Current Affairs : 26 February 2021
जीडीपीची वाढ १३.७ टक्क्यांनी होण्याचा मुडीजचा अंदाज

मुडीज या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने गुरुवारी १ एप्रिलपासून सुरू होणार्या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज १०.८ टक्क्यांपासून वाढवून १३.७ टक्क्यांपर्यंत केला आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी यूएस-आधारित मुडीज या रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे की, अर्थव्यवस्था ७ टक्क्यांपर्यंत घसरेल, जी आधीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. या आधी मुडीजने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये १०.६ टक्क्यांपर्यंत घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला होता.
मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे असोसिएट मॅनेजिंग डायरेक्टर (सॉवरेन रिस्क) जीन फांग म्हणाले की, “आमचा सध्याचा अंदाज असा आहे की दैनंदिन सामान्यीकरणाच्या प्रभावामुळे मार्च २०२१ रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ७ टक्के घसरेल आणि पुढील आर्थिक वर्षात १३.७ टक्के वाढीची अपेक्षा आहे.”
भारत आणि पाकिस्तानमध्ये महत्वाचा करा

भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत महत्वाचा करार झाला असून दोन्ही देशाच्या लष्करांनी जम्मू आणि काश्मीरमधील तसंच इतर परिसरातील नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवण्यावर सहमती झाल्याची घोषणा केली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टर जनरलकडून यासंबंधी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
दोन्ही देशांकडून २००३ मध्ये झालेल्या युद्धविरामाच्या कराराचं पालन केलं जाणार आहे.
या करारामुळे भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेला तणाव कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चंदीगडचे ‘कार्बन वॉच’ अॅप
चंदीगड केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने व्यक्तीकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मूल्यांकन करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली आहे. असे करणारे ते भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
ठळक बाबी….
चंदीगड सरकारने ‘कार्बन वॉच’ नामक एक मोबाइल अॅप तयार केले आहे.या अॅपच्या माध्यमातून चंडीगडच्या रहिवाशांना माहिती दिली जाणार आणि त्यांना कार्बन उत्सर्जनाबाबत जागरूक केले जाणार.
अॅप वेगवेगळ्या स्त्रोतांच्या वापराविषयी विस्तृत माहिती एकत्रित करतो आणि माहितीच्या आधारे कार्बन उत्सर्जनाची गणना करतो.
भारत-अमेरिका कार्यकारी सुकाणू गटाची 24 वी बैठक संपन्न

भारत-अमेरिका कार्यकारी सुकाणू गटाची 24 वी बैठक 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे झाली.
या बैठकीला अमेरिकी लष्कराचे 12 सदस्यीय शिष्टमंडळ उपस्थित होते तर वेगवेगळ्या ठिकाणांहून 40 अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
अमेरिकी लष्कराच्या पॅसिफिक क्षेत्राचे डेप्युटी कमांडिंग जनरल मेजर जनरल डॅनियल मॅकडेनियल यांनी अमेरिकी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. भारतीय लष्कराच्या शिष्टमंडळात 37 अधिकारी होते.
दरवर्षी या मंचावर भारत आणि अमेरिका लष्करी सहकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकत्र येतात.
विविध क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने परस्पर हिताच्या अनेक समकालीन मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
तमिळनाडूत सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवले
तमिळनाडू सरकारने शिक्षक, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांसह आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 1 वर्षाने वाढ करुन, ते 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी दिली आहे.
पलानीस्वामी यांनी विधानसभेत नियम 110 अंतर्गत ही घोषणा केली आहे. त्यामुळे तामिळनाडूतील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तमिळनाडू सरकारचा हा निर्णय सरकारी, सरकारची मदत असलेल्या शैक्षणिक संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक महापालिका आणि 31 मे 2021 ला निवृत्त होत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू असणार आहे. गेल्या वर्षी मे मध्येच तामिळनाडू सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वरुन 59 केले होते.
Mission MPSC