Current Affairs 27 May 2020
अभिमानास्पद ! मेजर सुमन गावनी यांना युएनचा ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ पुरस्कार जाहीर
भारतीय लष्करातील अधिकारी सुमन गावनी यांना संयुक्त राष्ट्र संघाचा ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पहिल्यांदा भारतीय सैन्यदुताला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. सुमन या संयुक्त राष्ट्र संघाची एक मोहीम अंतर्गत दक्षिण सुदानमध्ये तैनात होत्या. नुकतीच त्यांनी आपली ही मोहीम पूर्ण केली आहे.
सुमन गावनी यांच्यासोबत ब्राझिलच्या लष्कराच्या कमांडर कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांनादेखील ‘मिलिट्री जेंडर अॅडव्होकेट’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी सुमन गावनी आणि कर्ला मॉन्टेइरो डे कास्त्रो अराउजो यांच्या नावाची निवड केली. तसंच त्या सर्वांसाठी एक आदर्श ठरतील असंही ते म्हणाले. दरम्यानं भारतानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मेजर सुमन गावनी यांना २९ मे रोजी पार पडणाऱ्या ऑनलाइन समारंभात या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रातील भारतीय नेतृत्वाकडून देण्यात आली.
स्टफ’ मीडिया कंपनी एका डॉलरला विकली
करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे उद्योगधंदे ठप्प झाले आहे. दररोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे. परिणामी अनेक मोठमोठ्या कंपन्या डबघाईला आल्या आहेत. अशीच काहीशी अवस्था मीडिया कंपन्यांचीही झाली आहे. आर्थिक टंचाईमुळे बेजार झालेली ‘स्टफ’ ही न्यूझीलंडमधील नामांकित मीडिया कंपनी केवळ एक न्यूझीलंड डॉलरला विकली गेली आहे.‘स्टफ’ ही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील आघाडिच्या मीडिया कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जायची. या कंपनीचे हक्क ‘नाईन एंटरटेन्मेट’ या कंपनीकडे होते. गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार ही कंपनी प्रामुख्याने अनेक नामांकित वर्तमानपत्र व नियतकालिकांची छपाई करण्याचे काम करते. शिवाय ‘स्टफ’ या नावाची त्यांची एक वेबसाईट देखील आहे. परंतु लॉकडाउनमुळे त्यांचा कॅश प्लो पूर्णपणे थांबला. शिवाय त्यांनी ज्या अमेरिकी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते त्या सर्व कंपन्या डबघाईला गेल्या. परिणामी स्टफला कोट्यवधींचे नुकसान झाले. आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेलेली ही कंपनी कुठलाही व्यवसायीक खरेदी करण्यास तयार नव्हता. अखेर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिनेड बाउचर यांनी केवळ एक न्यूझीलंड डॉलर अर्थात भारतीय चलनानुसार ४६.४१ (आजचा भाव) रुपयांना ही कंपनी विकत घेतली.
या वर्षात अर्थव्यवस्था ५ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज : क्रिसिल
बिगर कृषी क्षेत्राचा विकास दर उणे ६.३ राहण्याची शक्यता
कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे चालू आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था पाच टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. बिगर कृषी क्षेत्राचा विकास दर उणे ६.३ टक्क्यांपर्यंत घसरू शकतो.
पत मानांकन संस्थेने मंगळवारी जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली. अहवालानुसार, देशाने स्वातंत्र्यानंतर ते आतापर्यंत तीन वेळा मंदीचा सामना केला आहे. म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर शून्यापेक्षा कमी होता. आर्थिक वर्ष १९५७-५८ मध्ये जीडीपीत १.२ %, १९६५-६६ मध्ये ३.७%आणि १९७९-८० मध्ये ५.२ % घसरण झाली होती.
आधीच्या मंदीपेक्षा वेगळी असेल कोरोना काळातील मंदी
यापूर्वी तीनदा दुष्काळामुळे कृषी क्षेत्राचा जीडीपी घसरल्याने मंदी आली होती. लॉकडाऊनमुळे सर्व बिगर कृषी क्षेत्रावर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष १९५७-५८ मध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर उणे ४.५ %े होता. तर १९६५-६६ मध्ये कृषी क्षेत्रात ११%आणि १९७९-८० मध्ये १३%घसरण झाली.