⁠
Uncategorized

Current Affairs 29 October 2018

इंडोनेशिया: जकार्तात विमान कोसळले

इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचे प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. उड्डाण केल्यानंतर १३ मिनिटानंतर विमानाशी संपर्क तुटला. शोध पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जावा समुद्र किनाऱ्याजवळ या विमानाचे अवशेष आढळून आले आहेत. हे विमान जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात होते. परंतु, १३ मिनिटानंतर विमानाकडून कोणतीच सूचना न आल्याने एकच खळबळ उडाली. दुर्घटना घडल्याच्या शक्यतेने शोध आणि मदत अभियान सुरु करण्यात आले. विमानात क्रू मेंबरसह १८८ प्रवासी होते.

सैनिकी शाळांची दारे मुलींसाठी खुली

मिझोराममध्ये १९६१ मध्ये स्थापन झालेल्या सैनिकी शाळांची दारे प्रथम मुलींसाठी उघडल्याने इतिहास घडला आहे. १२ वर्षांच्या ६ मुलींचे प्रवेशाचे स्वप्न पूर्ण झाले असून, सैनिक, खलाशी, पायलट आदी होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

लखनौमधील कॅप्टन मनोज पांडेय उत्तर प्रदेश सैनिकी शाळेत यंदा विद्यार्थिनींना प्रथमच प्रवेश देण्यात आला. नववीच्या २०१८-१९ शैक्षणिक सत्रासाठी २,५०० विद्यार्थिनींनी अर्ज केले होते. त्यातील १५ जणींची निवड करण्यात आली. तथापि, ही शाळा राज्य सरकारद्वारा संचलित होती. त्यानंतर मिझोराम हे राज्यही पुढे आले असून, प्रथमच येथे मुलींना प्रवेश देण्यात आला.

september mpsc ebook

जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत ३० बैठकांत घेतले ९१८ निर्णय

वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने दोन वर्षांत ३० वेळा बैठक घेतली. नव्या करपद्धतीशी संबंधित कायदे, नियम व कराचा दर याबाबत ९१८ निर्णय घेतले गेले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका झाल्या. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंबंधी निवेदन जारी केले आहे.
या निवेदनानुसार, ९१८ निर्णयांपैकी ९६ टक्के निर्णयांची अंमलबजावणी केंद्र सरकारने केली आहे. त्यासाठी सरकारने २९४ अधिसूचना काढल्या. उर्वरीत निर्णय हे अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. जीएसटी हा केंद्र व राज्य या दोन सरकारांनी संयुक्तपणे राबविण्याचा कर असल्याने राज्य सरकारांनीही जवळपास तेवढ्याच अधिसूचना काढल्या. देशातील अप्रत्यक्ष कर व्यवस्थेशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे निर्णय घेत आहेत, अशा नव्या सहकारी सांघिक व्यवस्थेला मार्ग दाखवण्याचे काम ही परिषद करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

telegram ad 728

Related Articles

Check Also
Close
Back to top button