चालू घडामोडी : २८ नोव्हेंबर २०२०
Current Affairs : 28 November 2020
सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये उणे ७.५ टक्के
भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग सलग दुसऱ्या तिमाहीत अतिमंदच राहिला असून चालू वित्त वर्षांच्या जुलै ते सप्टेंबर दरम्यान सकल राष्ट्रीय उत्पादन उणे (-) ७.५ टक्के नोंदले गेले. पहिल्या, एप्रिल ते जून तिमाहीतील उणे (-) २३.९ टक्क्य़ांनंतर सलग दुसऱ्या तिमाहीतही ते उणेच राहिले आहे.
शिथील झालेल्या टाळेबंदीमुळे पहिल्या तिमाहीच्या तुलनेत विकासदर दुहेरी अंकऱ्हासातून काहीसा सावरला असला तरी त्याचा उणे प्रवास दुसऱ्या तिमाहीतही कायम राहिला.
गेल्या तिमाहीत निर्मिती आणि कृषी क्षेत्र वगळता इतर प्रमुख क्षेत्रांत निराशाजनक कामगिरी नोंदली गेली. आहे.
सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये उणे ७.५ टक्के इतका नोंदवला गेला. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर उमे २३.९ टक्के इतका नोंदवला गेला झाली होती. आता जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी उणे ७.५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली. मागील चाळीस वर्षात पहिल्यांदा जीडीपीमध्ये इतकी घसरण झाली आहे.
पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये ऐतिहासिक अशी उणे २३.९ टक्के घसरण झाली आहे. तर आता दुसऱ्या तिमाहीत उणे ७.५ टक्के घसरण झाली आहे. या आकडेवारीमुळे देश आर्थिक मंदीच्या छायेत आहेत हे स्पष्ट होतं आहे. दोन तिमाहीमध्ये जीडीपी म्हणजेच विकासदर हा उणे राहिला तर तांत्रिकदृष्ट्या अर्थव्यवस्था मंदीत असल्याचं म्हटलं जातं.
बांधकामासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात ५० टक्के तर उत्पादन क्षेत्रात ४० टक्के घसरण झाी आहे.
ही दोन क्षेत्र भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती करतात.कोणत्याही अर्थव्यवस्थेची वाढ होण्यासाठी वस्तूंना असलेल्या मागणीचा आणि खरेदीचा मोठा वाटा असतो. या काळात ६० टक्के घसरण झाली कमी झालेलं उत्पन्न, अनेकांचे रोजगार गेल्याने वाढलेलं बेरोजगारीचं प्रमाण यामुळे लोकांनी खर्च कमी केले आणि उद्योगांनी गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं. करोनाच्या जागतिक संकटामुळे अनेक लहान उद्योग कोलमडून पडले त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला.
अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार
आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यंदा मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना जाहिर झाला आहे.
फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. अक्षय इंडीकर यांची ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.
ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. आता हा पुरस्कार अक्षय इंडीकर यांना मिळणार आहे.
आशिया पॅसिफिक विभागातील सुमारे ७० देशांमधून या पुरस्कारासाठी एकाची निवड केली जाते. आजतायगत सुमारे ३००० सिनेमे या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरले आहेत. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी अक्षय इंडीकर यांना मिळालेला हा बहुमान ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
‘उदाहरणार्थ नेमाडे’ या वेगळ्या धाटणीच्या सिनेमापासून आपल्या कारकीर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात करणारे अक्षय इंडीकर, आपल्या स्वतंत्र व अनोख्या शैलीमुळे जगभरात नावाजले गेले आहेत.
उदाहरणार्थ नेमाडेनंतर ‘त्रिज्या’ व ‘स्थलपुराण’ हे त्यांचे सिनेमे जगभारतल्या अत्यंत प्रतिष्ठित सिनेमहोत्सवात झळकले. स्थलपुराण हा सिनेमा बर्लीन अंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात ‘जनरेशन कॉम्पिटिशन’ या विभागात प्रदर्शीत झाला होता. शिवाय अतिशय मानाच्या अशा क्रिस्टल पुरस्कारासाठी त्यांना नामांकनं ही मिळाले होते.
या आधी असघर फरादी, बॉग्न जून हो, मनोज बाजपेयी, राजकुमार राव, नवाजुद्दीन सिद्दकी यांच्यासारख्या सिनेक्षेत्रात काही वेगळं करून दाखवणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
कोरोन ‘लसी’बाबत भारताचा रशियाबरोबर मोठा करार
हैदराबाद – करोनाविरोधात सर्वात प्रथम तयार केल्याचा दावा असलेल्या रशियाच्या स्पुटनिक या लसीचे उत्पादन भारतामध्ये करण्यासाठी हिटेरो या औषध निर्माण कंपनीने रशियाबरोबर करार केला आहे.
“रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’ या रशियाच्या स्वायत्त वित्तीय संस्थेबरोबर हा करार केला गेला असून या करारानुसार हिटेरो कंपनी स्पुटनिक-5 लसीचे 10 कोटी डोसचे उत्पादन करणार आहे.
2021 च्या प्रारंभीच्या काळात हिटेरोच्या हिटेरो बायोफार्मा या उपकंपनीच्या माध्यमातून हे लस निर्मितीचे काम सुरू केले जाणार आहे.
रशियातील गामालेया सेंटर आणि आरडीआयएफ यांनी 24 नोव्हेंबर रोजी स्पुटनिक-5 लसीच्या परिणमकारकतेविषयी मोठा सकारात्मक दावा केला होता.
बेलारूस, युएई, व्हेनेझुएला आणि इतर देशांमध्ये या चाचण्या चालू आहेत.