जोडीने अंतिम फेरीत आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. यजमान चीनच्या जोडीवर १६-६ अशी मात करत भारतीय जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत मनू-सौरभ जोडीने ४८२ गुणांसह पाचवं स्थान मिळवलं होतं. मनू-सौरभ व्यतिरीक्त हिना सिद्धु-शेहजार रिझवी या भारतीय जोडीला बाराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

अजिंक्य रहाणे हॅम्पशायरकडून खेळणारा पहिला भारतीय

  • भारताच्या विश्वचषक संघात जागा न मिळालेल्या अजिंक्य रहाणेने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी अजिंक्यने बीसीसीआयकडे याबद्दल परवानगी मागितली होती. बीसीसीआयकडून परवानगी मिळाल्यानंतर हॅम्पशायर क्रिकेट क्लबने अजिंक्यसोबत आगामी काऊंटी क्रिकेट हंगामासाठी करार केला आहे.
  • याचसोबत अजिंक्य हॅम्पशायर संघाकडून खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज एडन मार्क्रमच्या जागी रहाणेला संघात जागा मिळाली आहे.

“नासा’ची महिला अंतराळवीर 328 दिवस अंतराळात राहणार

  • सलग 328 दिवस अंतराळात एकाच अवकाशयानात महिला अंतराळवीराने राहण्याचा विक्रम “नासा’ची अंतराळवीर ख्रिस्तिना कोच करणार आहे.
  • इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) वरून नासा एकूण 3 मोहिमा राबवणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक व अंतराळवीर नुकतेच ठरवण्यात आले. या मोहिमांमध्ये जेसिका मेइर या महिला अंतराळवीराचे पहिले अवकाशयान आणि नासाचे अंतराळवीर अँड्रयू मॉर्गन यांचे अंतराळातील वास्तव्य यांचाही समावेश आहे. यामध्ये सलग 328 दिवस अंतराळात एकाच अवकाशयानात राहण्यासाठी ख्रिस्तिना कोचची निवड झाली आहे.
  • ख्रिस्तिना कोच ही महिला अंतराळवीर यावर्षी 14 मार्च रोजी आयएसएसवर दाखल झाली होती. नव्या वेळापत्रकानुसार ख्रिस्तिना पृथ्वीच्या कक्षेत फेब्रुवारी 2020 पर्यंत राहणार आहे. यापूर्वी पेगी व्हिटसन या महिला अंतराळवीराने सलग 288 दिवस अंतराळात वास्तव्य केले होते.

Share This Article