Current Affairs : 27 October 2020
द्विपक्षीय चर्चेसाठी अमेरिकेचे दोन मंत्री भारतात
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ व संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर यांचे ‘दोन अधिक दोन’ संवादासाठी दिल्लीत आगमन झाले.
दोन अधिक दोन संवादाची ही तिसरी वेळ असून इंडो-पॅसिफिक भागात सहकार्य तसेच संरक्षण व सुरक्षा या दोन क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधात सुधारणा हे या संवादाचे दोन मुख्य उद्देश असणार आहेत.
प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांवर सहकार्य हा त्यांच्या भेटीचा एक हेतू आहे.
२०१८ मध्ये ‘कम्युनिकेशन्स कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अॅग्रीमेंट’ (सीओएमसीएएसए) करार दोन्ही देशात झाला होता.
२०२० मध्ये भारताला २० अब्ज डॉलर्सचे संरक्षण साहित्य विक्री करण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे. दोन अधिक दोन संवाद प्रथम सप्टेंबर २०१८ मध्ये दिल्लीत झाला होता.
दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी कायदा
दिल्लीतील प्रदूषणाची समस्यासाठी सर्वंकष कायदा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून यासंदर्भातील सविस्तर अहवाल चार दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल. कायद्याद्वारे कायमस्वरूपी संस्थात्मक निर्मिती केली जाईल.
दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० हून अधिक नोंदवला गेला असून दसऱ्यानिमित्त होणाऱ्या रावणदहनामुळेही प्रदूषणात वाढ झाली आहे.
हिवाळ्यात प्रामुख्याने पंजाब व हरियाणामध्ये शेतातील खुंटे जाळणीच्या प्रकारांमुळे दिल्लीतील प्रदूषणात वाढ होते.
या समस्येचा अभ्यास करण्यासाठी गेल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश मदन लोकूर यांची समिती नेमली होती. मात्र, या संदर्भात केंद्र कायदा करणार असल्याने लोकूर समिती तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या तीन सदस्यीय पुढे सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान महाधिवक्ता तुषार मेहता यांनी केंद्राच्या निर्णयाची माहिती दिली. प्रदूषणामुळे लोकांचा श्वास घुसमटत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करावीच लागेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
चंद्रावर पाणी सापडल्याचा NASAचा दावा
चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला आहे.
चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असंही नासाने म्हटलं आहे.
नासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे ट्विट काही वेळापूर्वीच करण्यात आलं आहे. नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टाइन यांनी ही माहिती दिली आहे.
अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी आपल्या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे.
एवढंच नाही तर आता नासाने दोन अंतराळवीरांनाही २०२४ पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे.
जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल असंही नासाने सांगितलं आहे. चंद्रावर पाणी सापडल्याच्या शोधाने आता नासाच्या चांद्रयान मोहिमेला बळ मिळालं आहे.
बुद्धिबळ : भारताच्या १४ वर्षीय लियोन ल्यूकने जिंकला ग्रँडमास्टरचा किताब
भारताच्या १४ वर्षीय इंटरनॅशनल मास्टर लियोन ल्यूकने हंगेरीमध्ये रिगोचेस आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे. सहा गेम जिंकून त्याने हा किताब आपल्या नावे केला. यासह आता त्याला ग्रँडमास्टरच्या किताबाने गौरवण्यात आले. १० खेळाडूंच्या या स्पर्धेत ल्युकने नवव्या फेरीमध्ये सात गुणांची कमाई केली.
या स्पर्धेत तीन ग्रँडमास्टरसह १० बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. गोव्याच्या मेंडोसा (एलो २४९९ रेटिंग गुण) याने विलियम पाश्चलविरुद्धचा पहिला डाव जिंकल्यानंतर त्याला अॅलेक्स क्रूटूलोव्हिककडून पराभूत व्हावे लागले. तिसरा डाव बरोबरीत सोडवल्यानंतर त्याने सलग पाच डाव जिंकत अग्रस्थान पटकावले.
त्याने गुयेन हून मिन्ह हाय आणि डेव्हिड बेरके झ या दोन ग्रँडमास्टर्सवर मात केली. नवव्या डावात त्याला हंगेरीचा ग्रँडमास्टर अॅडम कोझाकविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. कोझाकला अर्ध्या गुणाने मागे टाकत मेंडोसाने जेतेपद पटकावले.
टेनिस : अलेक्झांडर ज्वेरेव आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा किताबाचा मानकरी
जर्मनीच्या सुपरस्टार टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने आठवडाभरात सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला. त्याने नुकताच कोलोन टेनिस चॅम्पियनशिप जिंकली. यादरम्यान त्याने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये श्वार्ट्््जमनला दाेन सेटमध्ये पराभूत केले. अव्वल मानांकित ज्वेरेवने ६-२, ६-१ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याला एक तास ११ मिनिटे शर्थीची झंुज द्यावी लागली. जर्मनीच्या २३ वर्षीय ज्वेरेवने पहिल्या आठवड्यातही एक किताब पटकावला.
अार्यना सबालेंकाचा डबल धमाका
बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने किताबाचा डबल धमाका उडवला. तिने ओस्त्रावा ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी व दुहेरीच्या गटाचे विजेतेपद जिंकले. तिसऱ्या मानांकित सबालेंकाने एकेरीच्या फायनलमध्ये माजी नंबर वन व्हिक्टोरिया अझारेंकाला ६-२, ६-२ ने पराभूत केले. त्यानंतर तिने जर्मनीच्या एलाइज मर्टेन्ससोबत महिला दुहेरीत चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला.