पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कारने सन्मानित
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी दिल्लीत ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च पर्यावरण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २६ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी मोदींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
भारताची स्वच्छता मोहीम ही जगातली सर्वात मोठी चळवळ – मोदी
- भारताची स्वच्छता मोहीम ही जगातील सर्वात मोठी चळवळ ठरली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात काढले. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांचा प्रारंभ करताना ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलना’त ते बोलत होते. गांधीजींनी स्वातंत्र्य आणि स्वच्छता यामध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
बरहम सालेह इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष
- इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह हे विजयी झाले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पेट्रिऑटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानचे (पीयूके) उमेदवार असलेल्या सालेह यांनी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पक्षाचे (केडीपी) उमेदवार फुआद हुसेन यांचा पराभव केला. ५८ वर्षीय बरहम सालेह यांना २१९ तर फुआद यांना २२ मते मिळाली. बरहम सालेह हे इराकचे आठवे राष्ट्राध्यक्ष असतील.
- दोन्ही पक्षांमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच होती. परंतु, निकाल एकतर्फी लागला. तसेच निकाल लागण्यासही उशीर झाला. २००३ नंतर इराकमध्ये राष्ट्राध्यक्षपदी कुर्द निवडून येत आहेत. पंतप्रधान शिया मुसलमान आणि संसदेचे सभापती सुन्नी समाजाचे आहेत. इराकची अखंडता आणि सुरक्षेसाठी काम करणार असल्याचे सालेह यांनी शपथग्रहणावेळी म्हटले. सरकार स्थापन करण्यासाठी नव्या राष्ट्राध्यक्षांकडे १५ दिवसांची कालावधी असेल.
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
- जगातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारावर जाहीर झाले आहेत. यामध्ये पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी लागली असून डोना स्ट्रीक्लंड असे त्यांचे नाव आहे. हा पुरस्कार भौतिकशास्त्रासाठी दिला असून ३ जणांना तो देण्यात येणार आहे. आर्थर आश्कीन यांना तसेच गेरार्ड मोरौ आणि डोना स्ट्रीक्लंड यांना विभागून देण्यात आला आहे. डोना या कॅनडातील असून या तिघांनीही लेझर फिजिक्स विषयात केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल देण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC
टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel