चालू घडामोडी : २९ ऑगस्ट २०२०
Current Affairs : 29 August 2020
डच लेखिका मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना बुकर पुरस्कार
2020 वर्षासाठीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 29 वर्षीय डच लेखिका मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना घोषित झाला आहे. बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या लेखिका ठरल्या आहेत.
नेदरलॅंडमधल्या ग्रामीण भागातील एका धार्मिक शेतकरी कुंटुबाच्या कहाणीवर आधारित “द डिसकंफर्ट ऑफ ईवनिंग’ या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची 50 हजार पौंड रक्कम लेखिका आणि अनुवादक मिशेल हचिंसन यांच्यात विभागून दिली जाणार आहे.
इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेले आणि ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या कोणत्याही भाषेतील कल्पित पुस्तकास दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात येतो.
हा पुरस्कार मुख्य बुकर पुरस्कारापेक्षा वेगळा आहे आणि जगभरातील दर्जेदार पुस्तके अधिक प्रकाशित करणे आणि वाचली जाणे, यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिला राजीनामा
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पदाचा राजीनामा दिला.
आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या.
अखेर आज शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
नीलेश कुलकर्णी यांच्या संस्थेला खेळ प्रोत्साहन पुरस्कार
भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांचा शनिवार, २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळ प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
खेळाडूंना योग्य कारकीर्दीच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचे आणि विकासाच्या दृष्टीने खेळांना प्रोत्साहन देण्याचे कार्य कुलकर्णी यांच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटतर्फे (आयआयएसएम) करण्यात येते.
४७ वर्षीय कुलकर्णी यांनी ३ कसोटी आणि १० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
१० वर्षांपूर्वी त्यांनी ‘आयआयएसएम’ संस्थेची स्थापना केली. या संस्थेत क्रीडा व्यवस्थापनाचे शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. अंधेरी येथे असलेली ही संस्था कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी रसिका यांच्यातर्फे चालवण्यात येते.
कोरोनाचा जीएसटीवर परिणाम, 2.35 लाख कोटींचे नुकसान – केंद्र सरकार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 41 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीचे आयोजित करण्यात आले होते.
या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले की, केंद्र सरकारने 2019-20 या वित्तीय वर्षासाठी राज्यांना जीएसटी नुकसान भरपाई म्हणून 1.65 लाख कोटी रुपये जाहीर केले आहेत.
तसेच, जीएसटी नुकसान भरपाईसाठी जमा करण्यात आलेला उपकर (Cess) 95,444 कोटींचा होता. तर राज्यांना 1.65 लाख कोटी रुपये देण्यात आले.
केंद्र आणि राज्यांमध्ये जीएसटी कंपेनसेशनबाबत वाद सुरू आहेत. जीएसटी कायद्याअंतर्गत, 1 जुलै, 2017 पासून जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षात राज्यातील महसुलातील तोटा भरुन काढण्याची हमी दिलेली आहे. मात्र, महसूल वाटपाच्या सध्याच्या सूत्रानुसार केंद्र सरकार राज्यांच्या जीएसटीचा हिस्सा देण्यास सक्षम नाही आहे.
जुलै महिन्यात एकूण जीएसटी संकलन 87,422 कोटी रुपये होते. तर, जून 2020 मध्ये एकूण जीएसटी संकलन 90,917 कोटी रुपये होते. जुलैमधील 87,422 कोटी रुपये जीएसटी कलेक्शनमध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) म्हणून 16,147 कोटी, राज्य जीएसटी (SGST) म्हणून 21,418 कोटी आणि आयजीएसटी म्हणून 42,592 कोटी रुपये समाविष्ट आहेत.
‘ब्लॅक पँथर’ स्टार चाडविक बॉसमन यांचे निधन
नवी दिल्ली : ब्लॅक पँथर या मार्वल स्टुडिओ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे हॉलिवूड स्टार चाडविक बॉसमन यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 43 वर्षांचे होते. चाडविक हे गेल्या 4 वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते.