Current Affairs 29 February 2020
पृथ्वीचा ‘दुसरा चंद्र सापडला
पृथ्वीचा दुसरा चंद्र शोधल्याचा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी पृथ्वीच्या दुसऱ्या चंद्राला २०२० सीडी थ्री असं नाव दिलं आहे.
मागील तीन वर्षांपासून हा अगदी लहानश्या आकाराचा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. अमेरिकेतील अॅरेझॉना येथील कॅटालीना स्काय सर्व्हे येथील संशोधकांनी या चंद्राचा शोध लावला आहे. १९ फेब्रुवारी रोजी येथील संशोधकांना हा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना दिसला. याआधीही संशोधकांना हा चंद्र सहा वेळा दिसला होता. त्यामुळे हा पृथ्वीचा मीनी मून असण्यावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केला आहे. हा चंद्र १.९ मीटर लांब आणि ३.५ मीटर रुंद आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर तो एका लहान गाडीच्या आकाराचा आहे.
“सध्या या चंद्राच्या प्रदक्षिणा घालण्याच्या मार्गावरुन हा पृथ्वीभोवती फिरत असल्याचे दिसते. सुर्यामुळे या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या मिनी मूनवर काही परिणाम झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही.
महाराष्ट्राचा ‘स्टेट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मान
नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडेंट येथे सीएनबीसी टीव्ही 18 इंडिया ने आयोजित केलेल्या इंडियन बिजनेस लीडर ॲवार्ड कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याला ‘स्टेट ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वीकारला.
उत्कृष्ट उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी, जीवनगौरव पुरस्कार दीपक पारेख, क्रीडा क्षेत्रात पुल्लेला गोपिचंद, उत्कृष्ट व्यवसाय क्षेत्रात एचडीएफसी बँक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण
मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
मुस्लिम समाजाला ९ जुलै २०१४ रोजी अध्यादेश काढून पाच टक्के आरक्षण देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी अंतरिम आदेशाद्वारे शिक्षणामध्ये दिलेले आरक्षण वैध ठरविले, तर नोकऱ्यांमधील आरक्षणाला स्थगिती दिली. पण अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर न झाल्याने २३ डिसेंबर २०१४ रोजी अध्यादेश संपुष्टात आला. मात्र न्यायालयाने आरक्षण लागू काळातील शिक्षण संस्थांमध्ये दिले गेलेले प्रवेश आणि नोकऱ्या अबाधित ठेवल्या असून प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षणात आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढून नोकऱ्यांमध्ये ते देण्याबाबत पुढील टप्प्यात निर्णय घेतला जाईल
राज्यात सर्वाधिक हवा प्रदूषण असलेले पुणे शहर पहिल्या दहा क्रमांकात
राज्यात सर्वाधिक हवा प्रदूषण असलेल्या शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे पहिल्या दहा क्रमांकात आले आहे.
‘एक्यूआय एअर व्हिज्युअल’ या स्विस संस्थेने जगभरातील तीन हजार शहरांमध्ये गेल्या वर्षभरात २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. यामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये पुणे २९९ व्या क्रमांकावर आले आहे.
हवेच्या गुणवत्तेनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने उत्तम, समाधानकारक, आजारी माणसांसाठी धोकादायक, रोगट आणि श्वसनास अतिधोकादायक आणि विषारी हवा असे निकष निश्चित केले आहेत. या मानकांनुसार पुणे शहरामध्ये एकही महिना उत्तम श्रेणीतील हवेची गुणवत्ता आढळून आलेली नाही.
जगातील सर्वांत जास्त प्रदूषण करणारे देश
बांगलादेश
पाकिस्तान
मंगोलिया
अफगाणिस्तान
भारत
इंडोनेशिया
बहारिन
नेपाळ
उझबेकिस्तान
इराक
चीन
इथे हवेची गुणवत्ता चांगली नाही प्रदूषण
आयलंड, स्वीडन, नॉर्वे, न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, डेन्मार्क
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे
ग्रीनपीस संस्थेने जगातील तीन हजार शहरांचे सर्वेक्षण केले असून यात पहिल्या दहा शहरांमध्ये सहा शहरे भारतातील; तर तीन पाकिस्तान आणि एक चीनमधील आहे. हवेचे प्रदूषण करणाऱ्या जगभरातील देशांमध्ये आशियाई देशांचा सर्वांत मोठा वाटा आहे. पहिल्या पन्नास प्रदूषित शहरांमध्ये चीन, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील शहरे सर्वाधिक आहेत.
दिल्ली ही जगातील सर्वांत प्रदूषित राजधानी आहे. फिनलँड, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, इस्टोनिया, आइसलँड हे देश सर्वांत कमी प्रदूषण करीत आहेत.
सर्वांत प्रदूषित शहरे
अतिसूक्ष्म धूलिकणांचे सरासरी प्रमाण (पीएम २.५)
(मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरमध्ये)
गाझियाबाद (भारत) ११०.२
होतान (चीन) ११०.१
गुजरनवाला (पाकिस्तान) १०५.३
फैसलाबाद (पाकिस्तान) १०४.६
दिल्ली (भारत) ९८.६