Current Affairs – 29 October 2016
देश-विदेश
# बेनामी संपत्ती कायदा १ नोव्हेंबरपासून लागू होणार
बेनामी व्यवहार रोखणारा नवा कायदा १ नोव्हेंबरपासून पूर्ण देशभरात लागू करण्यात येणार असून, यामुळे बेनामी संपत्ती तसेच व्यवहार करणाऱ्यांना ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. धार्मिक विश्वस्तांना या कायद्याच्या बाहेर ठेवण्याच्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निर्णयानंतर काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी संसदेने ऑगस्टमध्ये बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायदा पारित केला केला आहे. बेनामी संपत्ती प्रतिबंध या नवीन कायद्यातील नियम आणि तरतुदींची अमंलबजावणी १ नोव्हेंबर २०१६ पासून करण्यात येणार आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर १९८८ च्या बेनामी व्यवहार कायद्याचे नाव बदलणार असून, ते बेनामी संपत्ती व्यवहार प्रतिबंध कायदा,१९८८ असे होणार असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डाने (सीबीडीटी) माहिती देताना म्हटले आहे.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
# लष्करी दले ही सरकारला उत्तरदायी – सर्वोच्च न्यायालय
लष्करी दले ही सरकारला उत्तरदायी आहेत अन्यथा भारतात मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा राहिला असता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांच्या विरोधातील याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठाचे न्यायाधीश अमिताव रॉय व उदय ललित यांनी वरील मत व्यक्त केले. पाकव्याप्त काश्मीरमधील निवडक हल्ल्यांचे श्रेय सरकार घेत आहे, असा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका विचारात घेण्यासारखी नाही व ती फेटाळण्यात येत आहे. लष्करी दले ही सरकारला उत्तरदायी आहेत अन्यथा देशात लष्करी कायदा राहिला असता असे न्यायालयाने सांगितले. वकील एम.एल. शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले होते की, संरक्षण मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या निवडक हल्ल्यांचे श्रेय घेत आहेत. त्यांना तसे श्रेय घेण्याचा अधिकार नाही कारण राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे सेनादलांचे प्रमुख असतात. त्यांनी पुढे म्हटले आहे की, लष्करी दलांनी केलेल्या कारवाईचा उपयोग काही व्यक्तींच्या हितासाठी करण्यात आला.
# न्यायव्यवस्था बंद पाडायची आहे का ?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल
देशभरातील हायकोर्टांमध्ये न्यायाधीशांच्या नेमणुकीला विलंब होत असल्याने सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे कान उपटले आहेत. तुम्हाला न्यायव्यवस्था बंद पाडायची आहे का अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे. तातडीने न्यायाधीशांची नेमणूक केली नाही तर पंतप्रधान कार्यालय आणि कायदे मंत्रालयातील सचिवांना समन्स बजावू अशी तंबीच सुप्रीम कोर्टाने दिली आहे. न्यायाधीशांची नेमणूक करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची कानउघडणी केली. गेल्या नऊ महिन्यांपासून तुम्ही न्यायाधीशांची यादीच तयार करत आहेत. प्रशासकीय दिरंगाई न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करत आहे अशी नाराजीच सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने याला प्रतिष्ठेचा विषय बनवू नये. न्यायाधीशांअभावी आज कर्नाटक हायकोर्टातील एक मजला बंद पडला आहे असे कोर्टाने निदर्शनास आणून दिले. दोन संस्था आमने सामने उभ्या ठाकाव्यात अशी आमची इछ्छा नाही. पण न्यायव्यवस्थेला वाचवणे गरजेचे आहे असे कोर्टाने सांगितले.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]
# गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे निधन
गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या त्या कन्या होत्या. गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या प्रमुख नेत्या म्हणून शशिकला काकोडकर प्रसिद्ध होत्या. दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर शशिकला काकोडकर यांनी १९७३ मध्ये गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर एप्रिल १९७९ पर्यंत त्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होत्या. गोव्यामध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात शशिकला काकोडकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. ९० च्या दशकमध्ये शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी मराठी भाषेला प्राथमिक शिक्षणात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले होते. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणावर इंग्रजी भाषेचा असलेला पगडा कमी करण्यातही त्यांनीच महत्त्वाची भूमिका निभावली होती. सध्या प्राथमिक शिक्षणात इंग्रजीचे वाढत असलेले महत्त्व याच विषयावरून गोव्यातील राजकीय वातावरण पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापलेले आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंच या गोव्यातील संघटनेचे अध्यक्षपदा शशिकला काकोडकर यांच्याकडेच होते.
# ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन
ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखले जात होते. प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या पळशीकर यांनी सामाजिक – राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे. ‘नवभारत’ या मासिकाचे ते संपादकही होते. गेल्या काही वर्षांपासून शारीरिक व्याधींमुळे त्यांनी लिखाण थांबवले होते. वसंत पळशीकर यांचा जन्म १९३६ मध्ये झाला होता. वैयक्तिक आयुष्यात वैचारिकतेला महत्त्व देणारे पळशीकर हे त्यांच्या साधेपणासाठीही तितकेच ओळखले जात. संवादाला प्राधान्य देणारे पळशीकर यांच्याकडे ज्ञान आणि माहितीचा खजिना म्हणूनच बघितले जात होते. पर्यावरण, कामगारविषयक, स्त्री – पुरुषविषयक, धर्म-अंधश्रद्धेपासून ते गांधी, फुले, आंबेडकर यांच्यापर्यंतच्या अनेक विषयांवर पळशीकर यांनी लेखन केले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना अर्धांगवायूने ग्रासले होते. शनिवारी पहाटे नाशिकमधील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा माधव पळशीकर आणि परिवार आहे. पळशीकर यांच्या निधनाने पठडीबाहेरचा विचारवंत आणि एक मार्गदर्शक गमावल्याची हळहळ व्यक्त होत आहे.
राज्य
# नगर परिषदेसाठी ऑफलाइन उमेदवारी अर्ज, निवडणूक आयोगाचा निर्णय
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने ऑफलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील २१२ नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऑनलाइन अर्ज दाखल करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता. निवडणूक आयोगाची वेबसाईट सुरु न होणे, वीज पुरवठा खंडीत झाल्याने अर्ज दाखल करता न येणे अशा असंख्य तक्रारींचा पाढाच उमेदवारांनी वाचून दाखवला होता. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रीयेविषयी अजूनही शंका असल्याने उमेदवारांकडून तांत्रिक चूका होतील आणि त्यामुळे त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ऑफलाइन अर्ज दाखल करु द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेरीस शुक्रवारी निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची मुभा देत उमेदवारांना दिलासा दिला आहे.
क्रीडा
# भारताची आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
कर्णधार आणि गोलरक्षक पी आर श्रीजेशच्या जबरदस्त बचावामुळे भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने दक्षिण कोरियावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने पेनल्टी शूटमध्ये दक्षिण कोरियावर ५-४ अशी मात केली. पेनल्टी आऊटमध्ये डेयाओल लीचा फटका रोखत श्रीजेशने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. निर्धारित वेळेत दोन्ही संघांचे २-२ गोल झाले होते. त्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यामध्ये भारताने दक्षिण कोरियाला ५-४ असे रोखले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. तलविंदर सिंगने परतीचा सुरेख फटका मारत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दोनच मिनिटांमध्ये दक्षिण कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र या पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोल करण्यात दक्षिण कोरियाला अपयश आले. अखेर सिओ इनवोने दहा मिनिटांनंतर गोल करत दक्षिण कोरियाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीत होता.
# आईचे नाव असलेल्या जर्सी घालून ‘टीम इंडिया’ उतरली मैदानात!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना कोण जिंकणार, याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. आज विशाखापट्टणम येथील विझाग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या सुरूवातीला नाणेफेकीच्यावेळी एका अनोख्या गोष्टीने क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले. या मालिकेसाठी बीसीसीआय आणि स्टार प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सन्मानासाठी ‘नई सोच’ हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाचा भाग म्हणून आज भारतीय संघाचे सर्व खेळाडू स्वत:च्या आईचे नाव असलेल्या जर्सी घालून मैदानात उतरले.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]