Current Affairs 26 January 2020
रेल्वे पोलिस दलातील 21 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींनी रेल्वे सुरक्षा दल(आरपीएफ), रेलवे सुरक्षा विशेष दलातील (आरपीएसएफ) महाराष्ट्रातील 21 कर्मचाऱ्यांना शौर्यासाठी पोलीस पदक (पीएमजी), विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपति पोलीस पदक (पीपीएम) आणि उत्कृष्ट सेवांसाठी पोलीस पदक (पीएम) देऊन गौरवले.
शौर्यासाठी पोलीस पदक (पीएमजी):
स्वर्गीय जगबीर सिंह राणा, शिपाई / उत्तर रेलवे (मरणोत्तर)
विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपति पोलीस पदक (पीपीएम):
अम्बिका नाथ मिश्रा, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त/ पूर्व रेलवे
भरत सिंह मीणा, कमांडेंट, 8 बीएन/ आरपीएसएफ
उत्कृष्ट सेवांसाठी पोलीस पदक (पीएम):
युगल किशोर जोशी, डीआयजी/ आरपीएफ
अनिल कुमार शर्मा, सहायक कमांडेंट/ आरपीएसएफ
पी. पी. जॉय, सहायक सुरक्षा आयुक्त/ कोकण रेल्वे
दीप चंद्र आर्य, सहायक सुरक्षा आयुक्त/ उत्तर रेल्वे
टी. चंद्रशेखर रेड्डी, निरीक्षक/ दक्षिण मध्य रेल्वे
के. चक्रवर्ती, निरीक्षक/ दक्षिण मध्य रेल्वे
सतीश इंगल, हेड कांस्टेबल/ दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
देव कुमार गोंड, उप-निरीक्षक/ कोकण रेल्वे
जी.एस. विजयकुमार, उप-निरीक्षक/ मध्य रेल्वे
डी. बालासुब्रह्मण्यम, उप-निरीक्षक/ प्रशिक्षण केंद्र, मौला अली
महफजुल हक, निरीक्षक/ 4 बीएन आरपीएसएफ
दर्शन लाल, उप-निरीक्षक/ 6 बीएन आरपीएसएफ
नेमी चंद सैनी, सहायक उप-निरीक्षक/ उत्तर पश्चिम रेल्वे
आलोक कुमार चटर्जी, सहायक उप-निरीक्षक/ पूर्व रेल्वे
अशोक कुमार यादव, निरीक्षक/ पश्चिम रेल्वे
‘मदर ऑफ सीड’ राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील तीन कर्तबगार व्यक्तींचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुरेल गळ्यांनं गाण्यांमध्ये भाव भरणारे गायक सुरेश वाडकर ‘मदर ऑफ सीड्स’ अशी जगभरात ओळख मिळवणाऱ्या राहीबाई पोपेरे आणि आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
संकरित बियाणांचा प्रचंड वापर वाढलेला असताना राहीबाई पोपरे यांनी देशी आणि पारंपरिक बियाणांचं संकलन करत बियाणांची बँक तयार केली. लहानपणापासूनच बियाणे गोळा करण्याचा छंद जडलेल्या राहीबाई पोपेरे यांनी देशी वाणांच्या बियाणांच पारंपरिक पद्धतीनं सवर्धनं केलं. आज राहीबाई यांच्या सीड्स बँकमध्ये तब्बल ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे. त्यांच्या या कार्याची बीबीसीनंही दखल घेतली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या हिवरे बाजार या गावाचा कायापालट करण्यात पोपटराव पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी गावात केलेल्या कामावरून महाराराष्ट्र सरकारनं आदर्श ग्राम योजना सुरू केली. यामुळे राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहराच बदलून गेला.
जेटली, स्वराज, फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे नागरी पुरस्कार जाहीर केले. पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला, तर माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला.
महाराष्ट्रातील १३ मान्यवरांना नागरी पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांत उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण, तर पोपटराव पवार, बीजमाता राहिबाई पोपेरे आणि मुस्लीम सत्यशोधक कार्यकर्ते सय्यदभाई यांच्यासह १२ जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले आहेत.
एकूण १४१ जणांना नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यांत सात जणांना पद्मविभूषण, १६ जणांना पद्मभूषण आणि ११८ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये ३४ महिलांचा समावेश आहे. तर १८ मान्यवर परदेशी किंवा अनिवासी भारतीय आहेत. त्याचबरोबर १२ मान्यवरांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष अनिरुद जगनॉथ, ऑलिंपिक पदविजेती मुष्ठियोद्धा मेरी कोम, ज्येष्ठ शास्त्रीय गायक छन्नूलाल मिश्रा, आध्यात्मिक गुरू श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी यांचा, तर पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांत गायक अजय चक्रवर्ती, वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील मान्यवर
उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण, तर ग्रामविकासात आदर्श कार्य करणारे पोपटराव पवार, बीजमाता राहिबाई पोपेरे, क्रिकेटपटू झहीर खान, वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर, मुस्लीम सत्यशोधक कार्यकर्ते सय्यदभाई, अभिनेत्री कंगणा रणौत, चित्रपटनिर्माता करण जोहर, निर्माती एकता कपूर, पार्श्वगायक सुरेश वाडकर, अभिनेत्री सरिता जोशी, गायक अदनान सामी, डॉ. सॅण्ड्रा डेसा सुझा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
काश्मीर पोलिसांना सर्वाधिक शौर्य पुरस्कार
७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जम्मू व काश्मीर पोलिसांना सर्वाधिक, म्हणजे १०८ शौर्य पुरस्कार मिळाले आहेत. यामागोमाग ७६ पुरस्कार केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) पटकावले आहेत.
