Current Affairs 26 May 2020
‘फ्लाईंग बुलेट्स’ ‘तेजस’ची दुसरी स्क्वाड्रन सज्ज
येत्या २७ मे रोजी तामिळनाडूत सुलूरमध्ये इंडियन एअर फोर्सची ‘फ्लाईंग बुलेट्स’ ही १८ नंबरची स्क्वाड्रन कार्यान्वित होणार आहे. स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या फायटर विमानाने ही स्क्वाड्रन सुसज्ज असेल. IAF मधील ‘तेजस’ची ही दुसरी स्क्वाड्रन आहे.
तेजसची पहिली स्क्वाड्रन सुद्धा याच सुलूर एअरबेसवर तैनात आहे. २०१६ साली कार्यान्वित झालेल्या या स्क्वाड्रनमध्ये सुरुवातीला दोन फायटर विमाने होती. एअर फोर्सने आतापर्यंत ४० तेजस विमानांची ऑर्डर दिली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तेजस विमानांची निर्मिती केली आहे.
मार्च महिन्यात संरक्षण मंत्रालयाने एचएएलकडून 83 LCA Mk-1A तेजस विमाने खरेदी करण्याची परवानगी दिली. पुढच्या काही महिन्यात या संबंधीच्या करारावर स्वाक्षरी होऊ शकते. हा एकूण व्यवहार ३८ हजार कोटी रुपयांचा आहे. LCA Mk-1A हे तेजसचे आणखी अत्याधुनिक स्वरुप असणार आहे. तेजस विमानाची निर्मिती केल्यापासून त्यात सतत सुधारणा सुरु आहेत. स्वदेशात बनवण्यात आलेले हे चौथ्या पिढीचे फायटर विमान आहे.
अकोला जगात चौथे उष्ण शहर!
सोमवारी अकोला हे जगातील चवथ्या तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले तसेच नागपूर जगातील सातवे आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. अकोल्यात आज ४७.४ आणि नागपुरात ४७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. इतकेच नव्हे जगभरातील उष्ण शहरांच्या यादीतील १५ पैकी सात शहरे ही भारतातील आहेत.
सोमवारी जगातील पहिल्या १५ उष्ण शहरांमध्ये देशातील चुरू (राजस्थान), अकोला (महाराष्ट्र), नागपूर (महाराष्ट्र), गंगानगर (राजस्थान), बिकानेर (राजस्थान), चंद्रपूर (महाराष्ट्र) आणि बांदा (उत्तर प्रदेश) या सात शहरांचा समावेश होता. त्यामुळे जगातील उष्ण शहरांच्या यादीतील जवळपास निम्मी शहरं भारतातील आहेत.सोमवारपासून नवतपा सुरू झाला आहे. ज्योतीषशास्त्रानुसार सूर्य रोहिणी नक्षत्रात आल्यावर उष्णता वाढते. यानुसार २५ मे ते २ जून या कालावधीत तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.
हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त
हिंदी महासागराखालील विशाल टेक्टॉनिक प्लेट फुटणार असल्याची धक्कादायक माहिती नव्या अभ्यासातून समोर आली आहे.
तर ही प्लेट येत्या काळात आपोआप दोन भागांत विभागली जाणार आहे. या प्लेटला भारत-ऑस्ट्रेलिया-मकर टेक्टोनिक प्लेट म्हणून ओळखले जाते.
तसेच ही प्लेट अगदी हळूहळू विभक्त होत आहे, म्हणजेच एका वर्षात ही प्लेट 0.06 इंच (1.7 मिलीमीटर)ने विभक्त होत आहे.
लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, या अभ्यासाचे संशोधक ओरेली कोडुरियर यांनी सांगितले की, ही एक अशी रचना नाही जी वेगवान वाटचाल करत आहे.
तसेच ही प्लेट हळूहळू विभक्त होत असल्याचं प्रारंभी संशोधकांना समजलं नव्हतं, परंतु नंतर त्याचा सुगावा लागला. हिंदी महासागरामध्ये एका दोन भयंकर भूकंप झाल्यानंतर पाण्याखाली काही हालचाल झाल्याचंही संशोधकांनी सांगितलं आहे.
11 एप्रिल 2012ला हिंदी महासागरातील इंडोनेशियाजवळ 8.6 आणि 8.2 अशा तीव्रतेचे दोन भूकंप झाले. हे भूकंप टेक्टोनिकल प्लेटच्या आसपास नव्हते, परंतु या प्लेटच्या मध्यभागी असलेल्या एका वेगळ्या ठिकाणावर त्यांचं केंद्रबिंदू दाखवलं होतं.
तर या भूकंपानंतर संशोधकांना असे वाटले की. पाण्याखाली काही हालचाल आहे. ऑरेली कोडुरियर म्हणाले की, “हे एक कोड्यासारखे आहे, कारण ते एकसारख्या प्लेट नसून तीन एकत्रित आहेत, ज्या जोडलेल्या आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार या प्लेट्स विभक्त होण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागतील.
चीनने तयार केलं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर
कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश एकीकडे आणि चीन एकीकडे असं चित्र बघायला मिळत आहे. अशातच चीनने त्यांचं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर (Unmanned Helicopter) तयार केलं आहे.
तर हे हेलिकॉप्टर खासकरून पठारी भागांमध्ये गुप्तहेरी करेल.
तसेच हे अत्याधुनिक मानवरहित हेलिकॉप्टर भारताशी जुळलेल्या सर्व सीमांवर तैनात केले जाणार आहेत. जेणेकरून चीन आकाशातूनही सीमांवर लक्ष देऊ शकेल.
या मानवरहित हेलिकॉप्टरचं नाव AR500C आहे. हे चीनची सरकारी कंपनी एविएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाने तया केलं आहे. कंपनीने पूर्व चीनच्या जियांसी प्रांतातील पोयांगमध्ये पहिल्यांदा याची ट्रायल घेतली. ही ट्रायल यशस्वी ठरली.
तर यात शस्त्रास्त्रे लावली गेली तर हे हेलिकॉप्टर हल्लाही करू शकतं. कार्गो डिलीव्हरी करू शकतो. तसेच शत्रूच्या टार्गेटची ओळख पटवण्यातही हे सक्षम आहे. तसेच हे हेलिकॉप्टर परमाणू आणि रासयनिक लिकेजची देखील माहिती देतं.
हे हेलिकॉप्टर जास्तीत जास्त 6700 मीटर म्हणजे 21981 फूट उंचीपर्यत उड्डाण घेऊ शकतं. याची जास्तीत जास्त गति 170 किलोमीटर प्रतिसात आहे. तर याचं वजन 500 किलोग्रॅम आहे.
AVIC टेक्नॉलॉजी डिरेक्टर आणि हे हेलिकॉप्टर तयार करणारे सायंटिस्ट फॅंग योगंहोंग यांनी सांगितले की, हे मानवरहित हेलिकॉप्टर पूर्णपणे डिजिटल आहे. हे आपोआप टेकऑफ आणि लॅंडिंग करू शकतं.
तर हे चीनचं पहिलं हेलिकॉप्टर पठारी परिसरांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.
फॅग योंगहोंग यांनी सांगितले की, आम्ही या हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी केली. यात चीनमधील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तीशाली इंजिन लावण्यात आलं आहे.