केरळ देशातील सर्वात तंदुरुस्त राज्य, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
- एकूण आरोग्य कामगिरीत देशात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून बिहार व उत्तर प्रदेश सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. निती आयोगाने आरोग्य निर्देशांक क्रमवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.
- आरोग्य निर्देशांकाची दुसरी फेरी ही २०१५-१६ पायाभूत वर्ष व २०१७-१८ संदर्भ वर्ष मानून तयार केली आहे. अहवालात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. ‘दी हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसिव्ह इंडिया’ नावाचा अहवाल निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी जाहीर केला.
- आरोग्य क्षेत्रातील क्रमवारी
- १) केरळ, २) आंध्र प्रदेश,
३) महाराष्ट्र, ४) गुजरात,
५) पंजाब, ६) हिमाचल प्रदेश, ७) जम्मू व काश्मीर,
८) कर्नाटक, ९) तामिळनाडू, १०) तेलंगण, ११) पश्चिम बंगाल, १२) हरयाणा,
१३) छत्तीसगड, १४) झारखंड, १५) आसाम, १६) राजस्थान, १७) उत्तराखंड, १८) मध्य प्रदेश, १९) ओदिशा, २०)बिहार, २१) उत्तर प्रदेश.
जयशंकर यांना राज्यसभेची उमेदवारी
- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी भाजपमध्ये औपचारिकरीत्या प्रवेश केल्यानंतर त्यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
- राज्यातील दुसऱ्या जागेसाठी जुगलजी माथुरजी ठाकोर हे उमेदवार असतील.
- राजनैतिक अधिकारी म्हणून कारकीर्द घालवलेले आणि माजी परराष्ट्र सचिव असलेले जयशंकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून समावेश केला होता. ३० मे रोजी इतर मंत्र्यांसोबत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.
विरल आचार्य यांचा राजीनामा
- रिझव्र्ह बँकेच्या स्वायत्ततेचे खंदे समर्थक आणि गेले काही दिवस गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याशी चलनवाढ, व्याजदर आणि विकास या मुद्दय़ांवर मतभेद झालेले डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिने बाकी असतानाच राजीनामा दिला आहे. याआधी डिसेंबरमध्ये गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनीही कार्यकाल संपण्याच्या नऊ महिने आधीच पदत्याग केला होता.
- गेल्या सात महिन्यांत रिझव्र्ह बँकेचा तडकाफडकी राजीनामा देणारे ते दुसरे वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत.
- विरल आचार्य हे आधी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेत अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक होते. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांची तीन वर्षांसाठी रिझव्र्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली होती, त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी पद स्वीकारले होते.
- आचार्य यांनी राजीनामा दिल्याने रिझव्र्ह बँकेत आता तीन डेप्युटी गव्हर्नर उरले असून त्यात एन. एस. विश्वनाथन, बी. पी. कानुंगो, एम. के. जैन यांचा समावेश आहे.