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये, शौर्यासाठी या वर्षी जाहीर झालेल्या ४ राष्ट्रपती पोलीस पदकांपैकी ३ पदकांचा समावेश आहे. यामुळे, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या एकूण २९० शौर्य पुरस्कारांपैकी जम्मू- काश्मीर पोलिसांना १०८ पदकांचा सिंहाचा वाटा मिळाला असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या सहा जवानांना शौर्य चक्र
देशाचं संरक्षण करताना दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या लष्कारातील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्काराची घोषणा करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ऑरिअन यांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे.
देशाच्या सुरक्षा करताना असामान्य कामगिरी बजावणाऱ्या लष्कारातील जवानांना शौर्य चक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०१९मध्ये कर्तव्यावर असताना दहशतवाद्यांशी मुकाबला करत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहा जवानांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे.
लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा यांनी मणिपूरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एक माहिती नेटवर्क तयार केलं. याच बळावर त्यांच्या नेतृत्वाखाली तुकडीनं १४ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
याचबरोबर उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी, लष्काराचे ईशान्येकडील कमांडर लेफ्टनंट जनरल रनबीर सिंह, सहाय्यक लेफ्टनंट जनरल अरविंद दत्ता यांच्यासह १९ अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे.
Padma Awards : ‘सुपरमॉम’चा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान, पी.व्ही.सिंधूला पद्मभूषण
सहावेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या मेरी कोमचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पद्म पूरस्कारांची घोषणा केली. यात राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या देशविदेशातील १४१ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. मेरी कोमव्यतिरीक्त भारताची आघाडीची महिला बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
२०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमने कांस्यपदकाची कमाई केली होती. सिंधूनेही २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी सिंधू एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने आतापर्यंत १ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदकं मिळवली आहे.
मेरी कोमव्यतिरीक्त क्रिकेटपटू झहीर खान, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, माजी हॉकीपटू एम.पी.गणेश, नेमबाजपटू जितू राय, भारताच्या महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार ओनिअम बेंबम देवी, तिरंदाज तरुणदीप राय यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
चिदंबरम यांना अटक करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचा सन्मान
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) 28 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांना अटक करणाऱ्या रामास्वामी पार्थसारथी या अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
मागील वर्षी आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांनाही अटक झाली होती. त्या पिता-पुत्रांना अटक करणाऱ्या पार्थसारथी यांचा उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव करण्यात आला आहे.
सीबीआयचे सहसंचालक धिरेंद्र शंकर शुक्ला यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांनी महत्वाच्या प्रकरणांत यशस्वी कामगिरी करून दाखवली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) रोशन अन्सारी या पहिल्या भारतीयाला ताब्यात मिळवण्यात देशाला यश आले.
ती कामगिरी करणाऱ्या पथकाचे नेतृत्व शुक्ला यांनी केले होते. महाराष्ट्रातील खैरलांजी हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी बिनय कुमार यांनाही सन्मानित करण्यात आले आहे. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित रेल्वेचे एक प्रकरण आणि निठारी हत्याकांडाचा तपास करणारे निर्भय कुमार यांनाही पदक जाहीर झाले आहे.
अनुसूचित जाती-जमातींना आणखी १० वर्षे आरक्षण
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेत अनुसूचित जाति-जमातींना आरक्षण देण्याच्या संसदेत मंजूर झालेल्या विधेयकाला राजस्थान विधानसभेने शनिवारी मंजुरी दिली लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देण्याची तरतूद २५ जानेवारी रोजी संपली. तिला १० वर्षे मुदतवाढ देण्याचे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी किमान ५० टक्के विधानसभांनी मान्यता देणे बंधनकारक होते.
भारत-ब्राझील यांच्यात १५ करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष जेअर मेस्सिया बोलसोनारो यांच्यामध्ये शनिवारी सामरिक मुद्द्यांबरोबरच द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत चर्चा झाली. यामध्ये दोन्ही देशांमध्ये १५ करारांवर सह्या करण्यात आल्या.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलसोनारो भारत दौऱ्यावर आले आहेत.
दोन्ही देशांमध्ये झालेल्या १५ करारांमध्ये संरक्षण, सुरक्षा, व्यापार, शेती, नागरी हवाई वाहतूक, ऊर्जा, पर्यावरण, आरोग्य यांबरोबरच आंतराष्ट्रीय दहशतवादाविरोधातील कारवाईविषयीच्या करारांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे, या चर्चेमध्ये व्यापार आणि गुंतवणूक या मुद्द्यांवरच भर देण्यात आला. ‘बोलसोनारो यांच्या भेटीने भारत-ब्राझील यांच्या संबंधांतील नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे,’ असे सांगतानाच भारताच्या आर्थिक विकासामध्ये ब्राझील हा मौल्यवान भागीदार असल्याचेही मोदी यांनी सांगितले. या वेळी संरक्षण उद्योगांमधील सहकार्य वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून या मानकऱ्यांमध्ये सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
सुरेश वाडकर यांनी मराठी आणि हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांची कोंकणी आणि भोजपुरी भाषेतही हजारो गाणी गायली आहेत. ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था, सीने में जलन आखों में तुफाँ सा क्यु हैं, सुरमयी अखियों में, ऐ जिंदगी गले लगा ले, चप्पा चप्पा चरखा चले असे अनेक सुमधूर गाणी गायली आहेत. राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील त्यांची गाणी गाजली. त्याच प्रमाणे प्रेमरोग चित्रपटातील ‘भंवरेने खिलाया फूल’, ‘मेरी किस्मत में तू नहीं शायद’ ही गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.