आशा भोसले यांना २०२० चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२०चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांत त्यांना गायन केले. यापैकी मराठी भाषेतील त्यांनी गायलेली ‘मलमली तारुण्य माझे’, ‘केव्हातरी पाहाटे’, ‘बुगडी माझी सांडली गं’, अशी काही गीतं रसिकांना प्रचंड आवडली. घरातच गायकी असल्यामुळे गाणं शिकण्याची संधी त्यांना घरातूनच मिळाली.
कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपून बसले गं’ आणि आशा भोसले यांचा स्वर लाभलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.
भारतीय महिलांचे सुवर्णयश!
राही सरनोबत, चिंकी यादव आणि मनू भाकर यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात बुधवारी निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर याच तिघींनी गुरुवारी सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
त्यांच्या या कामगिरीनंतर भारताने १० सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदकांसह एकूण २१ पदकांनिशी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थान टिकवले आहे.
सुवर्णपदकासाठीच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने पोलंडचा १७-७ असा धुव्वा उडवला.
डॉ. कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर झालेल्या या अंतिम लढतीत पोलंडच्या जोआनो इवोना वावरझोनोवस्का, ज्युलिटा बोरेक आणि अग्निस्झा कोरेजवो यांना कामगिरी उंचावता आली नाही.
त्याआधी अंजूम मुदगिल, श्रेया सक्सेना आणि गायत्री नित्यनादम यांच्या भारतीय महिला संघाने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारतीय संघाला अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी नोंदवता आली नाही. सुवर्णपदकासाठी रंगलेल्या या सामन्यात भारताने ४३ गुण मिळवले. त्याउलट अनेता स्टॅनकिविझ, अलेक्झांड्रा झुटको आणि नतालिया कोचान्स्का यांच्या पोलंड संघाने ४७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. इंडोनेशियाच्या संघाने कांस्यपदकावर नाव कोरले.
विद्या रफिका रहमतान तोयिबा तसेच मोनिका दर्यांती आणि ऑड्रेय झहरा धियानिसा यांच्या इंडोनेशिया संघाने हंगेरीच्या ललिता गास्पर, इस्झेर डेनेस आणि लिआ होरवाथ यांच्यावर ४७-४३ अशी मात केली. भारताने या पदकासह ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदकांची कमाई करत २० गुणांसह पदकतालिकेत अग्रस्थान पटकावले आहे.
2021-22 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगाला मागे टाकेल
ग्लोबल रेटिंग एजेंसी फिचने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल एक नवा अंदाज व्यक्त केला आहे.
फिचच्या अंदाजानुसार १ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या वित्तीय वर्षात भारताची अर्थव्यवस्था १२ टक्क्यापेक्षा ही जास्त वेगाने वाढेल.
फिचने भारताच्या आर्थिक विकास दराचे जुना अनुमान अपडेट करुन नवीन अहवाल जाहीर केला.
ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, २०२१-२०२२ च्या वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर १२.८ टक्के राहू शकतो.
फिचने पहिल्यांदा २०२१-२०२२ च्या वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ११ टक्के राहू शकतो असा अंदाज वर्तवला होता.
फिचच्या अगोदर आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष आणि मूडीजने ही वित्तीय वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा इकोनॉमिक ग्रोथ रेट ११.५ टक्के आणि १२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पंरतु फिचचा जो नवीन रीपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये भारताच्या इकोनॉमिक ग्रोथचा रेट १२.८ टक्के होण्याचा अंदाज लावला आहे.