⁠  ⁠

चालू घडामोडी : २६ ऑक्टोबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs : 26 October 2020

पोर्तुगीज ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत : हॅमिल्टनचे विक्रमी ९२वे जेतेपद

Hamilton seeks record 92nd win on F1's return to Portugal | Inquirer Sports

ब्रिटनचा ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन याने फॉम्र्युला-वनच्या इतिहासात नव्या अध्यायाची नोंद केली.
पोर्तुगीज ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावत हॅमिल्टनने फॉम्र्युला-वनमध्ये ९२ जेतेपदे मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने मायकेल शूमाकर याचा विक्रम मोडीत काढला.
हॅमिल्टनने मर्सिडिझ संघातील सहकारी वाल्टेरी बोट्टास याला २५.६ सेकंदाच्या फरकाने मागे टाकत सहजपणे जेतेपद पटकावले. रेड बुलच्या मॅक्स वेस्र्टापेन याने तिसरे स्थान प्राप्त केले. हॅमिल्टनचे हे यंदाच्या मोसमातील आठवे जेतेपद ठरले.
हॅमिल्टनने २००७मध्ये फॉम्र्युला-वनमधील पहिली शर्यत जिंकली. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने जगज्जेतेपदाला गवसणी घातली.
२०१३मध्ये शूमाकर निवृत्त झाल्यानंतर त्याची मर्सिडिझ संघातील जागा हॅमिल्टनने घेतली. त्यानंतर मर्सिडिझचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॅमिल्टनने पाच जगज्जेतेपदे
आता शूमाकरच्या सात जगज्जेतपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी यंदा हॅमिल्टनकडे आहे.

Asian Online Chess स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकवल

CHESS

Online Chess Championship स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाने इंडिनेशियावर ६-२ च्या फरकाने मात करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
याआधीही भारतीय संघाने ऑगस्ट महिन्यात FIDE Online Olympiad स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे कोनेरु हम्पी, डी. हरिका यासारख्या खेळाडूंव्यतिरीक्त स्पर्धेत उतरलेल्या भारतीय महिला संघाने बहारदार कामगिरी केली.
दुसरीकडे भारतीय पुरुष संघाला मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून ३.५ – ४.५ अशा एका गुणाच्या फरकाने पराभव पत्करावा लागला.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील सरकारची हिस्सेदारी संपणार?

bank | ബാങ്കുകളുടെ ലയനം തുടരും; അടുത്ത ഘട്ടത്തിൽ ദേനാ ബാങ്ക്, വിജയ ബാങ്ക്,  യൂക്കോ ബാങ്ക്, യൂണിയൻ ബാങ്ക് ഓഫ് ഇന്ത്യ, യുണൈറ്റഡ് ബാങ്ക് ഓഫ് ...

सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याच्या दिशेने पावले उचलण्याच्या तयारीत आहे. हिस्सेदारी विकून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतून बाहेर पडण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. सूत्रानुसार खासगी क्षेत्रातील बँकांच्या मालकीसंदर्भ (आरबीआय) नियम रिझर्व्ह बँकेने सुलभ करावेत,अशी सरकारची इच्छा आहे.
खासगीकरण करण्यात येणाऱ्यां बँकांमध्ये सरकारची हिस्सेदारी किती असावी, या मुद्द्यावर आरबीआय, पंतप्रधान कार्यालय आणि वित्तमंत्रालय चर्चा करत आहे.
सार्वजनिक बँकांतील सरकारची हिस्सेदारी विकून बँकांचे खासगीकरण आकर्षक करणे, हा सरकारचा हेतू आहे. खासगीकरण करण्यात येणाऱ्या बँकांत सरकारची हिस्सेदारी किती असावी, याबाबत पंतप्रधान सरकारबाहेरील अधिकारी तज्ज्ञांशी सल्लामसलत करीत आहेत.
खासगीकरण करण्यात येणाऱ्या बँकांत सरकारने हिस्सेदारी ठेवू नये, सरकारचे थोडे जरी समभाग असल्यास खासगी बँकांच्या संचालक मंडळाच्या निर्णयात सरकार हस्तक्षेप करणार नाही. हे खासगी बँकांना पटवू्न देणे कठीण जाईल. तेव्हा सरकारची हिस्सेदारी नसणे हेच खासगी कंपन्यांसाठी आकर्षक ठरू शकते.

सतर्कता व भ्रष्टाचार निर्मूलन’ विषयी राष्ट्रीय परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 ऑक्टोबर 2020 रोजी ‘सतर्कता (दक्षता) व भ्रष्टाचार निर्मूलन’ विषयी एका राष्ट्रीय परीषदेचे आभासी पध्दतीने उद्घाटन करणार आहेत.
“सतर्क भारत, समृध्द भारत” (Vigilant India, Prosperous India) या या कार्यक्रमाचा विषय असणार आहे.
ठळक बाबी
केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) दरवर्षी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत ‘सतर्कता जागृती सप्ताह’ साजरा करीत असतो आणि ही परिषद याच सप्ताहात आयोजित केली जात आहे.
परिषदेत सतर्कता या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यायोगे लोकांमध्ये जनजागृती करणे आणि नागरिकांना सहभागी करीत भारताच्या सार्वजनिक जीवनातली अस्मिता आणि सत्यनिष्ठा या संकल्पनांचे सबळीकरण हा या परीषदेचा हेतू आहे.
या तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत परदेशी कायद्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या कक्षांमुळे तपास करण्यात येणारी आव्हाने, भ्रष्टाचार विरोधात कार्यरत नियंत्रणासाठी सतर्कता प्रक्रिया, आर्थिक घोटाळे समाविष्ट असणाऱ्या कार्यप्रणालीतल्या सुधारणा आणि बँकांमधल्या फसवणूकींना प्रतिबंध, लेखा परीक्षण प्रभावीपणे करुन त्याने विकास घडवून आणणे, भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यात नव्या सुधारणा करत भ्रष्टाचार विरोधात लढणे, क्षमता विस्तार आणि प्रशिक्षण, त्वरित आणि प्रभावीपणे तपास करण्याकरता बहुआयामी समन्वय, आर्थिक अपराध करणाची प्रवृत्ती, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या उत्तम कार्यपध्दतींचे एकमेकांत आदानप्रदान या सारख्या विषयांवर चर्चा होणार आहे.

Share This Article