⁠  ⁠

चालू घडामोडी : २७ एप्रिल २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read
Checking site.

‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमासह तीन पुरस्कार पटकावलेDaniel Kaluuya

९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात ‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमासह तीन पुरस्कार पटकावले आहे.
डॅनियेल कालूया या अभिनेत्याला यंदाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमासाठी त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा : दीपिका, अतानूला सुवर्णपदकdeepika atanu 1

भारताचे अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतानू दास यांनी सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली.
भारताने तीन सुवर्ण आणि एक कांस्यपदकासह आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या दीपिकाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीतील तिसरे सुवर्णपदक प्राप्त केले.
दीपिकाचा पती अतानू याने पुरुषांच्या रिकव्र्ह प्रकाराच्या अंतिम फेरीत बाजी मारत विश्वचषकातील आपले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले.
तिसऱ्या मानांकित दीपिकाने अंतिम फेरीत अमेरिकेच्या आठव्या मानांकित मॅकेन्झी ब्राऊन हिचा शूट-ऑफमध्ये ६-५ असा पराभव करत जेतेपद संपादन केले.
दीपिकाने उपांत्य फेरीत मेक्सिकोच्या अलेक्जांड्रा व्हॅलेन्सिया हिला ७-३ असे हरवले होते.

कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : नेपोमनियाचीला जेतेपदNepomnia

रशियाच्या इयान नेपोमनियाची याने १३व्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वचिएर-लॅग्रेव्हविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवत कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.
एक फेरी शिल्लक राखत नेपोमनियाचीने ८.५ गुणांसह अग्रस्थान पटकावले.
नेपोमनियाचीने वचिएर-लॅग्रेव्हविरुद्ध बरोबरी पत्करल्यानंतर नेदरलँड्सच्या अनिश गिरी याला रशियाच्या अलेक्झांडर ग्रिशुककडून पराभूत व्हावे लागल्याने नेपोमनियाचीचे जेतेपद निश्चित झाले.
नेपोमनियाचीने ८.५ गुण मिळवत अग्रस्थान पटकावले तर गिरीला ७.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
२००२मध्ये १० वर्षांखालील गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कार्लसनला मागे टाकून नेपोमनियाचीने विजेतेपद मिळवले होते.
आता दोन दशकानंतर जगज्जेतेपदाचा मुकुट कार्लसनकडून हिरावून घेण्याची संधी नेपोमनियाचीला मिळणार आहे.

बार्सिलोना ओपन : राफेल नदालचे १२ वे विजेतेपद

जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या स्पेनच्या ोमराफेल नदालने स्टीफनोस सितसिपासला ६-४, ६-७(६), ७-५ असे पराभूत करत १२ व्यांदा बार्सिलोना ओपन स्पर्धा जिंकली आहे.
यापूर्वी नदालने २०१८मध्ये बार्सिलोना ओपनच्या अंतिम सामन्यातही सितसिपासला हरवून विजेतेपद जिंकले होते.
२० वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या नदालच्या कारकीर्दीचे हे ८७वे विजेते आहे.
गेल्या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर हे त्याचे यंदाचे पहिलेच विजेतेपद आहे.
एटीपी ५०० स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर नदाल एकमेव खेळाडू आहे ज्याने १२ किंवा अधिक वेळा एकच स्पर्धा जिंकली आहेत. त्याने १२ वेळा रोलंड गॅरोसचे जेतेपदही जिंकले आहे.

Share This Article