चालू घडामोडी : २८ ऑगस्ट २०२०
Current Affairs : 28 August 2020
टिकटॉकच्या सीईओचा राजीनामा
टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन मेयर यांनी राजीनामा दिला आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, केविन मेयर यांनी निवेदन प्रसिद्ध करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.
अमेरिकेत बंदी घातल्याच्या निर्णयाविरोधात टिकटॉक आणि कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविरोधात न्यायालयात धाव घेतल्याच्या काही दिवसांमध्येच मेयर यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला अमेरिकेत व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे. यावरुन टिकटॉकच्या कर्मचाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प चीनविरोधात भावना भडकवत असून फेरनिवडणुकीसाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जगातील सगळ्यात मोठं ‘अटल टनल’ तयार
१० हजार फुट लांब असलेला जगातिल सगळ्यात लांब रोड टनल अखेर भारतात तयार झाला आहे.
हा टनेल तयार करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला आहे. रोहतांग येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याचं नाव ‘अटल टनल’ आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या बोगद्याचे नाव ठेवलं आहे.
ज्याची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे. १०, १७१ फुटांवर अटल रोहतांग टनेल तयार करण्यात आलं आहे उंच टनेल आहे. या टनेलमुळे मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरनं कमी झाले आहे.
समुद्रसपाटीपासून जवळपास १२ हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक टनल मानला जात आहे.
स्वातंत्र्यानंतर तब्बल 74 वर्षांनी जम्मू काश्मीरच्या माछील सेक्टरमध्ये पोहोचली वीज
भारत पाकिस्तान सीमेलगतच्या भागात मागील काही दिवसांपासून विकासकामांना वेग आला आहे.
सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जम्मू काश्मीरच्या नियंत्रणरेषेजवळील कुपवाडा भागातील माछील सेक्टरमध्ये स्वातंत्र्यानंतर तब्बल 74 वर्षांनी वीज पोहोचली आहे.
कुपवाडा भागातील केरन सेक्टरमध्ये 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. पुढच्या वर्षी येणाऱ्या स्वातंत्र्यदिनापर्यंत जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात वीज पोहोचवण्याचा उद्देश आहे.