---Advertisement---

चालू घडामोडी : २९ जुलै २०२०

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

Current Affairs 29 July 2020

ICC ODI Ranking : विराट-रोहित अव्वल स्थानावर कायम

virat and rohit
  • भारतीय वन-डे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे.
  • तर गोलंदाजांच्या यादीत भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी कायम राहिला आहे. मंगळवारी आयसीसीने वन-डे क्रमवारी जाहीर केली. या यादीत विराट ८७१ गुणांसह पहिल्या तर रोहित ८५५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
  • गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह ७१९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट ७२२ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. दरम्यान ३० जुलै पासून आयसीसीच्या बहुचर्चित ODI Super League स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
  • भारतात २०२३ साली होणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ही स्पर्धा प्रत्येक संघासाठी महत्वाची आहे.

बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंदचा पहिला विजय

viswanathan anand 2
  • पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने सहा लढतींच्या पराभवाची मालिका अखेर खंडित केली.
  • भारताच्या आनंदने सातव्या फेरीत इस्रायलच्या बोरिस गेलफं डचा २.५-०.५ असा पाडाव करत लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत पहिला विजय मिळवला.
  • सलगच्या सहा पराभवानंतर आपल्या प्रदीर्घ काळापासूनच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळताना आनंदने सुरुवातीच्या आघाडीसह पहिला डाव जिंकला.
  • काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने ४५ चालीत गेलफं डला निरुत्तर केले. त्यानंतर दुसरा डाव ४९ चालीत जिंकत आनंदने आघाडी घेतली. तिसऱ्या डावात ४६ चालीत दोघांनीही बरोबरी मान्य के ल्याने आनंदला हा सामना जिंकता आला.
  • या विजयासह आनंदने सहा गुणांनिशी आठव्या क्रमांकावर मजल मारली आहे. आता आठव्या फे रीत आनंदचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे. लिरेन तीन गुणांसह १०व्या क्रमांकावर आहे. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने पीटर स्विडलरचा २.५-१.५ असा सहज पराभव करत सर्वाधिक २० गुणांनिशी अग्रस्थान भक्कम केले आहे.


जगातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात

India alone accounts for 70% of the world's tigers: Javadekar | जगातील ७० टक्के वाघ एकट्या भारतात-जावडेकर
  • जगात असलेल्या एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ आता एकट्या भारतात आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले की, भारतात सुमारे ३० हजार हत्ती आणि ५०० सिंहही आहेत.
  • जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जावडेकर यांनी भारतातील वाघांविषयीचा ‘आॅल अबाऊट टायगर एस्टिमेशन २०१८’ या नावाचा एक अहवाल जारी केला. जावडेकर यांनी सांगितले की, १९७३ साली भारतात ९ व्याघ्र अभयारण्ये होती. त्यांची संख्या आता ५० झाली आहे.
  • जगाच्या एकूण जमिनीपैकी फक्त २.५ टक्के जमीन भारतात आहे. मात्र, आपली जैवविविधता ८ टक्के आहे.
  • जगातील फक्त १३ देशांत आता वाघ सापडतात. वाघांच्या संवधर्नासाठी काम करणाºया लोकांना प्रशिक्षण देण्यास भारत तयार आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे काही वर्षांपूर्वी वाघांचे वास्तव्य असलेल्या देशांच्या प्रमुखांची बैठक झाली होती. या बैठकीत २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय झाला होता. याच बैठकीत २९ जुलै हा ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
  • कॉर्बेट अभयारण्यात सर्वाधिक वाघ
  • अहवालातील माहितीनुसार, भारतातील वाघांपैकी सर्वाधिक २३१ वाघ कॉर्बेट अभयारण्यात आहेत. मात्र, मिझोरममधील डम्पा अभारण्य, प. बंगालमधील बक्सा अभयारण्य व झारखंडमधील पलामाऊ अभयारण्य या तीन अभयारण्यांत एकही वाघ उरलेला नाही. भारतात आढळणाºया एकूण वाघांपैकी ६५ टक्के म्हणजेच १,९२३ वाघ अभयारण्यात आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now