Current Affairs : 27 September 2020
राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना जाहीर झाला आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सीएसआयआर) विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार देशभरातील बारा वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. त्यापैकी चार वैज्ञानिक राज्यातील आहेत.
डॉ. अमोल कु लकर्णी हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत. अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणाऱ्या घटकांच्या निर्मितीसाठी वापर के ल्या जाणाऱ्या रासायनिक भट्टय़ांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे काम के ले आहे. तसेच भारतातील पहिली ‘मायक्रोरिअॅक्टर लॅबोरेटरी’ उभारण्याचा मान डॉ.
कु लकर्णी यांना जातो. भटनागर पुरस्कारासह डॉ. कु लकर्णी आणखी एका सन्मानाचे मानकरी ठरले आहेत. डॉ. ए. व्ही. राव अध्यासनासाठीही त्यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असून त्याद्वारे त्यांना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
तर डॉ. सूर्येदू दत्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत.
डॉ. दत्ता हे भूवैज्ञानिक असून, डॉ. आनंदवर्धनन गणित वैज्ञानिक आहेत. डॉ. दासगुप्ता भाभा अणू संशोधन के ंद्रात काम करतात. शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयर) ७९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री आणि सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांंपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. सीएसआयरचे संस्थापक संचालक शांती स्वरुप भटनागर यांच्या नावाने विज्ञान, तंत्रज्ञानात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
मालदीवची भारताला साथ
या वर्षाच्या सुरुवातीला OIC मध्ये भारताच्या बाजूने उभे राहिल्यानंतर मालदीवने सार्क परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा भारताला साथ दिली. १९ व्या सार्क परिषदेचे आयोजन पाकिस्तानात करण्याचा प्रस्ताव आला होता. पण हा प्रस्ताव रोखण्यात मालदीवने भारताला साथ दिली.
२०१६ साली सार्क परिषद स्थगित करण्यात आली होती. त्यावर्षी पाकिस्तानात या परिषदेचा संयोजक होता. पण उरीमध्ये भारताच्या सैन्य तळावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामुळे भारताने त्यावर्षीच्या सार्क परिषदेवर बहिष्कार घातला
परिषदेतील अन्य देशांनी सुद्धा भारताला साथ देत सार्कमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.
महाराष्ट्रात सुटी सिगारेट अन् बिडीच्या विक्रीवर बंदी
कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्वाच्या निर्णय घेतला आहे.
राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. यापुढे सिगारेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे.
या आदेशाची कठोर अंमजबजावणी करण्याचे आदेश देखील सरकारने पोलीस आणि महापालिकेला दिले आहे.
सिगारेट पाकिट अथवा बिडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश म्हणजे ‘आरोग्याच्या धोक्याची कल्पना’ हा साध्य होतो.