Chandrayaan-2: ‘नासा’चं लेझर घेऊन झेपावणार ‘चांद्रयान-२’
- ढील महिन्यात नियोजित असलेली भारताची ‘चांद्रयान २’ या मोहिमेत भारताचे यान ‘नासा’चे लेझर उपकरण घेऊन जाणार आहे. या उपकरणामुळे पृथ्वीपासून चंद्राचे नेमके अंतर मोजण्यास मदत होणार आहे, अशी माहिती अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या अधिकाऱ्याने दिली आहे.
- गेल्या आठवड्यात टेक्सास येथे झालेल्या विज्ञान परिषदेमध्ये ‘नासा’कडून ही माहिती देण्यात आली. ‘चंद्राच्या पृष्ठभागावर अधिकाधिक लेझर रेट्रोरिफ्लेक्टर उपकरणे बसविण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ अशी माहिती ‘नासा’च्या विज्ञान मोहीम संचालनालयाच्या ‘प्लॅनेटरी सायन्स डिव्हिजन’चे संचालक लॉरी ग्लेझ यांनी दिली.
- या संदेशांमुळे यान नेमके कुठे आहे, त्याची माहिती समजणार आहे. त्यावरून चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजण्यास मदत होणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सध्या अशा प्रकारची पाच उपकरणे आधीच बसवलेली आहेत.
नरेश गोयल यांनी दिला जेटच्या संचालक मंडळाचा राजीनामा
- आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल जेटच्या संचालक मंडळावरुन
- पायउतार झाले आहेत. त्यांनी जेटच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. २५ वर्षांपूर्वी नरेश गोयल यांनी पत्नी अनितासह मिळून
- जेट एअरवेजची स्थापना केली होती.
- चेअरमनपदावरुन पायउतार होण्यास व कंपनीतील ५१ टक्के हिस्सा कमी करण्यास नरेश गोयल तयार असल्याची माध्यमांमध्ये चर्चा होती.
- जेटची ४० विमाने जमिनीवरच उभी आहेत. जेट एअरवेजने याआधी सुद्धा गंभीर आर्थिक संकटाचा सामना केला आहे. २०१३ मध्ये
- अबूधाबीच्या इतिहाद एअरवेजने जेटमध्ये गुंतवणूक करुन २४ टक्के हिस्सा विकत घेतला.
- जेटला या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज मिळू शकते. जेट एअरवेजवर
- सध्या २६ बँकांचे आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
डीआरडीओची कमाल! पाकिस्तानी रडारच्या हालचालींची मिळणार अचूक माहिती
- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो येत्या एक एप्रिल रोजी इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सॅटेलाइट एमिसॅटचे प्रक्षेपण करणार आहे. डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी अत्याधुनिक एमिसॅट उपग्रहाची निर्मिती केली आहे. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा उपग्रह अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.
- एमिसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. युद्धकाळात हा उपग्रह महत्वपूर्ण ठरेल. सीमेवर तैनात केलेले सेन्सर्स, शत्रूच्या प्रदेशातील रडारच्या हालचाली, त्या प्रदेशाची माहिती आणि नेमकी तिथे किती कम्युनिकेशन उपकरणे सुरु आहेत याची इत्यंभूत माहिती मिळेल. ४३६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे.
- एमिसॅटच्या आधी इस्त्रोने २४ जानेवारीला डीआरडीओचा मायक्रोसॅट-आर उपग्रह प्रक्षेपित केला आहे.
- जैश-ए-मोहम्मदच्या तळावर किती दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा पुरावा मागितला तेव्हा एनटीआरओने तिथे ३०० मोबाइल सुरु असल्याची माहिती दिली. टेक्निकल इंटेलिजन्समुळे ही माहिती देणे शक्य झाले.
शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स देशसेवेत दाखल
- अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही शक्तीशाली हेलिकॉप्टर्स देशसेवेत कालपासून दाखल झाले.
- तसेच चंदिगडच्या एअऱ फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट (3-BRD) येथे एका कार्यक्रमाद्वारे या हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण झाले. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आहे.
- तर ही चार अॅडव्हान्स डबल रोटर हेलिकॉप्टर्स भारतीय सैन्याला प्रत्यक्ष लढाईच्या वेळी आणि इतर वेळी सैन्याच्या पथकांना एका जागेवरुन दुसऱ्या जागी वाहून नेण्यासाठी उपयोगात येणार आहेत. या विमानांची पहिली खेप चंदीगडच्या 3-BRD येथे जोडणीसाठी दाखल झाली आहे.
- अमेरिकेशी झालेल्या करारानुसार हवाई दलाला अशी 15 हेलिकॉपटर्स मिळणार आहेत.
- तसेच अति उंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून नेण्यासाठी सध्या भारताकडे रशियन बनावटीचे Mi-26 ही हेलिकॉप्टर्स सेवेत आहेत. त्यानंतर आता चिनुकचीही यात भर पडणार आहे.
इन्सुलीन तयार करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंडाची निर्मिती
- इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागणाऱ्या मधुमेही रुग्णांना दिलासा वाटावा असा शोध भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईतील संशोधक जयेश बेल्लारे यांनी लावला आहे. इन्सुलीन तयार करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंडाची निर्मिती या संशोधकांनी केली असून त्याचे प्रत्यारोपण करणेही शक्य आहे.
- न्सुलिन वापरता येत नाही. अशा रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. गंभीर परिस्थिती असणाऱ्या रुग्णांना स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण करण्याची वेळ येते. मात्र कृत्रिम स्वादुपिंड शरीराने न स्वीकारल्यास त्याचे काही दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
- बाळाच्या नाळेतून घेतलेल्या मानवी स्टेम पेशी आणि डुकराच्या स्वादुपिंडातून घेतलेल्या आयलेट पेशी वापरून हे स्वादुपिंड तयार करण्यात आले. उंदराच्या शरीरात त्याचे प्रत्यारोपण केल्यानंतर उंदराच्या इतर अवयवांना त्याचा काहीच त्रास झाला नाही. या स्वादुपिंडाच्या पेशींवर रक्तवाहिन्या तयार झाल्या.
फोन टॅपिंग राष्ट्रहितासाठीच; केंद्र सरकारची हायकोर्टात माहिती
- सुरक्षा यंत्रणांकडून केले जाणारे फोन टॅपिंग हे राष्ट्रहितासाठीच असते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली हायकोर्टात दिली. केंद्रीय
- गृहमंत्रालयाने हा दावा करताना इंडियन टेलिग्राफ अॅक्टचा दाखला देखील दिला आहे.
- सीबीआयने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवल यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टात याचिका
- दाखल झाली आहे.
- फोन टॅपिंगसाठी दिलेले आदेश हे कायद्यातील कलम ५(२) ला अनुसरुन आहेत की नाही, याची ही समिती चौकशी करु शकते. फोन
- टॅपिंगचा निर्णय कायद्याला अनुसरुन घेण्यात आला नसेल तर ही समिती फोन टॅपिंगचे आदेश रद्द करु शकते तसेच टॅप केलेले संभाषण/
- मेसेज डिलीट करण्याचे आदेशही देऊ शकते, असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. फोन टॅपिंग हे राष्ट्रहितासाठीच केले जाते,
- असे देखील यात म्हटले आहे.