Current Affairs 27 June 2020
पंजाब मुख्य सचिवपदी विनी
पंजाबचे आयएएस अधिकारी विनी महाजन यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झाली आहे. त्या पंजाबच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. मुख्य सचिव करण अवतारसिंग यांच्या जागी महाजन यांची निवड झाली. त्यांचे पती दिनकर गुप्ता हे पंजाबचे पोलिस महासंचालक असून दोघेही १९८७ च्या बॅचचे अधिकारी आहेत.
स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्यांमध्ये ब्रिटन अव्वल, तर भारत जगात ७७वा स्थानी

- ज्या देशांचे नागरिक व व्यावसायिक यांचा स्वीस बँकांत पैसा आहे, त्या देशांच्या जागतिक यादीत २०१९ मध्ये भारताची तीन स्थानांची घसरण झाली आहे.
- आदल्या वर्षी ७४ व्या स्थानी असलेला भारत २०१९ मध्ये ७७ व्या स्थानी आला आहे. स्वीत्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पहिल्या स्थानावर ब्रिटन कायम आहे.
- स्वीस नॅशनल बँकेने (एसएनबी) वार्षिक बँकिंग आकडेवारी जारी केली आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
- स्वीस बँकांत असलेल्या विदेशी नागरिकांच्या एकूण पैशात भारतीय नागरिक अथवा व्यावसायिकांच्या पैशाचे प्रमाण अत्यंत नगण्य ०.०६ टक्के आहे. स्वीस बँकांच्या भारतीय शाखांतील पैशाचाही यात समावेश आहे. या तुलनेत ब्रिटिश नागरिकांचा यातील वाटा तब्बल २७ टक्के आहे.
- २०१९ मध्ये भारतीयांकडून स्वीस बँकांत (भारतीय शाखांसह) पैसा ठेवण्याचे प्रमाण ५.८ टक्क्यांनी घसरून ८९९ स्वीस फ्रँकवर (६,६२५ कोटी रुपये) आले. ही स्वीस बँकांनी एसएनबीला दिलेली अधिकृत आकडेवारी असून, यातून काळ्या पैशाचे कोणतेही सूचन होत नाही. याशिवाय भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय अथवा इतरांनी तिसऱ्या देशाच्या संस्थांमार्फत स्वीस बँकांत ठेवलेल्या पैशाचा यात समावेश नाही.
- सर्वोच्च दहा देशांचा यातील वाटा जवळपास दोनतृतीयांश आहे. सर्वोच्च दहा देशांत जर्मनी, लुक्झेंबर्ग, बहामास, सिंगापूर आणि केमॅन आयलॅण्ड यांचा समावेश आहे. सर्वोच्च १५ देशांचा यातील वाटा जवळपास ७५ टक्के, तर सर्वोच्च ३० देशांचा वाटा जवळपास ९० टक्के आहे. पाच देशांचा समूह असलेल्या ‘ब्रिक्स’ गटात भारताचा सर्वांत कमी, तर २०व्या स्थानी असलेल्या रशियाचा सर्वाधिक पैसा स्वीस बँकांत आहे.
- ब्रिटन अव्वल स्थानावर
- स्वीस बँकांत पैसा असणा या सर्वोच्च पाच देशांत ब्रिटन, अमेरिका, वेस्ट इंडीज, फ्रान्स आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. स्वीस बँकांत असलेल्या एकूण विदेशी निधीत या पाच देशांचा वाटा ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.
भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार – IMF

- भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार असं वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
- भारताच्या अर्थव्यवस्थेला अनपेक्षित असा फटका बसला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था दोन वर्षे धीम्या गतीने प्रगती करेल तसंच भारताचा जीडीपी पुढची दोन वर्षे अवघा एक टक्क्याने वाढेल असं त्यांनी म्हटलं आहे.
- सध्याच्या करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत असाही एक सल्ला गीता गोपीनाथ यांनी दिला आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेत सुधारणा आणायच्या असतील तर लघू आणि मध्यम उद्योग करणाऱ्यांना आणखी आर्थिक उभारी द्यावी लागेल असंही त्यांनी सुचवलं आहे.
इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल : लिव्हरपूलला जेतेपद

- १९७०-८०च्या दशकात इंग्लिश प्रीमियर फु टबॉल लीगवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या लिव्हरपूलसारख्या अव्वल क्लबला विजेतेपदासाठी तब्बल ३० वर्षे प्रतीक्षा पाहावी लागली. चेल्सीने दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर सिटीला २-१ असे पराभूत के ल्यामुळे लिव्हरपूलने १९९०नंतर प्रथमच इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद संपादन केले.
- सामाजिक अंतराचे नियम आणि गर्दीसंबंधातील कायदे असतानाही अॅनफिल्ड स्टेडियमबाहेर एकत्र जमून लिव्हरपूलच्या चाहत्यांनी विजेतेपदाचा जल्लोष साजरा केला. शेकडो चाहत्यांनी जमून फटाक्यांची आतषबाजी केली तसेच लिव्हरपूलच्या विजयाच्या घोषणाही दिल्या.
- लिव्हरपूल ८६ गुणांसह अग्रस्थानी असून मँचेस्टर सिटीला (६३ गुण) उर्वरित सात सामन्यांमध्ये २३ गुणांची पिछाडी भरून काढता येणार नसल्याने लिव्हरपूलला विजेता घोषित करण्यात आले.
अव्वल ३० स्टार्टअप मानांकनात बंगळुरू २६ वर, देशातील एकच शहर
देशाची स्टार्टअप राजधानी म्हणून प्रसिद्ध बंगळुरूच्या शिरपेचात अाणखी एक मानाचा तुरा खाेवला अाहे. जगातील अव्वल ३० स्टार्टअप इकाेसिस्टिम मानांकनात स्थान मिळवणारे बंगळुरू हे एकमेव शहर ठरले अाहे. या मानांकनात शहराला २६ वे स्थान मिळाले अाहे. ग्लाेबल स्टार्टअप इकाेसिस्टिम रिपाेर्ट २०२० नुसार अव्वल ३० मध्ये कॅलिफाेर्नियाची सिलिकाॅन व्हॅली पहिल्या स्थानावर अाहे. देशाची राजधानी दिल्ली या मानांकनात ३६ व्या स्थानावर अाहे.
स्पर्धा परीक्षांचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.