⁠
Uncategorized

चालू घडामोडी : २७ ऑगस्ट २०२०

Current Affairs : 27 August 2020

ICC Test Rankings : अँडरसनचा TOP 10 मध्ये प्रवेश

James Anderson pujara

पाकिस्तानविरूद्ध दमदार गोलंदाजी करणाऱ्या जेम्स अँडरसनची दीर्घ काळानंतर जागतिक कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत TOP 10मध्ये ‘एन्ट्री’ झाली.
पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा गाठला.
अशी कामगिरी करणारा अँडरसन हा जगातील चौथा तर जलदगती गोलंदाजांपैकी पहिलाच खेळाडू ठरला. त्याचसोबतच ताज्या यादीत त्याने ६ स्थानांची झेप घेत आठवे स्थान पटकावले आहे. टॉप १० गोलंदाजांच्या यादीत याव्यतिरिक्त कोणताही बदल झालेला नाही.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतदेखील बेन स्टोक्सला अव्वल स्थान गमवावे लागले आहे. त्याच्याजागी वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने अव्वलस्थान परत मिळवले आहे. तो आठव्या स्थानी असून पुजाराने त्याच्या जागी सातवे स्थान पटकावले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या क्रमवारीत आपले दुसरे स्थान राखून आहे. याशिवाय इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला एका स्थानाने खाली ढकलत सातवे स्थान पटकावले आहे. भारताचे रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानी कायम आहेत.

टी२० क्रिकेटमध्ये ५०० बळी टिपणारा ड्वेन ब्राव्हो जगातील पहिला खेळाडू

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने टी२० क्रिकेटमध्ये कोणालाही न जमलेला पराक्रम करून दाखवला.
टी२० क्रिकेटमध्ये ५०० बळी टिपणारा ड्वेन ब्राव्हो हा जगातील पहिला खेळाडू ठरला.
कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० च्या सामन्यात ब्राव्होने सेंट ल्युसिया झोक्सचा फलंदाज रखीम कॉर्नवॉलला बाद करत ही कामगिरी केली. ब्राव्होने ५४९ टी२० सामन्यात ५०० बळी घेण्याची किमया साधली. आंतरराष्ट्रीय टी२० सामने आणि टी२० लीग स्पर्धा यांमध्ये मिळून ब्राव्होने हा पल्ला गाठला.
टी२० क्रिकेटमधील सर्वाधिक बळींच्या यादीत ड्वेन ब्राव्होनंतर दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आहे. त्याच्या नावावर ३९० बळी आहेत. ड्वेन ब्राव्होने ५०० बळी घेण्याचा पराक्रम क्वीन्स पार्क ओव्हल येथे केला. विशेष म्हणजे, वेस्टइंडिजचा महान गोलदांज कर्टनी वॉल्शने कसोटी क्रिकेटमध्ये ५००वा बळीदेखील याच मैदानावर घेतला होता.
ब्राव्हो आतापर्यंत जवळपास २१ वेगवेगळ्या संघांकडून टी२० सामने खेळला आहे. ड्वेन ब्राव्होने टी२० कारकिर्दीत सर्वाधिक वेळा कायरन पोलार्डला बाद केलं. त्याने आतापर्यंत पोलार्डला ९ वेळा बाद केलं. टी२० मध्ये ५०० बळी घेण्याबरोबरच ब्राव्होने कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये १०० बळीदेखील पूर्ण केले. अशी कामगिरी करणाराही तो एकमेव खेळाडू ठरला.

Related Articles

Back to top button