Current Affairs 27 April 2020
अमेरिकन कला-विज्ञान अकादमीवर भारतीय वंशाच्या रेणू खटोर
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ ह्य़ूस्टन सिस्टीमच्या कुलगुरू रेणू खटोर यांची अमेरिकन कला व विज्ञान अकादमीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. खटोर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोलाचे मानले जाते.
खटोर (५१) या आता अकादमीच्या अडीचशे प्रतिष्ठित सदस्यांपैकी एक असणार आहेत. या अकादमीत साहित्यिक, वैज्ञानिक, स्वयंसेवी संस्था, खासगी क्षेत्र, शिक्षण या क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. खटोर यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. त्या भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी पहिल्या महिला कुलगुरू असून अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या पहिल्या स्थलांतरित प्रमुख आहेत. खटोर या २००८ पासून कुलगुरू आहेत व त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केल्याने अकादमीवर निवडण्यात आले आहे.
या अकादमीची स्थापना १७८० मध्ये झाली असून जॉन अॅडम्स, जॉन हॅनकॉक यांच्यासह साठ विद्वानांच्या पुढाकारातून ती आकारास आली.
अमेरिकन कला व विज्ञान अकादमीच्या सदस्यांमध्ये २५० नोबेल व पुलित्झर मानक ऱ्यांचा समावेश आहे.
पाकिस्तानची माजी कर्णधार साना मिर क्रिकेटमधून निवृत्त :
- पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार साना मिरने 15 वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
- तर 34 वर्षीय सानाने 226 सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. यापैकी 2009 ते 2017 या कालखंडातील 137 सामन्यांत देशाचे नेतृत्व केले.
- तसेच पाकिस्तानतर्फे एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील सर्वाधिक बळी ऑफ-स्पिनर सानाच्या नावे आहेत. तिने 120 सामन्यांत 150 बळी मिळवले आहेत, तर 106 ट्वेन्टी-20 सामन्यांत 89 बळी मिळवले आहेत.
संजय कोठारी नवे दक्षता आयुक्त
राष्ट्रपतींचे सचिव संजय कोठारी यांची दक्षता आयोगाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या जून महिन्यापासून हे पद रिक्त होते. राष्ट्रपती भवनात त्यांचा शपथविधी झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या नियुक्तीला संमती दिली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले होते पण प्रत्यक्ष शपथ विधी होण्यास एप्रिल अखेर उजाडली आहे. त्यांच्या नियुक्तीला कॉंग्रेसने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ही निवड बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे कॉंग्रेसने म्हटले होते.
ज्या व्यक्तीने या पदासाठी अर्जही केला नव्हता त्यांची या पदासाठी नियुक्ती करणे बेकायदेशीर आहे. या पदासाठी जी नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती त्यातही त्यांचे नाव नव्हते असा दावा कॉंग्रेसने केला आहे. कोठारी हे 1978 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. ते जून 2016 मध्ये निवृत्त झाले आहेत. 2017 पासून ते राष्ट्रपतींचे सचिव म्हणून काम करीत आहेत. त्यांची नियुक्ती चार वर्षांसाठी आहे.