रशिया टेक्नॉलॉजीसह घातक मिग-३५ भारताला द्यायला तयार
- अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन प्रमाणे रशियाच्या मिग कॉर्पोरेशननेही भारताला अत्याधुनिक मिग-३५ विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे. भारताकडून फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धेत असलेल्या चार ते पाच परदेशी कंपन्यांमध्ये मिग कॉर्पोरेशनही आहे. रोसोबोरोनेक्सपोर्टच्या माध्यमातून मिग कॉर्पोरेशन फायटर विमान पुरवठयाचे कंत्राट मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे.
- भारताच्या मेक इन इंडिया धोरणाशी सुसंगत मिग-३५ फायटर विमानांची निर्मिती करण्याची तयारी मिग कॉर्पोरेशनने दाखवली आहे. अनेक दशकाच्या सहकार्यामधून मिग विमानांसाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही भारतात उभारले आहे.
- मिग-३५ मध्ये हे नवीन अत्याधुनिक विमान असून त्यामध्ये सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे. पाचव्या पिढीच्या फायटर विमानाचे तंत्रज्ञान यामध्ये आहे.
- भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात रशियन बनावटीच्या फायटर विमानांची संख्या सर्वात जास्त आहे. भारताकडे मिग-२१, मिग-२७, मिग-२९ आणि सुखोई ही रशियन विमाने आहेत. पु
गुरूच्या आकाराएवढे दोन बाह्य़ग्रह शोधण्यात यश
- पृथ्वीपासून १५० प्रकाशवर्षे दूर अंतरावर वैज्ञानिकांनी गुरू ग्रहाच्या आकाराएवढे दोन बाह्य़ग्रह शोधून काढले आहेत, सौरमालेत लहान ग्रहांवर जीवसृष्टी शक्य आहे की नाही यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे.
- हे ग्रह गुरू एवढे असून पृथ्वीवरील जीवसृष्टीची वाटचाल या शोधातून समजू शकेल. इतर किती ताऱ्यांभोवती असे गुरूएवढे ग्रह आहेत हे माहिती नसले तरी त्यांच्या वसाहतयोग्यतेबाबत यातून प्रकाश पडू शकतो. या ग्रहांवर महासागराच्या रूपात पाणी असू शकते शिवाय उल्का, धुमकेतू व लघुग्रह यांना त्यांच्या कक्षेतून बाहेर फेकण्याची क्षमताही असावी त्यामुळे तेथून सुटलेले हे घटक इतर लहान ग्रहांवर आदळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- या ग्रहांच्या ताऱ्याभोवती अनेक मोठे ग्रहही सापडले आहेत. असे असले तरी त्यांचा उपयोग आपल्याला सौरमालेच्या रचनेचे आकलन करून घेण्यासाठी फारसा होणार नाही कारण शनी, युरेनस व नेपच्यून हे सर्व ग्रह सूर्यापासून लांब अंतरावर आहेत.
- पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास एक वर्ष लागते, गुरूला १२ वर्षे, शनीला ३० वर्षे तर नेपच्यूनला १६४ वर्षे लागतात. त्यामुळे लांबचे बाह्य़ग्रह ओळखणे अशाच जास्त कालावधीमुळे अवघड असते. त्यासाठी वैज्ञानिकांचे सगळे आयुष्य अपुरे पडते.