भारत अमेरिकेकडून विकत घेणार सर्वात घातक प्रीडेटर बी ड्रोन
भारताने अमेरिकेकडून दीर्घ पल्ल्याची टेहळणी क्षमता असलेली पोसी़डॉन P-8I विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
त्याचबरोबर शस्त्रसज्ज प्रीडेटर-बी ड्रोन विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचीही योजना आहे.
पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल बरोबरच्या शस्त्रास्त्र खरेदी व्यवहाराला गती दिली आहे.
भारताकडून सध्या मोठया प्रमाणावर P-8I विमानांचा वापर सुरु आहे. P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे. समुद्री गस्त घालण्याबरोबरच पाणबुडीवर अचूक प्रहार करण्यासाठी सुद्धा हे विमान सक्षम आहे.
हारपून ब्लॉक २ मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते.
आता पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा या विमानाचा वापर होत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धा : नेयमारमुळे पॅरिस सेंट जर्मेनची ‘फ्रेंच क्रोंती’
ब्राझिलचा नामांकित खेळाडू नेयमारने साकारलेल्या एकमेव निर्णायक गोलच्या बळावर पॅरिस सेंट जर्मेनने (पीएसजी) फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट इटिनीला १-० असे पराभूत केले.
सेंट जर्मेनचे हे विक्रमी १३ वे विजेतेपद ठरले. स्टेट दी फ्रान्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नेयमारने १४ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
मिलानसाठी हकान अॅलनग्लूने १४ व्या मिनिटाला गोल नोंदवला, परंतु दुवान झपाटाने ३४ व्या मिनिटाला गोल साकारून अटलांटाला बरोबरी साधून दिली. अटलांटा ३६ सामन्यांतून ७५, तर युव्हेंटस ३५ सामन्यांतून ८० गुणांसह अग्रस्थानी विराजमान आहे.
२०१८ साली जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये, ४ x ४०० मिश्र रिले प्रकारात रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय संघाला अचानक गुरूवारी खुशखबर मिळाली. त्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा बहारीन संघाचा एक खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने बहारीनच्या संघावर कारवाई करण्यात आली.
त्यामुळे रौप्य पदकावरुन भारतीय संघाला सुवर्णपदकाचा मान मिळाला. केमी अदेकोया हा बहारीनचा खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला, ज्यामुळे Athletics Integrity Unit (AIU) ने बहारीनच्या संघावर कारवाई करत भारतीय संघाला सुवर्णपदक बहाल केलं.
आशियाई खेळांमध्ये ४ x ४०० मिश्र रिले प्रकारात मोहम्मद अनस, एम.आर. पुवम्मा, हिमा दास, राजीव अरोकिया हे चार खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करत होते. त्या चौघांना हे सुवर्णपदक बहाल करण्यात आले. हे सुवर्णपदक हिमा दास हिने करोनायोद्ध्यांना दान केले. तिने ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली.
Very good Daily current affairs