Current Affairs : 27 December 2020
मध्य प्रदेशात धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर
मध्य प्रदेश कॅबिनेटने धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर केलं आहे.
तर उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकार नंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील लव्ह जिहाद विरोधी कडक कायदा बनवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्यात आलं आहे.
तसेच यामध्ये अल्पवयीन व दलितांच्या जबरदस्ती धर्मांतराबद्दल शिक्षेची तरतूद आहे.
तर या विधेयकामध्य कुणाचे जबरदस्ती धर्मांतरण केल्याबद्दल 1 ते 5 वर्षे तरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे व कमीत कमी 25 हजार रुपये दंड आकरला जाऊ शकतो.
या कायद्यांतर्गत कोणत्याही अल्पवयीन, महिला, दलित व आदिवासींचे जबरदस्ती धर्मांतर केल्याबद्दल 2 ते 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते व कमीत कमी 50 हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
२०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था राहिल तिसऱ्या स्थानी
भारतीय अर्थव्यवस्था ही सन २०२५ पर्यंत जगातील पाचवी तर सन २०३० मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असं भाकीत सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या संस्थेनं वर्तवलं आहे.
भारत सन २०१९ मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. मात्र, सन २०२० मध्ये भारत पुन्हा सहाव्या स्थानावर फेकला गेला.
सीईबीआरच्या अहवालात म्हटलं की, करोना महामारी आणि रुपयाची डळमळीत स्थिती यामुळे भारत सहाव्या स्थानी ढकलला गेला. या वर्षी ब्रिटनने भारताला मागे टाकलं होतं. पण भारत २०२५ मध्ये पुन्हा ब्रिटनच्या पुढे निघून जाईल.
भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ९ टक्के आणि २०२२ मध्ये ७ टक्क्यांनी वाढेल असंही सीईबीआरने म्हटलं आहे. आर्थिक स्वरुपात भरभराट झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारताचा वेग कमी होईल आणि सन २०३५ मध्ये जीडीपीची वाढ ५.८ टक्के राहिल.
यादरम्यान भारत सन २०३० मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच भारत २०२५ मध्ये ब्रिटन, २०२७ मध्ये जर्मनी आणि २०३० मध्ये जपानला मागे टाकेल, असंही या अहवालात म्हटलं आहे.
तिरुअनंतपुरमच्या महापौरपदी २१ वर्षीय विद्यार्थीची निवड
केरळची राजधानी असणाऱ्या तिरुअनंतपुरमच्या महापौरपदी २१ वर्षीय विद्यार्थी असणाऱ्या आर्या राजेंद्रन हिची निवड करण्यात आली आहे.
सीपीआय-एम पक्षाने आर्याची तिरुअनंतपुरमच्या महापौरपदी निवड केली आहे.
विशेष म्हणजे आर्या सध्या बीएससी मॅथमॅटिक्सच्या दुसऱ्या वर्षाला असून तिचे अजून शिक्षणही पूर्ण झालेले नाही.
वयाच्या २१ व्या वर्षी महापौर होत आर्याने देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा मान मिळवला आहे.