देश-विदेश
गुरू ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्रात ज्युनो यानाचा प्रवेश
# नासाचे गुरूच्या दिशेने निघालेले ज्युनो यान अखेर त्याच्या चुंबकावरणाच्या कक्षेत पोहोचले असून, त्या भागातील अवकाशीय कणांचे नियंत्रण गुरूच्या आंतरक्रियांवर अवलंबून असते. सॅन अँटानियो येथील साऊथवेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूटचे ज्युनो मोहिमेतील मुख्य संशोधक स्कॉट बोल्टन यांनी सांगितले, की गुरूची सीमा ओलांडली आहे. वेगाने यान गुरूच्या दिशेने जात असून महत्त्वाची माहिती हाती येत आहे. ज्युनो यान ४ जुलैला गुरूच्या क क्षेत जात आहे. त्यावरील वैज्ञानिक उपकरणांच्या मदतीने तेथील कण व चुंबकीय व इतर क्षेत्रांच्या गुणधर्मात बदल दिसत आहेत. आंतरग्रहीय सौर वारे व गुरूचे चुंबकावरण यांचा तेथील पर्यावरणावर मोठा परिणाम आहे. ज्युनोच्या लहरी तपासणी केंद्राकडून माहिती येत असून ,२४ जूनला यान बरेच जवळ गेले आहे. २५ जूनला ते चुंबकावरणात पोहोचले आहे. आयोवा विद्यापीठाचे विल्यम कुर्थ यांच्या मते सॉनिक बूमप्रमाणे तेथे बो शॉक नावाचा परिणाम दिसतो.
नासाच्या सांघिक भावना स्पर्धेत मुंबईचा संघ प्रथम
# नासाच्या सांघिक भावना स्पर्धेत भारतीय चमूला पुरस्कार मिळाला असून त्यात १३ भारतीय अभियंत्यांचा समावेश आहे. त्यात चार मुली आहेत. दूरनियंत्रक उपकरण तयार करण्याच्या उपक्रमात हा पुरस्कार जाहीर केला आहे. मुंबईच्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्क्रूड्रायव्हर्स चमूला अलोहा सांघिक भावना पुरस्कार नासाच्या जॉनसन स्पेस सेंटर न्यूट्रल बॉयन्सी लॅब येथील मेट इंटरनॅशनल (मरिन अॅडव्हान्सड टेक्नॉलॉजी एज्युकेशन) आरओव्ही उपक्रमात मिळाला आहे. उत्साह, आदर्श संवाद, एकमेकांना मदत, इतरांशी चांगले संबंध यासाठी हा पुरस्कार दिला जातो. सुरक्षा, नवप्रवर्तन, उत्पादन प्रदर्शन व विपणन यासाठीही इतर ५-७ पुरस्कार दिले जातात.
क्रीडा
अमला-ब्राव्हो यांची विश्वविक्रमी भागीदारी
# कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हशिम अमला आणि वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो यांनी विश्वविक्रमी भागीदारी रचत त्रिन्बागो नाइट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १५० धावांची भागादारी रचल्यामुळे त्रिन्बागो संघाला १७० धावांचा पाठलाग करता आला. त्रिन्बागोच्या आव्हानाचा पाठलाग करताना बार्बाडोस ट्रायडेन्ट संघाला १५९ धावा करता आल्या आणि त्रिन्बागो संघाने ११ धावांनी विजय मिळवला. यापूर्वी हा विक्रम योगेश ताकवले आणि साईराज बहुतले यांच्या नावावर होता. त्यांनी २००७ च्या आयपीएलच्या हंगामात पाचव्या विकेटसाठी १४९ धावा केल्या होत्या.