Current Affairs 28 December 2019
दिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी ; २.४ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
दिल्लीच्या तापमानात सध्या मोठ्या प्रमाणावर घट झाली असून आज पहाटे रेकॉर्डब्रेक २.४ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे
गेल्या 118 वर्षांचा रिकॉर्ड मोडत डिसेंबर महिन्यातील या थंडीमुळे दांतहोठ कापायला लागले आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात पडलेल्या या थंडीने गेल्या 118 वर्षांचा विक्रम मोडून काढला आहे. हवामान खात्यानुसार, 1901 पासून ते 2018 पर्यंतच्या काळात फक्त चार वेळा कमाल 20 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली. तर, दिल्लीएनसीआरमध्ये 1919, 1929, 1961 आणि 1997 मध्ये आतासारखी थंडी पडली होती. यावर्षी डिसेंबरमध्ये सर्वाधिक कमी 19.85 कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
घरांच्या किमतीत किरकोळ वाढीसह भारत ५७ देशांच्या यादीत ४६ वा
घरांच्या किमती वाढण्याच्या बाबतीत भारत जगात ५६ देशांच्या यादीत ४७ व्या क्रमांकावर आहे. चालू वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशात घरांच्या किमतीत केवळ ०.६ टक्के वाढ झाली आहे. ग्लोबल प्रॉपर्टी कन्सल्टंट नाइट फ्रँकच्या एका अहवालात ही माहिती दिली आहे.
अहवालानुसार मागणी मंदावल्यामुळे घरांच्या मागणीत किरकोळ वाढ झाली आहे. एप्रिल-जून तिमाहीत घरांच्या किमती वाढण्याच्या प्रकरणात भारत ११ व्या स्थानावर होता.
दरम्यान देशात घरांच्या किमतीत ७.७% ची वाढ झाली आहे. नाइट फ्रँकने अहवालात जागतिक गृह निर्देशांक तिसरी तिमाही २०१९ मध्ये ५६ देश आणि स्थानांवर आधारित सांख्यिकी आकड्यांच्या आधारावर घरांच्या किमतीचे आकलन केले आहे. भारत यामध्ये ५६ देशांच्या यादीत ४७ व्या स्थानी आहे. गेल्या चार वर्षांत किरकोळ महागाई दरापेक्षा कमी राहिल्या आहेत.
पाकिस्तानात ऐतिहासिक हिंदू मंदिर उघडणार
या वर्षी भारतीय भाविकांसाठी तीन धार्मिक स्थळे सुरू झाल्यानंतर आता पाकिस्तानात ऐतिहासिक हिंदू मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत.
हे मंदिर पाकिस्तानातील पेशावर येथे आहे. पंज तीरथ या नावाने ओळखले जाणारे हे हिंदू मंदिर पुढच्याच महिन्यात नव्या वर्षाला खुले करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पांडव अज्ञातवासात असताना याच मंदिराच्या जागी वास्तव्यास होते असे मानले जाते. भारत-पाक फाळणीनंतर हे मंदिर बंद करण्यात आले होते. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताने पूर्वीच या जागेला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले आहे.
मिलर मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत
सात ऑलिम्पिक पदकविजेती अमेरिकेची नामांकित कलात्मक जिम्नॅस्टिक्सपटू शॅनन ली मिलरची १७व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुंबई मॅरेथॉन स्पर्धा १९ जानेवारी, २०२० या दिवशी होणार असून अमेरिकेच्या ऑलिम्पिक ‘हॉल ऑफ फेम’ने दोन वेळा गौरवण्यात आलेली ४२ वर्षीय मिलर ही एकमेव महिला क्रीडापटू आहे. तिला २००६मध्ये वैयक्तिक, तर २००८मध्ये सांघिक कामगिरीसाठी या सन्मानाने गौरवण्यात आले होते.