⁠  ⁠

चालू घडामोडी : २६ नोव्हेंबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 26 November 2019

अमेरिकेचे नौदल प्रमुख स्पेन्सर यांची हकालपट्टी

l 4 5

नेव्हीसील (नौसैनिक) प्रकरण योग्य प्रकारे न हाताळल्याने लष्करी अधिकारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण झाले असा आरोप करून अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी नौदल प्रमुख रिचर्ड स्पेन्सर यांना पदावरून काढून टाकले.
इराकमध्ये एडवर्ड गॅलघर या नेव्ही सीलने २०१७ मध्ये इराकमध्ये प्रेताबरोबर स्वत:चे छायाचित्र काढले होते त्या प्रकरणात त्याची पदावनती करण्यात आली, पण नंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या नौदल सीलला ( नौसैनिक) परत पूर्वीच्या पदावर आणले होते.

सुभाष चंद्रा यांचा ZEEच्या चेअरमनपदाचा राजीनामा

subhash chandra goyal

झी इंटरटेनमेंट इंटरप्रायजेस लिमिटेडचे (ZEEL) प्रवर्तक सुभाष चंद्रा यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. कंपनीने देखील त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. यानंतर चंद्रा आता गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत असतील. तसेच चंद्रा यांच्याकडे आता केवळ कंपनीचे पाच टक्के शेअर्स राहतील.
एस्सेल समूहावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी उद्योजक सुभाष चंद्रा गोयल यांनी नुकताच झी एंटरटेनमेंटमधील १६.५ टक्के हिस्सा विकण्याच्या निर्णय घेतला होता. ही हिस्सेदारी विकल्यानंतर एस्सेल समुहावर ६००० कोटी रुपयांचे कर्ज शिल्लक राहिल. झी समूह ९० टीव्ही चॅनेल चालवते. १९९२ मध्ये झीने देशात पहिल्यांदा सॅटेलाईट चॅनेलची सुरुवात केली होती. समूहाने सप्टेंबरमध्ये झी एंटरटेनमेंटमधील ११ टक्के हिस्सा ४,२२४ कोटी रुपयांना इन्व्हेस्को-ऑपेनहायमर या मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक कंपनीला विकला होता.
अंटलांटास्थित इनव्हेस्को झी एंटरटेनमेंटमध्ये २००२ पासून ७.७४ टक्के हिस्सा राखून होती. समूहाने यापूर्वीही माध्यम, मनोरंजन क्षेत्रातील कंपनीतील हिस्सा विक्रीची तयारी यापूर्वीही दर्शविली होती. एस्सेल समूहातील भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांकडून वित्तसंस्था, म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीनंतर वर्ष २०१८ च्या अखेरीस समूहाच्या थकीत कर्जाच्या हप्त्यांच्या परतफेडीतील अपयश एकूणच वित्तीय जगतात चर्चेत आले आहे. एस्सेल समूहाने कर्जाची रक्कम १७,००० वरून कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. गेल्या काही महिन्यांमध्ये ते ६,००० कोटींवर आले. मात्र ते निर्धारीत कालावधीत शून्यावर आणण्याचे समूहाचे लक्ष्य अद्यापही पूर्ण झालेले नाही.

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : स्पेनची सहाव्या विजेतेपदावर मोहोर

l 15 2

-राफेल नदालने डेनिस शापोव्हालोव्हला नमवून स्पेनला रविवारी सहावे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. माद्रिद येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा २-० असा पराभव केला.
-अंतिम सामन्यात रॉबटरे बॉटिस्टा एग्युटने फेलिक्स ऑगेर-अ‍ॅलिआसिमेचा ७-६ (७/३), ६-३ असा पराभव करून स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मग नदालने शापोव्हालोव्हला ६-३, ७-६ (९/७) असे पराभूत केले.
-३३ वर्षीय नदालसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले. त्याने फ्रेंच आणि अमेरिकन अशा दोन ग्रँडस्लॅम जेतेपदासहित जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे डेव्हिस विजेतेपदाने त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

  • ६ स्पेनने डेव्हिस चषक स्पर्धेत २०००, २००४, २००८, २००९, २०११, २०१९ अशी सहा जेतेपदे पटकावली आहेत.
  • ४-१ नदालने स्पेनच्या चार (२००४, २००९, २०११, २०१९) डेव्हिस चषक विजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर रॉजर फेडररने स्वित्र्झलडला फक्त २०१४ मध्ये एकमेव डेव्हिस चषक जिंकून दिला आहे.

ब्राझीलच्या फ्लमेंगा क्लबला किताब

फ्लमेंगा क्लबने काेपा लिबर्टाडाेरेसमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्यानंतर येथील चाहत्यांनी या क्लबच्या एेतिहासिक विजयाचे काैतुक करताना थेट व्हिक्ट्री परेड काढली. लॅटिन अमेरिकेतील फुटबाॅलच्या प्रचंड लाेकप्रियतेचा प्रत्यय या चाहत्यांनी अाणून दिला. ब्राझीलच्या या क्लबने शनिवारी ९.५६ वाजता रिव्हर प्लेटवर २-१ ने मात केली अाणि कोपा लिबर्टाडोरेस किताब जिंकला. त्यानंतर रविवारी रात्री क्लबने ८.५२ वाजता ब्राझीलच्या लीगचे विजेतेपद पटकावले आहे.
रिअो दी जानेरिअो | फ्लमेंगा क्लबने काेपा लिबर्टाडाेरेसमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्यानंतर येथील चाहत्यांनी या क्लबच्या एेतिहासिक विजयाचे काैतुक करताना थेट व्हिक्ट्री परेड काढली. लॅटिन अमेरिकेतील फुटबाॅलच्या प्रचंड लाेकप्रियतेचा प्रत्यय या चाहत्यांनी अाणून दिला. ब्राझीलच्या या क्लबने शनिवारी ९.५६ वाजता रिव्हर प्लेटवर २-१ ने मात केली अाणि कोपा लिबर्टाडोरेस किताब जिंकला. त्यानंतर रविवारी रात्री क्लबने ८.५२ वाजता ब्राझीलच्या लीगचे विजेतेपद पटकावले आहे.

नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.

Share This Article