चीनच्या नकाशात पूर्ण काश्मीर भारताचेच
- चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’च्या (बीआरआय; पूर्वीचे नाव वन बेल्ट वन रोड) दुसऱ्या परिषदेमध्ये चीन सरकारने सादर केलेल्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असल्याचे दाखविण्यात आले आहे.
- पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचा आणि अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट असल्याचा दावा करणाऱ्या चीनची ही भूमिका आश्चर्यकारक आहे.
- ‘बीआरआय’च्याच कार्यक्रमातून चीनने पाकिस्तानात ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपेक) विकसित करण्यात आला आहे. हा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून गेला असून, त्यासाठी ६६ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे.
अमित आणि पूजाची सुवर्णकिमया!
- अमित पांघलने (५२ किलो) वर्षांतील सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली, तर पूजा राणीने (८१ किलो) महिलांच्या विजेतेपदाला गवसणी घातल्यामुळे आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पध्रेतील भारताच्या अभियानाची सांगता सुखद झाली.
- भारताने दोन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्य अशा एकूण १३ पदकांची कमाई केली. आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी प्रथमच एकत्रितपणे आयोजित करण्यात आली होती.
विनेश, साक्षीला कांस्यपदक
- रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक आणि आशियाई क्रीडा स्पध्रेतील विजेत्या विनेश फोगटला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- साक्षीला ६२ किलो वजनी गटामध्ये उपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागला, परंतु कांस्यपदकाच्या ‘प्ले-ऑफ’ सामन्यात साक्षीने उत्तर कोरियाच्या ह्य़ोन ग्याँग मूनला नमवून कांस्यपदक पटकावले.
अमित पंघलला सुवर्णपदक
- भारताचे बॉक्सर अमित पंघल आणि पुजा राणी यांनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अमितने ५२ किलो वजनी गटात कोरियाच्या किम इंक्यूवर मात केली.
- तर महिलांमध्ये पुजा राणीने ८१ किलो वजनी गटात वँग लिनावर मात केली.
- ४९ किलो वजनी गटातून ५२ किलो वजनी गटात सामने खेळायला लागल्यानंतर अमितचं या स्पर्धेतल सलग दुसऱ्या वर्षातलं सुवर्णपदक ठरलं आहे. अमितने सामन्यात सुरुवातीपासून आपलं वर्चस्व कायम राखलं.
- आक्रमण आणि बचाव या जोरावर अमितने आपल्या प्रतिस्पर्ध्याला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही.
१७ वर्षीय दिव्यांशने कमावला ऑलिम्पिक कोटा, रौप्यपदकाची कमाई
- चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धात, भारताच्या १७ वर्षीय दिव्यांश सिंहने ऑलिम्पिक कोटा कमावला आहे. १० मी. एअर रायफल प्रकारात दिव्यांशने रौप्यपदकाची कमाई केली. या कामगिरीसह दिव्यांशने २०२० टोकियो ऑलिम्पिकचा कोटा कमावला आहे.
- पहिल्या दिवशी दिव्यांशने अंजुम मुद्गीलच्या साथीने दिव्यांशने मिश्र एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
- चीनचा प्रतिस्पर्धी झिचेंग हुईने ०.४ गुणांनी बाजी मारत सुवर्णपदकाची कमाई केली. दिव्यांशने अखेरच्या संधीत २४९.० गुणांची कमाई करत रौप्यपदक आपल्या नावे केलं. रशियाच्या ग्रिगोरी शामाकोव्हला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
भास्कर कांबळी 2019 चा मुंबई महापौर श्री:
- ग्रेस फिटनेसच्या भास्कर कांबळीने एकापेक्षा एक अशा सरस असलेल्या खेळाडूंवर सहज मात करीत मुंबई महानगर पालिकेचा पुरस्कार लाभलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री 2019 वर आपले नाव कोरले आणि शरीरसौष्ठव हंगामाचा आपला शेवट दणदणीत केला.
- पालिकेकडून केवळ दीड लाखांचा तुटपंजा निधी मिळाला असतानाही बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन यांनी पुन्हा एकदा दमदार शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचे धाडस दाखवले.
- सर्वत्र निवडणूकांची रणधुमाळी सुरू असल्यामुळे या स्पर्धेला फारसे कॉर्पोरेट तसेच राजकीय बळही लाभू शकले नाही. तरीही संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अजय खानविलकर यांनी पुन्हा एकदा शरीरसौष्ठव खेळाला आर्थिक बळ दिले.
- क्रीडाप्रेमी संतोष राणे यांनी केलेल्या सहकार्यामुळे अनंत अडचणी येऊनही यंदाही मुंबई महापौर श्री स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्याचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी सांगितले. आमचा खेळ असंख्य क्रीडाप्रेमी संघटक आणि हितचिंतकांमुळे आर्थिकदृष्ट्या चांगलाच सक्षम झाल्याचेही सावंत म्हणाले.
‘ईपीएफ’वर यंदा 8.65 टक्के व्याज मिळणार:
- आर्थिक वर्ष 2018-19 साठी कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) 8.65 टक्के व्याज देण्याच्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
- यामुळे ईपीएफओच्या 6 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) ईपीएफओच्या चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ 8.65 व्याज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
- सुत्रांनी सांगितले की, वित्तीय सेवा विभागाने रिटायरमेंट फंडच्या पुरेशा व्यवस्थापनाशी निगडीत काही अटी पूर्ण करण्याच्या आधारावर ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
- याआधी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या तीन वर्षांत ईपीएफच्या व्याजदरात केलेली ही पहिली वाढ आहे. - 2015-16 या आर्थिक वर्षात 8.8 टक्के इतका व्याजदर होता, तो 2016-17 मध्ये 8.65 टक्क्यांवर आणण्यात आला. 2017-18 मध्ये तो 8.55 टक्के म्हणजे आणखीच घट करण्यात आली. मात्र, आता 2018-19 मध्ये वाढ करण्यात आली आहे.
विश्वचषकाच्या 22 पंचांमध्ये भारताचे फक्त एक पंच:
- इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी तीन विश्वविजेते खेळाडू आणि सुंदरम रवी या एकमेव भारतीय पंचाचा 22 जणांच्या सामनाधिकाऱ्यांच्या चमूत समावेश करण्यात आला आहे.
48 दिवसांच्या विश्वचषकासाठी एकूण 16 पंच, सहा सामनाधिकारी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) निवड केली आहे. - तर यात डेव्हिड बून, ब्रुस ऑक्सनफोर्ड, कुमार धर्मसेना, आलीम दर यांचा समावेश आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी पंच व सामनाधिकाऱ्यांची नेमणूक राऊंड रॉबिन टप्प्यांचे सामने संपल्यानंतर जाहीर केली जाईल.