ग्रँडमास्टर लेऑन मेंडोसाला जेतेपद
भारताचा युवा ग्रँडमास्टर लेऑन ल्युक मेंडोसा याने हंगेरी येथे झालेल्या दुसऱ्या कुमानिया बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
गोव्याच्या १५ वर्षीय मेंडोसाने या स्पर्धेत अपराजित राहताना चार विजय आणि पाच डाव बरोबरीत सोडवले.
त्याने नऊ फेऱ्यांमध्ये ६.५ गुणांची कमाई केली. मेंडोसा आणि स्लोव्हाकियाचा मिलान पॅचर यांचे समान गुण झाले, पण सरस टाय-ब्रेकच्या आधारे मेंडोसाने जेतेपद प्राप्त केले.
पहिला डाव बरोबरीत सोडवल्यानंतर मेंडोसाने सलग चार विजय प्राप्त केले. त्यानंतरचे चार डाव बरोबरीत सोडवत त्याने ६.५ गुण मिळवले.
तेजस्विनी-संजीव यांना सुवर्णपदक
महाराष्ट्राची तेजस्विनी सावंत आणि संजीव राजपूत या अनुभवी नेमबाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले.
तसेच ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताने सुवर्णपदकाची भर घातल्यानंतर विजयवीर सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली.
यासह भारताने १२ सुवर्ण, ८ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह एकूण २७ पदकांनिशी अग्रस्थानी मजल मारली आहे.
सुवर्णपदकासाठी रंगलेल्या अंतिम लढतीत भारताच्या या जोडीने युक्रेनच्या सेरहिय कुलिश आणि अॅना इलिना यांच्यावर ३१-२९ असा थरारक विजय मिळवला.
तेजस्विनी-संजीव यांनी आपला अनेक वर्षांचा अनुभव पणाला लावत हे सुवर्णपदक खेचून आणले. यासह भारताची सुवर्णपदकांची संख्या ११वर पोहोचली आहे. भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि सुनिधी चौहान यांनी अमेरिकेच्या टिमोथी शेरी आणि विर्जिनिया थ्रॅशर यांच्यावर ३१-१५ अशी सहज मात करत कांस्यपदक पटकावले.
नेमबाजी विश्वचषक : महाराष्ट्राच्या तेजस्विनी सांवतचा सुवर्णवेध
नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह नेमबाजी श्रेणीत सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सांवतने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.
तेजस्विनीने संजीव राजपूतसह 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र गटात ही कामगिरी नोंदवली.
अंतिम सामन्यात त्यांनी युक्रेनच्या सेर्ही कुलिश आणि अॅना इलिना यांचा 31-22 असा पराभव केला.
या विश्वचषकातील भारताचे हे 11वे सुवर्णपदक आहे. दरम्यान, ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि सुनिधी चौहान यांनी अमेरिकेच्या टिमोथी शेरी आणि व्हर्जिनिया थ्रेशरचा 31-15 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले.
यापूर्वी राजपूत आणि तेजस्विनीने 588 गुण मिळवून अंतिम पात्रता फेरी गाठली होती. दोन्ही नेमबाजांनी 294–294 गुण घेतले.
गुरप्रीतसिंग, अनीश भानवाला आणि विजयवीर सिद्धू हे तिन्ही भारतीय नेमबाज पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यापूर्वी, महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेतील तिन्ही पदके भारताला मिळाली आहेत. या प्रकारात चिंकी यादवने सुवर्ण, राही सरनोबतने रौप्य तर मनु भाकेरने कांस्यपदक जिंकले आहे.