Current Affairs 27 & 28 March 2018
1) न्यूयॉर्क एअरपोर्टवर पाक पंतप्रधानांची झडती
येथील जॉन एफ केनडी एअरपोर्टवर सुरक्षेच्या नावावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान यांची झडती घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी खाकान त्यांच्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. हा त्यांचा खासगी दौरा होता. पण या दरम्यान ते अमेरिकेते उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांनाही भेटले होते.
– 2011 मध्ये माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचीही न्यूयॉर्क एअरपोर्टवर झडती घेण्यात आली होती. पण भारताने यासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतर अमेरिकेने माफी मागितली
होती.
– माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची वाशिंग्टनच्या डल्लास आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2002 आणि 2003 मध्ये स्ट्रिप सर्च करण्यात आले होते. त्यावर त्यांनी त्याठिकाणचे
डेप्युटी सेक्रेटरी स्ट्रोब टॅलबॉट यांच्याकडे रागात तक्रार केली होती.
– ऑगस्ट 2016 मध्ये शाहरुख खानला अमेरिकेच्या लॉस एंजल्स एअरपोर्टवर ताब्यात घेतले होते.
– अॅक्टर इरफान खानलाही 2008 मध्ये लॉस एंजल्स आणि 2009 मध्ये न्यूयॉर्क एअरपोर्टवर ताब्यात घेण्यात आले होते.
– 2009 मध्ये नील नितीन मुकेशलाही न्यूयॉर्क एअरपोर्टवर ताब्यात घेण्यात आले होते.
– 2010 मध्ये भारताचे तत्कालीन हवाई उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांची शिकागो एअरपोर्टवर चौकशी करण्यात आली होती.
2) टेम्परिंग करणाऱ्या बेनक्राफ्टवर फक्त 9 महिने बंदी, वॉर्नर-स्मिथवर एक वर्ष
क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) ने दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटीत बॉल टेम्परिंग प्रकरणात माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ, उपकर्णधार डेवीड वॉर्नर यांच्यावर एका वर्षांची बंदी घातली आहे. तर प्रत्यक्ष बॉल टेम्परिंग करणाऱ्या कॅमरून बेनक्रॉफ्टवर फक्त 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. सीएने या प्रकरणी कोच डॅरेन लेहमनला मंगळवारीत क्लीनचीट दिली आहे. तिसऱ्या कसोटीत कॅमरून बेनक्रॉफ्ट चेंडूबरोबर छेडछाड करत असल्याचे पाहायला मिळाले. स्टीव स्मिथ आणि बेनक्रॉफ्टने प्रेस कॉन्फरन्समध्ये बॉल टेम्परिंग केल्याचे कबूल केले.
टेम्परिंग प्रकरणी प्रथमच एका वर्षाचा बॅन
– क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच बॉल टेम्परिंग प्रकरणी एखाद्या खेळाडूवर एका वर्षाचा बॅन लावण्यात आला आहे.
– मैचचा बॅन सर्वात आधी 2001 मध्ये सचिन तेंडुलकरवर लागला होता. पण तोही नंतर हटवण्यात आला.
– 2010 मध्ये शाहीद आफ्रिदीवर सर्वाधिक दोन मॅचचा बॅन लागला होता.
3) वार्षिक परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय मागे
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत वार्षिक परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा केली.
राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 9 वीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे, असा आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने काढला होता. अचानक आलेल्या या आदेशामुळे शाळांचे नियोजन तर कोलमडणार होतेच, पण अनेकांचे गावाला जाण्याचे बेतही रद्द केले होते. परिणामी या निर्णयाबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात होती.
4) शी जिनपिंग-किम जोंग उन यांची ऐतिहासिक भेट
उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी अचानक चीन दौरा करून शी जिनपिंग यांची भेट घेतली. 2011 मध्ये उत्तर कोरियाची सत्ता हाती घेतल्यानंतर किम जोंग उन यांचा हा पहिला परदेश दौरा आहे. ते आपल्या पत्नीसह 4 दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत.
5) चीनचे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळणार
चीनचे अंतराळ स्थानक “टियागोंग-१’ ३१ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान पृथ्वीवर कोसळणार आहे. चीनने २०११ मध्ये या स्थानकाची स्थापना केली होती. २०१६ मध्ये चीनच्या शास्त्रज्ञांनी अंतराळ स्थानकावरील नियंत्रण गमावले होते. तेव्हापासून टियागोंग अंतराळात भरकटले होते. इंधन कमी झाल्यानंतर टियागोंग काही अवधीनंतर पृथ्वीच्या दिशेने कोसळू लागले होते. आता ते पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले असून कधीही पृथ्वीवर कोसळू शकते. शास्त्रज्ञांनी कोसळण्याची तारीख जाहीर केली आहे. अंतराळ स्थानक एवढ्या कालावधीत भरकटत-भरकटत पूर्णपणे नष्ट झाले आहे. आता मात्र त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहे. अंतराळ स्थानकात अद्यापही जळालेले इंधन शिल्लक आहे. हे इंधन अनेक शहरांसाठी नुकसानकारक ठरू शकते. जगातील ८० टक्के शहरे या धोक्याच्या सावटाखाली आहेत. ३८ शहरांना सर्वात जास्त धोका आहे. या शहरांमध्ये न्यूयॉर्क, बार्सिलोना, रोम, माद्रिद, बीजिंग, इस्तंबूलसारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. युरोपीय अंतराळ संस्थेने (ईएसए) सांगितले की, आधीच्या अंदाजानुसार अंतराळ स्थानक ३ एप्रिलला पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल. मात्र, आता ही तारीख १-२ दिवस पुढे सरकली आहे. अंतराळ स्थानक ८५ टनांचे आहे.
6) मादाम तुसाँ म्युझियममध्ये कोहलीचा मेणाचा पुतळा
भारताचा कर्णधार विराट कोहली आता सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि लिओनेल मेस्सी यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. कारण मादाम तुसाँ म्युझियममध्ये आता कोहलीचा मेणाचा पुतळा बनवण्यात येणार आहे. कोहलीने 12 वर्षांपूर्वी भारताला 19-वर्षांखालील विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यानंतर भारताच्या पुरुष संघाचे नेतृत्वही त्याच्याकडेच सोपवण्यात आले आहे. कोहलीला पद्म आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्याचबरोबर त्याला आयसीसी आणि बीसीसीआयने पुरस्कार दिले आहेत.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.