⁠  ⁠

चालू घडामोडी : २६ ऑगस्ट २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Current Affairs : 26 August 2020

आकाशगंगेपेक्षा बटू दीर्घिकांमध्ये ताऱ्यांची निर्मिती जास्त वेगाने

nasa 2

आपल्या आकाशगंगेपेक्षा काही बटू दीर्घिकांमध्ये (ड्वार्फ गॅलेक्सी) ताऱ्यांची निर्मिती १० ते १०० पट अधिक वेगाने होते असे आर्यभट्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे.
आपल्या विश्वात अब्जावधी दीर्घिका असून त्यातील अनेक बटू दीर्घिका आहेत, या दीर्घिका आपल्या आकाशगंगेपेक्षा वस्तुमानाने कमी आहेत. या लहान दीर्घिकांना बटू दीर्घिका असे म्हटले जाते.
आपल्या आकाशगंगेपेक्षाही या दीर्घिकात जास्त वेगाने तारे तयार होतात. पण तारे निर्मितीची ही प्रक्रिया लाखो वर्षांनंतर बंद होते. या दीर्घिकांचे वय मात्र काही अब्ज वर्षे असते.
वैज्ञानिकांनी या दीर्घिकांचा अभ्यास दोन भारतीय दुर्बिणींच्या मदतीने केला असून त्यात त्यांचे गुणधर्म वेगळे दिसून आले. त्यांच्यात हायड्रोजन वेगळ्या पद्धतीने विखुरलेला होता व दोन दीर्घिकांमधील टकरीही वेगळ्या होत्या.
या दीर्घिकांच्या १४२०.४० मेगाहर्टझ तरंगलांबीच्या प्रतिमांवरून असे दिसले की, त्यांच्यामध्ये हायड्रोजन विखुरलेला आहे.

नीलकांत भानुप्रकाशने मानवी कॅल्क्युलेटरचा किताब जिंकला

Neelakantha Bhanu Prakash wins gold at Maths Olympics

नीलकांत भानुप्रकाश (२०) याने सर्वात वेगवान मानवी कॅल्क्युलेटरचा किताब जिंकला. लंडनमधील मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भानुने ३० स्पर्धकांना हरवले. त्याने शकुंतला देवी आणि स्कॉट फ्लॅन्सबर्गचा विक्रमही मोडीत काढला.
एमएसओ ही 1997 पासून लंडनमध्ये दरवर्षी होणारी मेंटल स्किल आणि माइंड स्पोर्ट्सची सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.

इंग्लंडचा जिम्मी अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये जगातील पहिला वेगवान गोलंदाज

Jimmy Anderson takes 600 wickets in Tests; The world's first fast bowler | जिम्मी अँडरसनचे कसोटीत ६०० बळी; जगातील पहिला वेगवान गोलंदाज


इंग्लंडचा जिम्मी अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. अँडरसनने पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अझहर अलीला बाद करीत हा पराक्रम केला.
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पहिल्या स्लिपमध्ये त्याचा झेल टिपल्यानंतर सर्व खेळाडू अँडरसनभोवती गोळा झाले. त्यानंतर अँडरसनने उजव्या हातात चेंडू पकडत मैदानाच्या चहूबाजूला नमस्कार केला. कोरोना व्हायरस महामारीमुळे मैदानात एकही प्रेक्षक नव्हता.

Share This Article